Table of Contents
पोलीस भरती अपडेट 2024
पोलीस भरती अपडेट 2024: दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासन, गृह विभागाने शासन निर्णय जाहीर करून महाराष्ट्र पोलीस दलामधील विविध घटक कार्यालयांच्या आस्थापनेवरील एकूण 17471 पदे भरतीसाठी उपलब्ध आहेत अशी माहिती दिली. या मध्ये पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई या पदांचा समावेश आहे. या लेखात आपण पोलीस भरती अपडेट 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
पोलीस भरती 2024 अपडेट: विहंगावलोकन
पोलीस भरती 2024 अपडेट अपडेट दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आली. पोलीस भरती 2024 अपडेट अपडेट चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.
पोलीस भरती 2024 अपडेट: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | महाराष्ट्र शासन, गृह विभाग |
भरतीचे नाव | पोलीस भरती 2024 |
पदे | पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई |
एकूण रिक्त पदे | 17471 |
निकारीचे ठिकाण | महाराष्ट्र |
पोलीस भरती 2024: शासन निर्णयातील प्रमुख मुद्दे
खाली 31 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयातील प्रमुख मुद्दे दिले आहेत.
- पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण 17,471 पदे 100 टक्के भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्र. 1 येथील दि.30.09.2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीमधून सूट देण्यात येत आहे.
- प्रस्तुत भरती प्रक्रियेमधील पदे भरण्याची कार्यवाही करताना आवेदनपत्र प्राप्त झाल्यानतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटकस्तरावर राबविण्यात येते. त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने (Computer Programme Based test/ Examination) किवा OMR आधारीत घेण्याची मुभा संबधित घटक कार्यालयास (पोलीस अधीक्षक/पोलीस आयुक्त/ समादेशक / इतर सक्षम प्राधिकारी) असणार आहे. जे घटक कार्यालय OMR आधारीत परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दि.21.11.2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदींमधून सूट देय असेल.
- सदर भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्विकृती, छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवापुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना देण्यात येत आहेत.
- सदरहू परिक्षा पद्धतीच्या अनुषगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना/ आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरीता पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यानी परिपत्रक निर्गमीत करावे.
- सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची व सनियंत्रण करण्याची सपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची राहील. परीक्षासंदर्भात आक्षेप /वाद/न्यायालयीन प्रकरण/विधानमंडळ कामकाजविषयक बाबी उद्भवल्यास, त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्याच्या अधिनस्त संबंधित घटक/गट प्रमुखांची राहील.
-
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 20240131150615229 असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षाकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्र गृह विभाग शासन निर्णय PDF
उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन दिनांक 31 जानेवारी 2024 चा महाराष्ट्र गृह विभागाचा शासन निर्णय PDF डाउनलोड करू शकतात.
महाराष्ट्र गृह विभाग शासन निर्णय PDF
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.