Marathi govt jobs   »   Study Materials   »   Nutrition and Food

Food and Nutrition: Study Material for Non-Gazetted Exam 2023 | पोषण आणि आहार

Food and Nutrition

Food and Nutrition: Knowledge about proper Food and Nutrition is essential for normal growth and development. Malnutrition affects not only physical growth and development but also adversely affects a person’s intellectual ability, cognition, and behavior. Food and Nutrition is a very important topic in Science Subject. Adda247 Marathi is publishing an article series for you on important factors for all upcoming exams. In this article, you will get detailed information about Food and Nutrition.

Food and Nutrition: Overview

It is necessary to take a healthy diet for a healthy body. If a person uses the right nutrition, then he can avoid many diseases. Get an overview of Food and Nutrition in the table below.

Food and Nutrition: Overview
Category Study Material
Subject General Science
Article Name Food and Nutrition
Useful for All competitive Exams

Food and Nutrition

Food and Nutrition: अन्न हे असे पदार्थ आहेत जे एखाद्या जीवाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असतात. सर्व सजीवांना अन्नाची गरज असते, काही जीव जसे की वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न बनवतात तर प्राणी त्यांचे अन्न वनस्पती आणि इतर प्राण्यांकडून मिळवतात. त्यासाठी आपणास Food and Nutrition या घटकाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. MPSC Non Gazetted Services Exam 2023 च्या दृष्टीने Food and Nutrition हा घटक फार महत्वाचा आहे. Food and Nutrition हा घटक विज्ञान विषयात येतो. तसेच तलाठी भरती (Talathi Bharti 2023), कृषी विभाग भरती (Krushi Vibhag Bharti 2023) आणि इतर सरळ सेवा भरती मध्ये या घटकावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. Adda247 मराठी आपणासाठी आगामी सर्व परीक्षांसाठी महत्वपूर्ण घटकांवर एक लेखमालिका प्रसिद्ध करत आहे. आज या लेखात आपण Food and Nutrition बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Food and Nutrition | आहार आणि पोषण

Food and Nutrition:  वाढ आणि विकास सर्वसामान्य तऱ्हेने होण्यासाठी सुयोग्य पोषण आवश्यक असते. कुपोषणामुळे केवळ शारीरिक वाढ व विकास नव्हे त व्यक्तिच्या बौद्धिक क्षमतेवर तसेच आकलन शक्ती व वर्तनावर विपरीत परिणाम होतात. गरोदरपणात स्त्रीचे कुपोषण झाल्यास गर्भावर त्याचे वाईट परिणाम होतात. जसे की, मृत अपत्याचा जन्म, अपुऱ्या दिवसाचे मूल, पूर्ण दिवसाचे पण अपुऱ्या वाढीचे मुल इ. बालपणीच्या पूर्वार्धात कुपोषणामुळे शारीरिक व मानसिक वाढ मंद होते. अशी बालके (माईल स्टोन) फार हळुहळु वाढतात. माईल स्टोन म्हणजे – ठराविक कालावधीत बालकांच्या शारीरिक व मानसिक वाढ व विकासाने गाठलेल्या टप्पा अशी मुले शाळेतल्या अभ्यासातही मागे पडतात. प्रौढामध्ये देखिल सुयोग्य आरोग्य आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी चांगल्या पोषणाची आवश्यकता असते. थोडक्यात आपणास असे म्हणता येईल की, पोषणाचे बरे वाईट परिणाम माणसाच्या आयुष्यावर जन्मापासून मृत्यू पर्यंत होत असतात.

Indus Valley Civilization In Marathi
Adda247 Marathi App

Indus Valley Civilization

Food and Nutrition: Dietary elements or basics | पोषण आणि आहाराचे घटक किंवा मूलतत्त्वे

Food and Nutrition- Dietary elements or basics: सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांच्या वाढ व इतर सर्व कामासाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात आणि या कामासाठी उपयोगी पडणाऱ्या अन्न घटकांना पोषकतत्वे म्हणतात. आपण खातो त्या विविध अन्नपदार्थांमध्ये ही पोषक तत्त्वे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. आपल्या अन्नातील पोषकतत्वे खालीलप्रमाणे आहेत. 

