Marathi govt jobs   »   Study Materials   »   Maharashtra Budget 2023

Maharashtra Budget 2023 – Highlights and Key Features: Study Material for Talathi Bharti 2023 | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023

Table of Contents

Maharashtra Budget 2023-24

Maharashtra Budget 2023: Maharashtra Budget 2023-24 has been presented by the Finance Minister and Deputy Chief Minister Devendra Fadnavis. He has introduced a new method of budget presentation in the state this year. This year, for the first time, the state budget was read on an iPad. Finance Minister Devendra Fadnavis has started this new practice.

On 09 March 2023 Deputy Chief Minister and Finance Minister of Maharashtra Shri. Devendra Fadnavis presented the budget of Maharashtra in Vidhan Bhavan. Today in this article we are going to see information about Maharashtra Budget 2023.

Must Read: Talathi Study Plan

Maharashtra Budget 2023: Overview

Maharashtra Budget 2023 is presented by Finance Minister Shri Devendra Fadanvis on 09 March 2023 in Legislative Assembly and Education Minister Shri. Deepak Kesarkar presented Maharashtra Budget 2023 in Legislative Council. Get an overview of Maharashtra Budget 2023 in this article.

Maharashtra Budget 2023
Category Study Material
Useful for Exam All Competitive Exam
Article Name Maharashtra Budget 2023
Presented by Shri. Devendra Fadnavis
Maharashtra Budget 2023 Date 09 March 2023

Maharashtra Budget 2023 in Marathi

Maharashtra Budget 2023 in Marathi: बजेट म्हणजे देशाचा वर्षभरासाठीचा जमाखर्च. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुढच्या आर्थिक वर्षात आपल्याकडे किती पैसे गोळा होण्याचा अंदाज आहे आणि यातले किती पैसे, कुठे खर्च करायचा बेत आहे याबाबदचे विवरणपत्र होय. दिनांक 09 मार्च 2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर केला. आगामी काळातील तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023 आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24 फार महत्वाचा घटक आहे. आज या लेखात आपण Maharashtra Budget 2023 बद्दल माहिती पाहणार आहे.

Maharashtra Budget 2023 | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023

Maharashtra Budget 2023 | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023

Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. त्यांनी यंदा अर्थसंकल्प सादरीकरणाची नवी पद्धत राज्यात आणली आहे. यंदा प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प आयपॅडवर वाचण्यात आला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नवी प्रथा सुरू केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत, तर दिपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला. आगामी आर्थिक वर्षात विविध कामांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची घोषणा फडणवीसांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शिवराज्याभिषेकासाठी 350 कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे.

अर्थसंकल्पातील पंचामृत 

  • शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
  • महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
  • भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
  • रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
  • पर्यावरणपूरक विकास

Maharashtra Budget 2023

Economic Survey of Maharashtra 2022-23

Maharashtracha Arthsankalp 2023-24: Key Points | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24 मधील प्रमुख मुद्दे

  • शाश्वत शेती समृध्द शेती. या योजनेसाठी एकूण 29163 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली जाईल. नमो शेतकरी महायोजना
  • प्रतिवर्ष केंद्र सरकार 6 हजार देतं त्यात अजून 6 हजार यांची भर घालतो. याचा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार
  • राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार
  • 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
  • भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार
  • जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती
  • शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट
  • हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रात 75,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
  • 15 वर्ष जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार
  • 8 ते 15 वर्षांत खाजगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत
  • एसटी महामंडळात 5150 इलेक्ट्रीक बसेस सुरु करणात
  • डिझेलवरील 5000 बसेस द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित करणार
  • पर्यावरण सेवा योजनेचा 7500 शाळांमध्ये विस्तार
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे. Maharashtra Budget 2023 मधील या पंचामृत’ ध्येयातील काही प्रमुख तरतरतुदी खालील तक्त्यात प्रदान केल्या आहेत.

