Marathi govt jobs   »   MPSC Group C Notification   »   MPSC गट क मुख्य परीक्षा 2023

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023, गुणपत्रक, उत्तरपत्रिका बद्दल प्रसिद्धीपत्रक

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 03 मे 2024 रोजी दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक पदासाठी गुणपत्रक, उत्तरपत्रिका बद्दल प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 साठी बसलेले उमेदवार याची खूप दिवसापासून वाट बघत होते. या लेखात MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक बद्दल प्रसिद्धीपत्रक बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक: विहंगावलोकन

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचे विहंगावलोकन तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC गट क मुख्य परीक्षा 2023
पदांची नावे
  • दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क
  • कर सहाय्यक, गट-क
  • तांत्रिक सहाय्यक
  • लिपिक-टंकलेखक
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
गट क एकूण पदे 7510
लेखाचे नाव MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल 2023
परीक्षेची तारीख 17 डिसेंबर 2023
अंतिम निकाल तारीख 10 एप्रिल 2024
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-2023 मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (जाहिरात क्र. 111/2023) व तांत्रिक सहायक, गट-क, (जाहिरात क्र. 111/2023) या संवर्गाचा अंतिम निकाल दिनांक 10 एप्रिल, 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

प्रस्तुत परीक्षांस उपस्थित असलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘view’ अंतर्गत उपलब्ध करुन दिल्या आहेत, तसेच गुणांची फेरपडताळणी (Retotaling) करू इच्छिणा-या उमेदवारांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.

(1) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील Retotalling of Marks या लिंकवर क्लिक करावे.

(2) उपलब्ध होणा-या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी.

(3) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉग-इन करावे.

(4) Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.

(5) उपलब्ध होणा-या गुणपत्रकातील फेरपडताळणी करावयाची असलेल्या विषयाची निवड करून Save बटणवर क्लिक करावे.

(6) सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पध्दतीने अदा करावे.

गुणांच्या फेरपडताळणीकरिताची सदर वेबलिंक दिनांक 4 मे, 2024:12.00 ते 13 मे, 2024:23.59 वाजेपर्यंत सुरू राहील.

उपरोक्त कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेर पडताळणीकरिता अर्ज करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा support- online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.

MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल कोणत्या पदांसाठी जाहीर झाला?

MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल विविध पदासाठी जाहीर झाला

MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल कधी जाहीर झाला?

MPSC गट क मुख्य परीक्षा निकाल 10 एप्रिल 2024 रोजी जाहीर झाला.