Marathi govt jobs   »   Study Materials   »   राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023, पुरस्कार विजेत्यांची यादी तपासा

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023: राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, 5 सप्टेंबर 2023 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 75 वे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 प्रदान करणार आहेत. 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन, दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. देशातील शिक्षकांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करणे आणि ज्या शिक्षकांनी आपल्या निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले आहे त्यांचा सन्मान करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा उद्देश आहे. प्रमाणपत्र, रोख 50,000 रुपये आणि एक रौप्य पदक, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आज या लेखात आपण राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात महाराष्ट्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 विजेते आणि राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 विजेत्यांची यादी देण्यात आली आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023: विहंगावलोकन

नवनवीन अध्यापन पध्दती, संशोधन, समाजापर्यंत पोहोचणे आणि कार्यातील नाविन्य ओळखण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त जनसहभाग (जन भागीदारी) करून घेणे या निकषांच्या आधारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 दिल्या जातात. या लेखात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांची यादी दिली आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय चालू घडामोडी
लेखाचे नाव राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023
महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते
  • मृणाल नंदकिशोर गांजाळे
  • केशव काशिनाथ सांगळे
  • डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील
  • डॉ. राघवन बी. सुनोज
  • स्वाती योगेश देशमुख

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023: महाराष्ट्रातील विजेते

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील पाच शिक्षकांचा समावेश आहे. विभाग व शिक्षक यांच्याबद्दल माहिती खाली देण्यात आली आहे.

  • शालेय विभागात आंबेगाव पुणे येथील, जिल्हा परिषद शाळेच्या मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 मिळाला.
  • उच्च शिक्षण विभागात व्हीजेटीआय मुंबईतील केशव काशिनाथ सांगळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 मिळाला.
  • धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 मिळाला.
  • आयआयटी मुंबईतील डॉ. राघवन बी. सुनोज यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 मिळाला.
  • कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात मुंबईतील लोअर परेल येथील गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील हस्तकला शिक्षिका स्वाती योगेश देशमुख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 मिळाला.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023: शालेय शिक्षण विभागातील पुरस्कार विजेते

शालेय शिक्षण विभागातील पुरस्कार विजेत्यांची यादी खाली देण्यात आली आहे.

पुरस्कार विजेत्यांचे नाव राज्य / स्थान
सत्यपाल सिंग हरियाणा
विजय कुमार कांगडा, हिमाचल प्रदेश
अमृतपाल सिंग लुधियाना, पंजाब
आरती कानुनगो दिल्ली
दौलतसिंग गुसैन पौरी गढवाल, उत्तराखंड
संजय कुमार चंदिगढ
आशा राणी सुमन अलवर, राजस्थान
शीला असोपा राजस्थान
श्यामसुंदर रामचंद खानचंदानी सिल्वासा, दमण आणि दीव
अविनाश मुरलीधर पारखे पणजी, तिसवाडी, उत्तर गोवा
दीपक जेठालाल मोटा कच्छ, गुजरात
डॉ. रिताबेन निकेशचंद्र फुलवाला सुरत, गुजरात
सारिका घारू होशंगाबाद, मध्य प्रदेश
सीमा अग्निहोत्री रतलाम, मध्य प्रदेश
 डॉ. ब्रजेश पांडे सरगुजा, छत्तीसगड
मो.एजाजुल हेग चत्रा, झारखंड
भूपिंदर गोगिया लुधियाना, पंजाब
शशी शेखर कर शर्मा भद्रक, ओडिशा
सुभाषचंद्र राऊत जगतसिंगपूर, ओडिशा
डॉ. चंदन मिश्रा हावडा, पश्चिम बंगाल
रियाझ अहमद शेख अनंतनाग, जम्मू आणि काश्मीर
आसिया फारुकी फतेहपूर, उत्तर प्रदेश
चंद्र प्रकाश अग्रवाल मोह, उत्तर प्रदेश
अनिल कुमार सिंग रामगढ, कैमूर-भाबुआ, बिहार
द्विजेंद्र कुमार सीतामढी, बिहार
कुमारी गुड्डी बिहार
रविकांत मिश्रा मध्य प्रदेश
मनोरंजन पाठक झारखंड
डॉ. यशपाल सिंग भोपाळ, मध्य प्रदेश
मुजीब रहिम के. यु. पलक्कड, केरळ
चेतना खांबेटे मध्य प्रदेश
नारायण परमेश्वर भागवत सिरसी, कर्नाटक
सपना श्रीशैल अनिगोळ बागलकोट, कर्नाटक
नेताईचंद्र डे देवमाली, तिरप, अरुणाचल प्रदेश
निंगथौजम बिनॉय सिंग मोइरांग, बिष्णुपूर, मणिपूर
पूर्ण बहादूर छेत्री डॉ सिक्कीम
लालथियांगलीमा कोलासिब, बिलखावथलीर, कोलासिब, मिझोरम
माधव सिंग उमलिंग, मेघालय
कुमुद कलिता पाठशाला, आसाम
जोस डी सुजीव तिरुवनंतपुरम, केरळ
मेकला भास्कर राव Spsr नेल्लोर, आंध्र प्रदेश
मुराहरा राव उमा गांधी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश
सेटम अंजनेयुलु रायचोटी, अन्नमय, आंध्र प्रदेश
अर्चना नुगुरी लक्सेटीपेट, मंचेरियल, तेलंगणा
संतोषकुमार भेदोडकर भीमपूर, आदिलाबाद, तेलंगणा
रितिका आनंद दिल्ली
सुधांशू शेखर पांडा मेरठ, उत्तर प्रदेश
डॉ. टी गॉडविन वेदनायगम राजकुमार मदुराई, तामिळनाडू
मालती एसएस मालती तेनकासी, तामिळनाडू
मृणाल नंदकिशोर गांजाळे आंबेगाव, पुणे, महाराष्ट्र

