Table of Contents
MPSC Group B & C Mains Paper 2 Special Quiz: स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी समाविष्ट करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. MPSC Group B & C Mains Paper 2 Special Quiz ही आपली पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. MPSC Group B & C Mains Paper 2 Special Quiz चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो. आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण MPSC Group B & C Mains Paper 2 Special Quiz चा प्रयत्न करू शकता. या क्विझमध्ये आपल्याला MPSC Group B & C Mains Paper 2 मधील सर्व विषयांच्या प्रश्नांचा पुरेपर सराव पाहावयास मिळणार आहे. या क्विझ चे विशेष असे की,यामधील सर्व प्रश्नांच्या उत्तरांचे आपल्याला तपशीलवार निरसन आणि विश्लेषण आमच्या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून लाईव्ह पाहायला मिळणार आहे.या क्विझ च्या नित्य सरावाने आपलयाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे.
MPSC Group B & C Mains Paper 2 Special Quiz
MPSC Group B & C Mains Paper 2 Special Quiz चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C इ. या मध्ये तयारी वाढवण्यासाठी हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यातच आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल.MPSC Group B & C Mains Paper 2 Special Quiz आपली 2023 च्या स्पर्धा परीक्षेची तयारी वर्धित करते. तर चला आजची क्विझ पाहुयात.
MPSC Group B & C Mains Paper 2 Special Quiz
Q1. अ) सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म 1 जानेवारी 1894 ला कोलकाता येथे झाला.
ब) त्यांना 1954 मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण सन्मान बहाल केला.
क) पदार्थाची पाचवी अवस्था BEC संशोधनात त्यांचे मोठे योगदान आहे.
वरीलपैकी सत्य विधान/विधाने कोणती ?
(a) फक्त अ
(b) फक्त ब, क
(c) फक्त अ, ब
(d) अ, ब, क तिन्ही
Q2. खालील धातूंचा अभिक्रियाशीलतेप्रमाणे योग्य चढता क्रम लावा.
अ) लोखंड
ब) झिंक
क) कॅल्शिअम
ड) पारा
(a) ब, क, ड, अ
(b) ड, अ, ब, क
(c) ब, क, अ, ड
(d) ड, अ, क, ड
Q3. खालील विधानांचा विचार करा.
अ) लाल रक्तपेशी या केंद्रक नसलेल्या पेशी आहेत.
ब) ऊंट असा स्तनधारी प्राणी आहे, की त्याच्या लाल रक्तपेशीमध्ये केंद्रक आढळतो.
(a) अ बरोबर
(b) ब बरोबर
(c) अ, ब चूक
(d) अ, ब बरोबर
Q4. खालीलपैकी कोणते मूलभूत एकक आहे.
(a) वॅट
(b) ज्यूल – प्रतिसेकंद
(c) ॲम्पीअर
(d) न्यूटन
Q5. काही धातूंच्या ऑक्साईडला आम्लारीधर्मी ऑक्साइड म्हणतात, कारण की
(a) धातूंचे ऑक्साइड पाण्यात विरघळत नाही.
(b) धातूंचे सर्व ऑक्साइड आम्लारी असतात.
(c) धातूंचे ऑक्साइड पाण्यात विरघळयानंतर आम्लारी तयार करतात.
(d) यापैकी नाही
Q6.अ) वायूंना विशिष्ट आकार व आकारमान दोन्ही नसतात.
ब) वायूंमध्ये आंतरआण्वीय बंध अतिशय क्षीण नसतो.
वरील विधान व स्पष्टीकरणाच्या आधारावर खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
(a) विधान अ योग्य मात्र ब त्याचे उचित स्पष्टीकरण नाही.
(b) विधान ब योग्य मात्र अ विधानाशी संयुक्तिक नाही.
(c) विधान अ व ब दोन्ही चूक आहेत.
(d) विधान अ योग्य असून ब त्याचे योग्य स्पष्टीकरण आहे.
Q7. आवर्तसारणीत 11 अधातू वायू अवस्थेत आहेत, तर उर्वरीत स्थायू अवस्थेत. म्हणजेच अधातू हे स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात, मात्र एक मूलद्रव्य या गुणधर्माला अपवाद आहे. तो मूलद्रव्य खालीलपैकी कोणता ?
(a) ब्रोमीन
(b) क्लोरीन
(c) स्कॅन्डीअम
(d) आयोडीन
Q8. खालील विधानांचा विचार करा.
अ) RBC (लाल रक्तपेशी) या गोलाकार, व्दिअंतर्वक्र आणि केंद्रक नसलेल्या पेशी असतात.
ब) लाल रक्तपेशीला ल्युकोसाइट (Leucocyte) म्हणतात.
क) WBC (पांढ-या पेशी) RBC (लाल रक्तपेशी) पेक्षा आकाराने मोठया असतात.
ड) पांढ-या पेशीला एरिथरोसाइट म्हणतात.
(a) अ, ब बरोबर
(b) अ, क बरोबर
(c) क, ड बरोबर
(d) ब, ड बरोबर
Q9. अ) फ्लोरोसंट टयूब तसेच निऑन टयूब यात प्लाझ्मा असतो.
ब) आकाशात तारे चकाकण्याचे कारण प्लाझ्मा अवस्था आहे.
क) राष्ट्रीय प्लाझ्मा संशोधन केंद्र चेन्नई येथे आहे.
वरीलपैकी असत्य विधान कोणते ?
(a) फक्त अ
(b) फक्त ब
(c) फक्त क
(d) वरील सर्व
Q10. सोडियम कायम रॉकेलच्या बाटलीत ठेवतात, कारण
(a) हा जास्त क्रियाशील धातू आहे.
(b) हा कमी क्रियाशील धातू आहे.
(c) सोडियमचे ऑक्साईड आम्लारीधर्मी असतात म्हणून
(d) यापैकी नाही
ॲप मध्ये प्रश्ने सोडवण्यासाठी, वेळेसह, आणि ऑल इंडिया रॅंक पाहण्यासाठी ॲप डाउनलोड करा Click here
युट्युब चॅनेल- अड्डा 247 मराठी ॲप | अड्डा 247 मराठी वेबसाईट
अड्डा 247 मराठी ॲप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
MPSC Group B & C Mains Paper 2 Special Quiz solutions-
Solutions:
S1. Ans (d)
Sol. वरील तिन्ही विधाने अ, ब आणि क सत्य आहेत.
For detailed solution and analysis visit the channel on 04 November 2023 at 10.30 am.
तपशीलवार निरसन आणि विश्लेषणासाठी 04 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता या चॅनलला भेट द्या.