nutrition and food
पोषक अन्न घटक
  1. उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. (मुख्यत: पिठूळ पदार्थ)
  2. शरीराच्या घडणीसाठी लागणारे पदार्थ: प्रथिने.
  3. चयापचयासाठी व प्रतिकारशक्तीसाठी सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असणारी विविध जीवनसत्त्वे
  4. क्षार : लोह, चुना, इत्यादी खनिज पदार्थ
  5. पाणी (रोजची गरज एक ते दीड लिटर)
  6. मलविसर्जनासाठी व पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारा चोथा

Importance Of Plant Nutrients

Food and Nutrition: Dietary element – Carbohydrates | आहाराचे घटक – कर्बोदके

Dietary element – Carbohydrates: शरीरातले प्रत्येक काम पार पाडण्यासाठी कार्यशक्तीची गरज लागते. मोटारसायकलला जसे पेट्रोल लागते, इंजिनाला डिझेल, कोळसा लागतो, पंपाला वीज लागते, मोबाईल फोनला जसे चार्जिंग लागते तशीच शरीराला या कार्यशक्तीची गरज असते. ही कार्यशक्ती उष्मांकाच्या भाषेत समजावून घेऊया. एक उष्मांक म्हणजे एक कॅलरी. आहारशास्त्रात किलो कॅलरी हे माप वापरतात. एक किलो कॅलरी म्हणजे एक लिटर पाण्याचे तापमान एक सेंटीग्रेडने वाढवायला जेवढी कार्यशक्ती (उष्णता) लागते तेवढी. आपल्याला माहीत आहेच, की सर्व विश्वातली शक्ती किंवा ऊर्जा ही निरनिराळया स्वरूपांत बदलू शकते.उदा. सूर्याची प्रखर उष्णता किंवा आग पाण्याची वाफ करते आणि ही वाफ कोंडून ती शक्ती वापरता येते. समुद्रावर तयार होणारे वारे लाटा निर्माण करतात आणि या लाटा किंवा वारा वापरून (पाणचक्की, पवनचक्कीने) वीज तयार करता येते. ही वीज वापरून अनेक प्रकारची कामे करता येतात. म्हणजेच ऊर्जा किंवा कार्यशक्ती ही अनेक रूपांत मिळते.

स्त्रोत: फळे, भाज्या आणि मध, साखर मध्ये सुक्रोज आणि दुधात लैक्टोज, तर कॉम्प्लेक्स पॉलीसेकेराइड्स अन्नधान्य, बाजरी, डाळी

Food and Nutrition: Dietary element – Protin | आहाराचे घटक – प्रथिने

Dietary element – Protin: प्रथिने ही नत्रयुक्त आम्लांची (nitric acid) बनलेली असतात. शरीराच्या बांधणीत प्रथिने हा मुख्य घटक असतो. याशिवाय शरीरातल्या अनेक कामांसाठी प्रथिने ही यंत्रे,हत्यारे आणि उपकरणे म्हणून वापरली जातात. आपण स्नायूंचे उदाहरण घेऊ या. स्नायू अनेक तंतूंचे बनलेले असतात. हे स्नायूतंतू म्हणजे विशिष्ट अणुरचना असणारी दोन प्रकारची प्रथिने असतात. त्यांचे वैशिष्टय म्हणजे ती एकमेकांवर सरकून स्नायूंची लांबी कमी होते (स्नायूंचे आकुंचन) आणि परत सैल होण्यासाठी ती प्रथिने एकमेकांपासून लांब सरकतात. हे काम प्रथिनांमुळेच होते.

दुसरे उदाहरण श्वसनाचे. रक्तातल्या तांबडया पेशीत हिमोग्लोबीन नावाचे प्रथिन असते. या प्रथिनाला प्राणवायूचे आकर्षण असते व त्यामानाने कार्बवायूचे कमी आकर्षण असते. या विशिष्ट गुणधर्मामुळे फुप्फुसात रक्तपेशी प्राणवायू घेऊन कार्बवायू सोडतात.