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023: उच्च शिक्षण विभागातील पुरस्कार विजेते

उच्च शिक्षण विभागातील पुरस्कार विजेत्यांची यादी खाली देण्यात आली आहे.

पुरस्कार विजेत्यांचे नाव राज्य / स्थान
डॉ. एस. वृंदा कोईम्बतूर, तामिळनाडू
कु.मेहता झनखाना दिलीपभाई अहमदाबाद, गुजरात
केशव काशिनाथ सांगळे मुंबई, महाराष्ट्र
डॉ.एस.आर.महादेव प्रसन्ना धारवाड, कर्नाटक
डॉ दिनेश बाबू जे बंगलोर, कर्नाटक
फरहीन बानो डॉ लखनौ, उत्तर प्रदेश
सुमन चक्रवर्ती खरगपूर, पश्चिम बंगाल
सायम सेन गुप्ता मोहनपूर, कोलकाता
डॉ.चंद्रगौडा रावसाहेब पाटील शिरपूर, महाराष्ट्र
डॉ. राघवन बी. सुनोज मुंबई, महाराष्ट्र
इंद्रनाथ सेनगुप्ता गांधीनगर, गुजरात
आशिष बालदी डॉ भटिंडा, पंजाब
सत्यरंजन आचार्य डॉ गांधीनगर, गुजरात

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023: कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय पुरस्कार विजेते

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय पुरस्कार विजेत्यांची यादी खाली देण्यात आली आहे.

पुरस्कार विजेत्यांचे नाव राज्य / स्थान
रमेश रक्षित दुर्गापूर, पश्चिम बंगाल
रमण कुमार नालंदा, बिहार
शियाद एस मलमपुझा, पलक्कड
स्वाती योगेश देशमुख लोअर परळ, मुंबई
टिमोथी जोन्स धर शिलाँग
अजित ए नायर कलामासेरी, एचएमटी कॉलनी, एर्नाकुलम
एस. चित्रकुमार नाथम रोड, कुलनमपट्टी, दिंडीगुल
रवीनारायण साहू खुदपूर, खोरधा
सुनीता सिंग भुवनेश्वर
पूजा आर सिंग बंगलोर
श्रीमती दिवी एल होसुर रोड, बेंगळुरू, कर्नाटक
डॉ. दिव्येंदू चौधरी युसुफगुडा, हैदराबाद

 

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे कि तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव लिंक
भारताची जणगणना
माहितीचा अधिकार अधिनियम 2005
भारतीय नागरिकत्व
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 कधी प्रदान करण्यात येणार आहे?

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 दिनांक 05 सप्टेंबर 2023 रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे?

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 अंतर्गत शालेय शिक्षण विभागात महाराष्ट्रातील कोणाला पुरस्कार मिळाला आहे?

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 अंतर्गत शालेय शिक्षण विभागात महाराष्ट्रातील मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना पुरस्कार प्राप्त झाला.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 अंतर्गत उच्च शिक्षण विभागात महाराष्ट्रातील कोणाला पुरस्कार मिळाला आहे?

उच्च शिक्षण विभागात व्हीजेटीआय मुंबईतील केशव काशिनाथ सांगळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 मिळाला.