Maharashtra Budget 2023
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023

Maharashtra Budget 2023-24: Sustainable Farming-Prosperous Farmers | शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी

Sustainable Farming-Prosperous Farmers: Maharashtra Budget 2023 मधील पहिले अमृत म्हणजे शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी होय. या पहिल्या अमृतामधील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 6 हजार रुपयांत राज्य सरकारची आणखी 6 हजार रुपयांची भर देण्यात आली आहे.
  • प्रधानमंत्री पीकविमा योजनेत शेतकन्याचा विमाहता राज्य सरकार भरणार शेतकन्यांना केवळ 1 रुपया भरून नोंदणी वार्षिक 3 हजार 312 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
  • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 12.84 लाख पात्र खातेधारकांच्या बँक खात्यात 4 हजार 683 कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले.
  • महाकृषिविकास अभियान जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा आगामी 5 वर्षांत या योजनेसाठी 3 हजार कोटी रुपये  मिळतील.
  • पानाची विक्री न तपासता 7/12 नोंदीवरील लागवडीच्या क्षेत्रप्रमाणात डीबीटीद्वारे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीसाठी शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दुप्पट दराने मदत बाधित शेतकऱ्यांना 7 हजार 93 कोटी रुपये निधी वितरित – सततच्या पावसासाठी मदतीचा निकष नव्याने समाविष्ट करण्यात येईल.
  • गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना विमा योजनेऐवजी अपघातग्रस्त – शेतकयांच्या कुटुंबास 1 लाख रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान
  • ‘महाराष्ट्र श्रीअन्न अभियान 200 कोटी रुपये तरतूद श्रीअन्नाच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पीक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मूल्य साखळी विकास आणि प्रचार प्रसिद्धी सोलापूर येथे श्री अन्न उत्कृष्टता केंद्राची’ स्थापना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन कृषि उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी – शेतकरी बांधवांना मुक्कामाची व शिवभोजन थाळीची सोय
  • देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्यफलन व प्रत्यारोपणाच्या सुविधेत वाढ महाराष्ट्र
  • गोसेवा आयोगाची स्थापना ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना’ आणि ‘गोमय – मूल्यवर्धन योजना’ या योजनांची अंमलबजावणी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून मेंढी, शेळी पालनाकरिता १० हजार कोटी
  • रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार
  • विकास महामंडळाची स्थापना मुख्यालय अहमदनगर
  • धनगर समाजाच्या उन्नतीकरिता आदिवासी उपयोजनेच्या धर्तीवर २२ योजनांसाठी एक हजार कोटी रुपये किमतीचा कार्यक्रम त्याकरिता सर्वसाधारण योजनेतून आवश्यक निधी
  • विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक
  • शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी प्रतिवर्ष, प्रतिव्यक्ती 1800 रुपये रोख रक्कम नदीजोड प्रकल्प मुंबई शहर आणि गोदावरी खोऱ्यातील तूट दूर करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राज्य शासनाच्या निधीतून करण्यात येतील. मराठवाड्यासहित उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि जळ
  • नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन – आगामी 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली १,००० जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्रांची स्थापना तीन वर्षांत 1 हजार कोटी रुपये मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार मागेल त्याला फळबाग, ठिबक सिंचम
  • शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे आणि कॉटन
  • श्रेडर 1 हजार कोटी रूपये
  • सुमारे 200 कोटी रुपयांच्या भागभांडवलासह कोकणासाठी काजू बोर्डाची निर्मिती – कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्रे
  • ‘काजू फळ विकास योजना’ संपूर्ण कोकण, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा या तालुक्यांत राबविण्यात येईल आगामी 5 वर्षांत 1 हजार 325 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी आगामी 3 वर्षांत 20 टक्के कृषि वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण सुमारे ९.५० लाख शेतकयांना लाभ प्रधानमंत्री – योजनेतून 1.50 लाख सौर कृषि पंप कुसूम
  • नादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉर्मर्स तात्काळ बदलण्यासाठी ‘निरंतर वीज योजना’
  • सन 2023-24 मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत 17 लाख 72 हजार कुटुंबांना नळजोडणी सुमारे 20 हजार कोटी रुपये
  • जलयुक्त शिवार योजना 2.0 प्रारंभ करून ती 5 हजार गावांमध्ये राबविण्यात येणार
Maharashtra Budget 2023
प्रथम अमृत