स्त्रोत : तृणधान्ये, बाजरी आणि डाळींचे मिश्रण, दुध, अंडी, मांस

Food and Nutrition: Dietary element – Vitamins and minerals | आहाराचे घटक – जीवनसत्व व खनिजे

Dietary element – Vitamins and minerals: जीवनसत्त्वे ही रासायनिक संयुगे असतात जी शरीराला कमी प्रमाणात आवश्यक असतात. ते आहारात असणे आवश्यक आहे कारण ते शरीरात संश्लेषित केले जाऊ शकत नाही. शरीरातील असंख्य प्रक्रियांसाठी आणि त्वचा, हाडे, नसा, डोळा, मेंदू, रक्त आणि श्लेष्मल त्वचा यांच्या संरचनेसाठी जीवनसत्त्वे आवश्यक असतात. ते एकतर पाण्यात विरघळणारे किंवा चरबी-विद्रव्य असतात.

खनिजे शरीरातील द्रव आणि ऊतींमध्ये आढळणारे अजैविक घटक आहेत. महत्त्वपूर्ण मॅक्रो खनिजे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सल्फर आहेत, तर जस्त, तांबे, सेलेनियम, मोलिब्डेनम, फ्लोरीन, कोबाल्ट, क्रोमियम आणि आयोडीन हे सूक्ष्म खनिजे आहेत. ते त्वचा, केस, नखे, रक्त आणि मऊ ऊतकांच्या देखभाल आणि अखंडतेसाठी आवश्यक आहेत. ते तंत्रिका पेशींचे संचरण, acidसिड/बेस आणि द्रव संतुलन, एंजाइम आणि संप्रेरक क्रियाकलाप तसेच रक्ताच्या गोठण्याच्या प्रक्रियेस देखील नियंत्रित करतात.

जीवनसत्वे स्त्रोत व त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार

जीवनसत्व

(Vitamins)

शास्त्रीय नाव

(Scientific Name)

शरीराला आवश्यक का आहे?

(What we use it for?)

स्त्रोत

(Sources)

कमतरतेमुळे होणारे आजार

(Difficiency due to lack of vitamins) 

A रेटिनॉल

(Retinol)

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणे हिरव्या भाज्या जसे कि पालक, मेथी, हरबरा, दुध, मका, मोड आलेले कडधान्य रातांधळेपणा
B-1 थायमिन

(Thymin)

B जीवनसत्व विकारांसोबत चयापचय क्रियेत सहभागी होते हिरव्या भाज्या जसे कि पालक,  हरबरा, दुध, मांस, अंडी, काजू, बटाटा, सफरचंद, चिकू
  • बेरीबेरी
  • डायरिया
  • पेलाग्रे
B-2 रायबोफ्लेवीन

(Rayaboflevin)

B-3 निओक्सिन

(Niacin)

B-5 पँटोथिनिक ऍसिड

(Pantothenic Acid)

B-7 बायोटीन

(Biotin)

B-9 फॉलीक ऍसिड

(Folic Acid)

 

B-12 कोबालमिन

(Cobalamin)

C अँस्कॉर्बिक ऍसिड

(Ascorbic acid)

  • कुठलीही जखम लवकरात लवकर भरण्यास मदत होते.
  • जेवणातील जास्तीत जास्त लोह शोषून घेते.
  • रक्तातील केश वाहिन्यांची कार्यक्षमता वाढवितो.
आंबट फळे, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, पेरू, चिंच स्कर्व्ही
D कॅल्शिफेरॉल

(Calciferol)

  • हाडे मजबूत करणे
  • हाडे व दाताचा विकास करून मजबूत करणे
  • जखम झाल्यानंतर रक्त लवकर थांबणे (जमा होणे)
कोवळे सूर्यकिरण, अंडी, मासे, कॉड लिव्हर ऑइल
  • मूडधूस,
  • रिकेट्स
  • ऑस्टियोमलेशिया

 

E टोकोफ़ेरल

(Tocopherol)

चरबीयुक्त पदार्थांना सामोरे जाणाऱ्या ऊती आणि पेशीच्या पडद्याच्या निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. वनस्पती तेल आणि इतर अनेक खाद्यपदार्थ प्रजनन क्षमता कमी होणे

