Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | Maharashtra Geography | महाराष्ट्रातील उद्योग

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Maharashtra Geography (महाराष्ट्राचा भूगोल)
टॉपिक महाराष्ट्रातील उद्योग

महाराष्ट्रातील उद्योग: उद्योगांचे प्रकार

महाराष्ट्रातील उद्योगांचे प्रकार: महाराष्ट्र राज्य हे विविध प्रकारच्या उद्योगांनी समृध्द असे राज्य आहे. राज्यात साखर, सुती कापड, औषधे, खते, वाहने, संरक्षण साहित्य, रसायने, विविध प्रकारची विद्युत उपकरणे, कागद, काचसामान इत्यादीचे उत्पादन प्रामुख्याने होते. महाराष्ट्रातील उद्योगांचे मोठे उद्योग, लघुउद्योग, कुटीरोद्योग असे तीन प्रमुख प्रकार आहेत. त्यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

1. मोठे उद्योग:

मोठ्या जागेत, मोठ्या भांडवलावर व मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन घेण्यासाठी जे उद्योग उभारले जातात, त्यांचा समावेश मोठ्या उद्योगांमध्ये होतो. उदा. कापड उद्योग, साखर उद्योग इ. या प्रकारच्या उद्योगांचा समावेश मोठ्या उद्योगांमध्ये होतो.

2. लघु उद्योग:

कमी जागेत, कमी भांडवल गुंतवून  व कमी प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन घेण्यासाठी जे उद्योग उभारले जातात, त्यांचा समावेश लघुउद्योगांमध्ये होतो. हे उद्योग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. अनेक मोठ्या उद्योगांना लागणारे छोटे छोटे भाग तयार करणारे लघुउद्योग मोठ्या उद्योगांच्या जवळपास असतात. लघुउद्योग प्रामुख्याने बाजारपेठांच्या आसपास विकसित होतात. उदा. प्लॅस्टिकच्या विविध वस्तु गोतीची अवजारे, धातूंची भांडी तयार करणे, तेलगिरण्या इत्यादी या प्रकारच्या उद्योगांचा समावेश लघुउद्योगांमध्ये होतो.

3. कुटीरोद्योग:

टोपल्या, चटया, मातीची भांडी, पापड, उदबत्त्या इत्यादी तयार करणे या घरगुती स्वरूपाच्या व्यवसायांना कुटीरोद्योग म्हणतात. या उद्योगांतील बहुतांश माल स्थानिक बाजारपेठेत विकला जातो. महाराष्ट्राच्या सर्वच भागांत वेगवेगळे कुटीरोद्योग आहेत.

महाराष्ट्रातील उद्योग: जिल्ह्यानुसार उद्योग कोणते?

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील प्रमुख उद्योग आपण खालील तक्त्यात पाहणार आहोत.

जिल्हा उद्योग
सोलापूर कापड निर्मिती, सूतगिरणी, विडी निर्मिती, कुंकू निर्मिती, विणकाम
वाशिम हातमाग, कापड निर्मिती, रेशम निर्मिती, रायानिक खत निर्मिती
वर्धा कापड निर्मिती, हातमाग, साखर निर्मिती
सिंधुदुर्ग खनिज संप्पतीवर आधारित उद्योग, वस्त्र उद्योग, लाकडी खेळणी तयार करणे
लातूर सूतगिरणी, साखर निर्मिती, प्लास्टिक बूट व चप्पल निर्मिती
यवतमाळ कागद निर्मिती, कोळसा निर्मिती, साखर उद्योग, तेल निर्मिती
नागपूर यंत्र उद्योग, खत निर्मिती, सूतगिरणी,
मुंबई कापड उद्योग, चित्रपट निर्मिती, माहिती व तंत्रज्ञान, वाहन निर्मिती, तेल शुद्धीकरण
पुणे यंत्र उद्योग, काचसामान, वाहन निर्मिती, माहिती व तंत्रज्ञान, साखर निर्मिती
नांदेड साखर उद्योग,
कोल्हापूर साखर उद्योग , चित्रपट निर्मिती
नंदुरबार जिनिंग व प्रेसिंग, सुतगिरणी, औषधे व सुगंधित तेल निर्मिती
ठाणे कापड उद्योग, औषध निर्मिती,
जळगाव जिनिंग व प्रेसिंग, साखर उद्योग, रेशीम कापड निर्मिती, तेल गिरण्या, युद्ध साहित्य निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग

महाराष्ट्रात विशेष आर्थिक क्षेत्र

  • राज्यात विशेष आर्थिक क्षेत्रे निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने SEZ धोरणाची स्थापना केली आहे.
  • ड्युटी-फ्री एन्क्लेव्ह म्हणून नियुक्त केलेल्या एसईझेडमध्ये जलद औद्योगिक वाढ आणि रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असलेले उदार आणि व्यवसाय-अनुकूल नियामक वातावरण आहे.
  • SEZ सह व्यवहारांसाठी आणि देशांतर्गत टॅरिफ क्षेत्रांमधून SEZ ला पुरवठ्यासाठी सर्व राज्य आणि स्थानिक कर आणि शुल्कातून सूट मंजूर धोरणाचा एक भाग आहे.
    • नोंदणी आणि मुद्रांक कर भरण्यापासून सूट
    • नियुक्त सिंगल विंडो प्रक्रियेद्वारे कामगार आणि पर्यावरणाशी संबंधित परवाने आणि मंजूरी देणे
    • वैयक्तिक वापरासाठी वीज निर्मिती करण्याची परवानगी
    • सेझच्या निर्मितीसाठी जलद भूसंपादन
  • महाराष्ट्राचा SEZ कार्यक्रम खालील आकर्षक प्रोत्साहने प्रदान करतो:
    • मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कातून 100% सूट देऊन उर्जा निर्मितीसाठी परवानगी.

तुम्हाला माहित आहे का?

  • राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात 20% योगदान देणारे महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात औद्योगिक राज्य आहे.
  • GSDP च्या जवळपास 46% उद्योगांचे योगदान आहे.
  • महाराष्ट्रामध्ये राज्यातील अनेक शहरांमध्ये सॉफ्टवेअर पार्क आहेत आणि ₹ 80,000 कोटींहून अधिक वार्षिक निर्यातीसह सॉफ्टवेअरचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

 

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्रातील 'औद्यौगिक त्रिकोण' कोणत्या क्षेत्राला म्हटले जाते?

मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यात अनेक उद्योग विकसित झाले आहेत. हे 'औद्यौगिक त्रिकोण' म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्रातील उद्योगाचे प्रकार किती व कोणते?

महाराष्ट्रातील उद्योगांचे मोठे उद्योग, लघुउद्योग, कुटीरोद्योग असे तीन प्रमुख प्रकार आहेत.