Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   मुंबई पोलीस भरती 2021 अपडेट

मुंबई पोलीस भरती 2021 अपडेट, नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी उमेदवारांची यादी

मुंबई पोलीस भरती 2021 अपडेट

मुंबई पोलीस भरती 2021 अपडेट: महाराष्ट्र शासन, पोलीस विभागाने दिनांक 09 मार्च 2024 रोजी मुंबई पोलीस भरती 2021 अंतर्गत नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. संबंधित उमेदवारांनी दि. 13 मार्च 2024 रोजी नियुक्ती आदेश घेण्यासाठी हजर राहावे. पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्ती ही निव्वळ अस्थायी आणि तात्पुरत्या स्वरुपाची असणार आहे. मुंबई पोलीस भरती 2021 अपडेट बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

मुंबई पोलीस भरती 2021 प्रसिद्धीपत्रक

मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहून गुणवत्तेनुसार प्रसिध्द करण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारांची वैद्यकिय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकिय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या, चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रांची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे. तसेच ज्या उमेदवारांना यापूर्वी नियुक्ती आदेश स्विकारण्यासाठी बोलाविण्यात आले होते, परंतू ते उमेदवार नियुक्तीकरिता गैरहजर राहिले अशा गैरहजर उमेदवारांना नियुक्ती आदेश स्विकारण्यासाठी शेवटची संधी देण्यात येत आहे.

मुंबई पोलीस भरती 2021 प्रसिद्धीपत्रक PDF

नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी हजर राहण्याचा पत्ता

सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक 13/03/2024 रोजी नियुक्ती आदेश घेण्यासाठी नायगांव संकूल हॉल, कक्ष-9 (भरती कक्ष) संगणक कक्ष, तळ मजला, पोलीस मुख्यालया समोर, नायगांव, दादर (पूर्व), मुंबई येथे सकाळी 09:30 वाजता हजर रहावे.

उमेदवारांना नियुक्ती पत्र स्विकारण्याकरिता बोलाविण्यात आले म्हणुन नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला. असे समजण्यात येऊ नये, भरती प्रक्रीयेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास आहेत, याची संबधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच खाली नमूद केलेल्या सुचनांचे पालन करण्यात यावे.

नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणावयाच्या आवश्यक बाबी :-

  • भरती ओळखपत्र (मैदानी चाचणी/ लेखी परिक्षेचे)
  • 04 पासपोर्ट साईज फोटो.
  • आधार कार्ड व पॅन कार्ड.
  • दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर रहावे,
  • आवेदन अर्जामध्ये नमूद केलेली मुळ कागदपत्रे – (सामाजिक/समांतर आरक्षण सिध्द करण्यास सक्षम प्राधिका-याने निर्गमित केलेली प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, अधिवास प्रमाणपत्र/रहिवास दाखला, एम.एस.सी.आय.टी. व इतर)
  • शासनाने वेळोवेळी विहीत केलेले लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी, नियुक्ती पुर्वीचे हमीपत्र, जन्म तारण्रेचे हमीपत्र नमुना सोबत जोडला असुन तो सुवाच्छ स्वाक्षरात सोबत भरुन आणावेत.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

मुंबई पोलीस भरती 2021 अपडेट बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

मुंबई पोलीस भरती 2021 अपडेट बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी हजर राहण्याचा पत्ता काय आहे?

सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक 13/03/2024 रोजी नियुक्ती आदेश घेण्यासाठी नायगांव संकूल हॉल, कक्ष-9 (भरती कक्ष) संगणक कक्ष, तळ मजला, पोलीस मुख्यालया समोर, नायगांव, दादर (पूर्व), मुंबई येथे सकाळी 09:30 वाजता हजर रहावे.