Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्र - स्थान व विस्तार

महाराष्ट्र – स्थान व विस्तार : MPSC 2024 अभ्यास साहित्य

महाराष्ट्र – स्थान व विस्तार 

महाराष्ट्र – स्थान व विस्तार : महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारणतः पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. महाराष्ट्राचा भूगोल हा आगामी काळातील MPSC 2024 भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून त्यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण महाराष्ट्र – स्थान व विस्तार बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र – स्थान व विस्तार : विहंगावलोकन

खालील तक्त्यात आम्ही विहंगावलोकन बद्दल दिले आहे.

महाराष्ट्र – स्थान व विस्तार  : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC 2024
विषय महाराष्ट्राचा भूगोल
टॉपिकचे नाव महाराष्ट्र – स्थान व विस्तार
लेखातील प्रमुख मुद्दे
  • महाराष्ट्र – स्थान व विस्तार विषयी सविस्तर माहिती

महाराष्ट्र या शब्दाचा उगम :सर्वसाधारणपणे महाराष्ट्र हा शब्द चौथ्या दशकापासून वापरात आलेला आढळतो.

  • इ.स. 365 : मध्य प्रदेशातील  ‘ऐरण’ गावातील स्तंभालेखात महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख आढळतो.
  • इ.स. 505: बृहत्‌संहितेच्या ( वराहमिहीर) 10 व्या अध्यायात महाराष्ट्र शब्दाचा उल्लेख आढळतो. 
  • 7 वे शतक : जैन मुनी संघदास गणीने बृहतकल्प भाष्यात महाराष्ट्राच्या कोल्लक परंपरेचा उल्लेख केला आहे.
  • 8 वे शतक : मरहट्ट लोकांचे वर्णन ‘कुवलयमाला’ या काव्यग्रंथात केलेले आढळते. सम्राट अशोकचा नातू संप्रती याने देखील महारठ्ठ(महाराष्ट्र) असा उल्लेख केला आहे.
  • महानुभव वाङमय  : प्राचीन काळी दक्षिणेकडे आलेल्या लोकांनी  गोंड, मल्ल, पांडू, अपरान्त, विदर्भ व अश्मक अशी सहा राष्ट्रे वसवली. ही सहा राष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र तयार झाले असावे. महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र असा महानुभाव वाङमयात उल्लेख आढळतो.

महाराष्ट्राची निर्मिती : 1 मे 1960  

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ – महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, महाराष्ट्र राज्याचे एकुण क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे.  भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% एवढे क्षेत्र महाराष्ट्राने व्यापलेले आहे.

लांबी व रुंदी – महाराष्ट्राची पूर्व-पश्‍चिम लांबी 800 कि.मी. व उत्तर-दक्षिण रुंदी 700 कि. मी. आहे. महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार हा दक्षिण-उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे.

समुद्रकिनाऱ्याची लांबी : महाराष्ट्राला 720 कि.मी.लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. 

महाराष्ट्राची राजधानी : मुंबई

महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर

2011 साली महाराष्ट्राची लोकसंख्या : 11,23,72,972 

भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण (2001) : 9.42 % 

भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण (2011) : 9.28 % 

महाराष्ट्राचे स्थान : महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्‍चिम व मध्य भागात वसलेले आहे.भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे.

महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार :

  1. अक्षवृत्तीय विस्तार – 15° 08′ 46″ उत्तर ते 22°2’13” उत्तर
  2. रेखावृत्तीय विस्तार – 72°16′ 45″ पूर्व ते 80°9’17” पूर्व

महाराष्ट्राचा आकार – महाराष्ट्राचा आकार काटकोन त्रिकोणासारखा आहे.  महाराष्ट्राचा आकार दक्षिणेकडे अरुंद आहे, तर उत्तरेकडे विस्तृत स्वरुपाचा आहे.

शेजारील राज्ये : महाराष्ट्राला एकूण 6 घटकराज्ये व 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे, तसेच सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. महाराष्ट्राची सर्वांत कमी सीमा गोवा या राज्याला लागून आहे.

  1. महाराष्ट्राच्या वायव्येस– गुजरात राज्य, दमण, दादरा व नगरहवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. 
  2. उत्तरेस : मध्य प्रदेश व गुजरात राज्ये आहेत. 
  3. पूर्वेस व ईशान्येस : छत्तीसगढ राज्य आहे. 
  4. आग्नेयेस : तेलंगणा राज्य आहे. 
  5. दक्षिणेस : कर्नाटक व गोवा राज्ये आहेत. 

महाराष्ट्रातील जिल्हे : 36 

  • पालघर हा 36 वा जिल्हा आहे. 
  • क्षेत्रफळाने अहमदनगर सर्वात मोठा, तर मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा आहे. 
  • महाराष्ट्रातील एकूण 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे. 
  • महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागून नाही. 

महाराष्ट्राच्या राजकीय सीमा :

राज्य  जिल्ह्यांची संख्या  जिल्हे 
मध्य प्रदेश नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
कर्नाटक  नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
गुजरात 4 पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार
तेलंगणा 4 गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
छत्तीसगड 2 गोंदिया, गडचिरोली
गोवा 1 सिंधुदुर्ग

सलग दोन राज्यांना लागून असणारी जिल्ह्यांची सीमा :

जिल्हा  राज्य /केंद्रशासित प्रदेश 
पालघर दादर व नगर हवेली व गुजरात
नंदुरबार गुजरात व मध्य प्रदेश
धुळे गुजरात व मध्य प्रदेश
सिंधुदुर्ग गोवा व कर्नाटक
गोंदिया मध्य प्रदेश व छत्तीसगड
गडचिरोली छत्तीसगड व तेलंगणा
नांदेड तेलंगणा व कर्नाटक

महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ : 288 

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ : 48 

महाराष्ट्रातील विधानपरिषद मतदारसंघ : 78 

महाराष्ट्रातील राज्यसभा मतदारसंघ : 19 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली ?

महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली.

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे ?

महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, महाराष्ट्र राज्याचे एकुण क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे.

महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ?

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.

महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे ?

महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,72,972 इतकी आहे.