Marathi govt jobs   »   Result   »   MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा...

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 निकाल जाहीर, निवड व गुणवत्ता यादी डाउनलोड करा

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 निकाल जाहीर

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 निकाल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी सहायक कक्ष अधिकारी पदासाठी तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच प्रक्रियेतून बाहेर पडण्याची सुविधा जारी केली आहे. या आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक राज्य कर निरीक्षक पदासाठी तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच प्रक्रियेतून बाहेर पडण्याची सुविधा जारी केली होती. MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 बसलेले उमेदवार याची खूप दिवसापासून वाट बघत होते. या लेखात MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 निकाल बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 निकाल : विहंगावलोकन

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचे विहंगावलोकन तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 निकाल: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
भरतीचे नाव महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब
परीक्षेचे नाव महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022
परीक्षा पद्धती ऑफलाईन
MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 निकाल 21 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in.

गट ब मधील पदांसाठी तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी सहायक कक्ष अधिकारी पदासाठी तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच प्रक्रियेतून बाहेर पडण्याची सुविधा जारी केली आहे. याआधी दिनांक 21 डिसेंबर 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर @mpsc.gov.in दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक राज्य कर निरीक्षक पदासाठी तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच प्रक्रियेतून बाहेर पडण्याची सुविधा जारी केली होती. सहायक कक्ष अधिकारीच्या 49 पदांसाठी, दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक च्या 78 पदांसाठी तर राज्य कर निरीक्षक च्या 93 पदांसाठी तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तात्पुरती निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव तात्पुरती निवड यादी सर्वसाधारण गुणवत्ता यादी
दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक येथे क्लिक करा येथे क्लिक करा
राज्य कर निरीक्षक येथे क्लिक करा येथे क्लिक करा
सहायक कक्ष अधिकारी येथे क्लिक करा येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी सूचना

  • सदर तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये/ शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
  • खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे व त्यांचा तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • प्रस्तुत तात्पुरती निवड यादी मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
  • प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक 22 डिसेंबर, 2023 रोजी 12.00 वाजेपासून दिनांक 28 डिसेंबर, 2023 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु राहील.
  • ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.
  • भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही.
  • भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support- online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा निकाल कधी जाहीर झाला?

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा निकाल 21 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा निकाल कोणत्या पदांसाठी जाहीर झाला?

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा निकाल दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक व राज्य कर निरीक्षक पदांसाठी जाहीर झाला

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा निकाल बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा निकाल बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.