Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   Marathi Language Quiz for Competitive Exam

Marathi Language Quiz for Competitive Exams : 23 September 2023

Marathi Language Quiz for Competitive Exams: स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी समाविष्ट करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Marathi Language Quiz for Competitive Exams पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. Marathi Language Quiz for Competitive Exams चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Marathi Language Quiz for Competitive Exams चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. Marathi Language Quiz केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

Daily Quiz for Competitive Exams: Marathi Language

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Marathi Language Quiz for Competitive Exams चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, PMC & PCMC Recruitment, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Daily Quiz बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी Marathi Language Quiz for Competitive Exams Quiz हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Marathi Language Quiz for Competitive Exams Quiz आपली  2023 च्या स्पर्धा परीक्षेची तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.

Daily Quiz for Competitive Exams – Marathi Language: Questions

Q1.’चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.

(a) मध्यमपद लोपी समास

(b) समाहार द्वंद्व

(c) अव्ययी भाव

(d) बहुव्रीही

Q2.”विटीदांडू’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

(a) वैकल्पिक द्वंद्व

(b) इतरेतर द्वंद्व

(c) सामाहार द्वंद्व

(d) कोणताही नाही

Q3.’नवरात्र’ या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल?

(a) नौ रात्रींचा समूह

(b) नव रात्रींचा समूह

(c) नऊ रात्रींचा समूह

(d) नवरात्रौत्सव

Q4. संधी सोडवा – तेज:पुंज

(a) तेज: + पुंज

(b) तेज + पुंज

(c) तेज + पुज

(d) तेजअ + पुंज

Q5. ‘उमेश’ या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ?

(a) अ + इ

(b) आ + ई

(c) अ+उ

(d) आ + उ

Q6. ‘तपोधाम’ ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल ?

(a) तप+धाम

(b) तपो+धाम

(c) तपः+धाम

(d) तप + उधाम

Q7. व्यंजनसंधी म्हणजे…….

(a) एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी एक व्यंजन व दुसरे व्यंजन/ स्वर जोडणे.

(b) एकमेकांशेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे.

(c) एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन जोडला जाणे.

(d) एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण स्वर जोडला जाणे.

Q8. माणसाने स्वार्थ व…….. चा विचार करावा. स्वार्थ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

(a) आप्पलपोटी

(b) प्रपंच

(c) परमार्थ

(d) पोटार्थ

Q9. ‘भंग’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

(a) भग्न

(b) निर्मंग

(c) सभंग

(d) अभंग

Q10. ‘आवक’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा.

(a) श्रावक

(b) भावक

(c) जावक

(d) वाहक

ॲप मध्ये प्रश्ने सोडवण्यासाठी, वेळेसह, आणि ऑल इंडिया रॅंक पाहण्यासाठी ॲप डाउनलोड करा  Click here

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी ॲप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Adda247 App

Daily Quiz for Competitive Exams – Marathi Language: Solutions

Solutions

S1. Ans (d)

Sol. चक्रपाणी म्हणजे चक्र आहे हातात ज्याच्या असा तो. हा षष्ठी बहुव्रीही समास आहे.

S2. Ans (b)

Sol. विटीदांडू = विटी आणि दांडू. येथे विग्रह करताना ‘आणि’ आला आहे त्यामुळे इतरेतर द्वंद्व समास आहे.

S3. Ans (c)

Sol. नवरात्र = नऊ रात्रींचा समूह .

ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण आहे व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो तेव्हा त्याला द्विगू/संख्यापूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

S4. Ans (a)

Sol. तेजः + पुंज = तेज:पुंज. हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे.

विसर्गाच्या मागे ‘अ’ हा स्वर आणि जर पुढे जर क, ख, प, फ यापैकी एखादे व्यंजन आले असेल तर तो विसर्ग कायम राहतो.

S5. Ans (b)

Sol. उमेश हे गुणादेश स्वरसंधीचे उदाहरण आहे.

उमेश = उमा +ईश

S6. Ans (c)

Sol. तपोधाम = तपः + धाम. तपोधाम हे विसर्ग ‘उ’ कार संधीचे उदाहरण आहे.

S7. Ans (a)

Sol. व्यंजनसंधी = व्यंजन +व्यंजन / व्यंजन + स्वर

S8. Ans (c)

Sol. स्वार्थ चा विरुद्धअर्थी शब्द परमार्थ आहे.

S9. Ans (d)

Sol. भंग चा विरुद्धअर्थी शब्द अभंग हा आहे.

S10. Ans (c)

Sol. आवक चा विरुद्धअर्थी शब्द जावक हा आहे.

FAQs : Marathi Language Quiz for  Competitive Exams 

Q1. Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

Q2. मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

Q3. या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

Q4. अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.

 

 लेटेस्ट महाराष्ट्र नोकरी सरकारी  माझी नोकरी 2023
 मुख्य पृष्ठ अड्डा 247 मराठी
 अड्डा 247 मराठी प्रश्न दैनिक  प्रश्ने

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी ॲप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Marathi Language Quiz Competitive Exams : 23 september 2023_4.1

Sharing is caring!

FAQs

Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.