Maharashtra Budget 2023-24: Inclusive Development of all Sections of Society | सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

Inclusive Development of all Sections of Society: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील (Maharashtra Budget 2023) दुसरे अमृत म्हणजे महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास होय. या दुसऱ्या अमृतामधील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • ‘मोदी आवास’ घरकुल योजना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधणार. या योजनेसाठी येत्या 3 वर्षांत 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देणार
  • ‘लेक लाडकी’ – पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर, इयत्ता पहिली, सहावी, अकरावीच्या टप्प्यांवर 4 ते 8 हजार रुपये अनुदान – 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये रोख रक्कम देणार
  • महिलांना एसटी बस तिकीटात 50 टक्के सवलत
  • नोकरदार महिलांसाठी 50 वसतिगृहे
  • पिडीत महिलांच्या आश्रयासाठी विधी सेवा, आरोग्य सेवा, समुपदेशन यासाठी नवीन शक्तीसदन योजनेत 50 केंद्रे स्थापन करणार
  • आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मानधनात प्रत्येकी 1 हजार 500 रुपये एवढी वाढ करणार
  • अंगणवाडी सेविकांचे मानधन 10 हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 7 हजार 200 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 5 हजार 500 रुपये करणार
  • अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची 20 हजार रिक्त पदे भरणार
  • महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक 1.50 लाखांवरुन 5 लाख रुपये करणार. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या दरात 2.50 लाखांहून 4 लाख रुपये इतकी वाढ करणार
  • संपूर्ण राज्यात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ – 700 दवाखाने सुरू करणार-विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार
  • संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1000 वरून 1500 रुपये. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदान करणार
  • गुढीपाडवा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 1 कोटी 63 लाखाहून अधिक कुटुंबाना आनंदाचा शिधा वाटप करणार
  • लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी ‘जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी ‘संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ’, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ’ वडार समाजासाठी ‘पैलवान के. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ यांची स्थापना
  • 3 कोटींहून अधिक कामगारांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करणार
Maharashtra Budget 2023
द्वितीय अमृत

Maharashtra Budget 2023: Development of Infrastructure with Substantial Capital Investment | भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

Development of Infrastructure with Substantial Capital Investment: Maharashtra Budget 2023 मधील भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास या अमृतामधील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करून
  • सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी महामार्ग बांधणार
  • महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग (पवनार ते पात्रादेवी) – नागपूर-गोवा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग- 86 हजार 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित
  • पुणे रिंगरोडचे भूसंपादन, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंकचे बांधकाम, विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका, ही कामे करणार. रेवस ते सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रेड्डी या सागरी महामार्गाचे काम सुरू
  • सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एशियन डेव्हलपमेंट बँक, हायब्रीड अँन्युईटी व इतर नियमित योजनांमधून सुमारे 18 हजार किलोमीटर लांबीची रस्ते सुधारणा आणि 4 हजार 500 किलोमीटर लांबीच्या जिल्हा व ग्रामीण मार्गांची कामे हाती घेणार
  • सर्व आदिवासी पाडे बारमाही रस्त्यांनी जोडण्यासाठी नवीन बिरसा मुंडा जोडरस्ते योजना’, सर्व बंजारा तांड्यांसाठी ‘संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना’ तसेच सर्व धनगर वाड्या-वस्त्यांसाठी’ यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना सुरू करणार – 4 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार
  • मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेत रस्ते योजनेत सुधारणा करून नवीन योजना सुरू करणार
  • ठाणे शहराचा वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प, नाशिक मेट्रो निओ प्रकल्प, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरीडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर प्रकल्पांची कामे हाती घेणार
  • कल्याण-मुरबाड, नाशिक-पुणे वा सेमीहायस्पीड, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव, नांदेड- बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना तसेच वरोरा- चिमूर-कांपा या नवीन रेल्वेमार्गांसाठी ५० टक्के राज्यहिस्सा देणार
  • शिर्डी विमानतळ येथे नवीन प्रवासी टर्मिनल, छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 724 कोटी रुपये निधी, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारव पुरंदर येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियोजन करणार
  • नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये, अमरावतीतील बेलोरा आणि अकोल्यातील शिवणी या विमानतळांच्या कामाचे नियोजन करणार
  • मुंबई मेट्रो मार्ग 10, 11 व 12 हे प्रकल्प लवकरच पूर्ण करणार
  • राज्यातील सीमावर्ती भागातील गावांमध्ये ग्रामविकासाच्या विविध योजना राबविणार
  • मुंबई सभोवताल जलसाठाणेच वसई खाडी एकमेकांना जोडणार, दक्षिण मुंबईहून कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई खाडी, नवी मुंबई अशी जलमार्गाने प्रवासी वाहतूक करण्याकरिता जेट्टी व संबंधित सुविधा
Maharashtra Budget 2023
तृतीय अमृत