Blood Circulatory System

Food and Nutrition: Balance Diet | संतुलित आहार

Balance Diet: संतुलित आहाराच्या कल्पनेप्रमाणे जेवणात पिठूळ पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने,क्षार, जीवनसत्त्वे या सर्वांचा पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी या धान्यांबरोबर डाळी, शेंगदाणे, भाजीपाला, फळभाजी, फळे, तेल, तूप इतक्या गोष्टी आवश्यक असतात. हे पदार्थ अगदी रोज नाही तरी आठवडयातून दोन-तीन वेळेस अदलून बदलून मिळावेत. दूध हा तसा संपूर्ण पण महाग आहार आहे. दूध, शेंगदाणे, इत्यादींतून मिळणारी प्रथिने तुलनेने ‘महाग’ प्रथिने आहेत आणि ज्वारी, बाजरीतून मिळणारी प्रथिने स्वस्त आहेत. प्राणिज पदार्थ, मांस, मासे, अंडी ही महाग प्रथिने आहेत. त्यातल्या त्यात अंडे सर्वात स्वस्त व परिपूर्ण प्राणिज प्रथिन आहे.

चौरंगी आहार कल्पना

आहारशास्त्र सर्वांना सोपे करून सांगण्यासाठी चौरंगी आहार ही कल्पना चौरस आहार म्हणून सांगता येईल. चौरंगी म्हणजे चार रंग. पांढरा, पिवळा हिरवा, लाल. कोणत्याही जेवणात हे चार रंग असावे म्हणजे आहार चौरस होतो.

food pyramid
संतुलित आहार पिरॅमिड

पांढरा – भात, कांदा, लसूण, अंडे, दूध, फ्लॉवर, कोबी
पिवळा – भाकरी, चपाती, वरण, पिवळी फळे, लिंबू, भोपळा, पेरु
हिरवा – हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या
लाल – फळभाज्या, (टोमॅटो), गाजर, मांस, मिरची
(यातील मांसाहारी पदार्थ ऐच्छिक आहेत) ही कल्पना वापरून आहारात समतोलता आणता येते.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

World Health Organization (WHO)
Adda247 Marathi Telegram
Article Name Web Link App Link
The World’s 10 Smallest Countries 2023 Click here to View on Website Click here to View on App 
Important List of Sports Cups and Trophies Click here to View on Website Click here to View on App 
Interesting Unknown Facts about Indian Constitution Click here to View on Website Click here to View on App 
PM Kisan Samman Nidhi Yojana 2023 Click here to View on Website Click here to View on App 
Importance of Plant Nutrients Click here to View on Website Click here to View on App 
Important Days in March 2023 Click here to View on Website Click here to View on App 
Pala Empire in Marathi Click here to View on Website Click here to View on App 
Quit India Movement 1942 Click here to View on Website Click here to View on App 
Chalukya Dynasty in Marathi Click here to View on Website Click here to View on App 
Atharva Veda In Marathi Click here to View on Website Click here to View on App 
Puranas In Marathi Click here to View on Website Click here to View on App 
Emperor Ashoka In Marathi Click here to View on Website Click here to View on App 
Gupta Empire In Marathi Click here to View on Website Click here to View on App 
Kalidasa in Marathi Click here to View on Website Click here to View on App
Rig Veda in Marathi Click here to View on Website Click here to View on App
Buddhist Councils In Marathi Click here to View on Website Click here to View on App
Oscars 2023 Winners List in Marathi Click here to View on Website Click here to View on App
16 Mahajanapadas Click here to View on Website Click here to View on App
Chandragupta Maurya In Marathi Click here to View on Website Click here to View on App
Upnishad in Marathi Click here to View on Website  Click here to View on App
Maharashtra Budget 2023 Click here to View on Website  Click here to View on App
Economic Survey of Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247 Prime
Maharashtra Prime Test Pack 2023-2024

Sharing is caring!

FAQs

What is the scientific name of Vitamin B-1?

The scientific name of vitamin B-1 is thiamine.

Which vitamin is obtained from young sunlight?

Vitamin D is obtained from young sunlight.

What is a balanced diet?

A balanced diet is a diet that includes sufficient amounts of fatty foods, fatty foods, proteins, salts, vitamins..