 

Maharashtra Budget 2023: Employment Generation | रोजगारनिर्मिती

Employment Generation: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील (Maharashtra Budget 2023) चौथे अमृत रोजगारनिर्मिती: सक्षम, कुशल – रोजगारक्षम युवा होय. या चौथ्या अमृतामधील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • महाराष्ट्राचे नवीन लॉजिस्टिक धोरणांतर्गत नागपूर येथे 1 हजार एकर जमिनीवर लॉजिस्टीक हब तयार करणार
  • केंद्र शासनाच्या रिड्युस, रियुज, रिसायकल या तत्त्वावर आधारित नागपूर, मुंबई महानगर प्रदेश, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व रत्नागिरी या सहा ठिकाणी सर्क्युलर ईकॉनॉमी पार्क उभारणार
  • नवी मुंबई येथे भव्य जेम्स व ज्वेलरी पार्क उभारणार
  • स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराकरिता 500 ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करणार
  • पुढील तीन वर्षांत 2 हजार 307 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करून राज्यातील 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ करणार
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 नुसार 816 शाळांना पीएमश्री शाळा’ म्हणून विकसित करणार पुढील पाच वर्षात 1 हजार 534 कोटी रुपये निधी उपलब्ध करणार
  • सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील अंबरनाथ या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये बांधणार
  • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दहा पर्यटनस्थळांवर ‘टेंट सिटी” उभारणार
Maharashtra Budget 2023
चतुर्थ अमृत

Maharashtra Budget 2023: Environment Friendly Development | पर्यावरणपूरक विकास

Employment Generation: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील (Maharashtra Budget 2023) पाचवे अमृत पर्यावरणपूरक विकास होय. या पाचव्या अमृतामधील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर व पवन ऊर्जा या क्षेत्रात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित
  • 20 हजार ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प उभारणार
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी व पक्षी उद्यान येत्या वर्षी सुरु करणार, शिवनेरी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे बिबट सफारी सुरू करणार
Maharashtra Budget 2023
पंचम अमृत

Maharashtra Budget 2023 मधील पंचामृतामधील सर्व ठळक मुद्दे वर दिले आहेत. आता Maharashtra Budget 2023 मधील प्रमुख घटकांना या अर्थसंकल्पातून काय मिळाले किंवा या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या विविध योजना / सवलती देण्यात आल्या आहेत याबद्दल माहिती खाली प्रदान करण्यात आले आहे.

Maharashtra Budget 2023 For Farmers | महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठी तरतूद

Maharashtra Budget 2023 For Farmers: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठी तरतूद खालीलप्रमाणे आहे.

  • वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना
  • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा
  • दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ
  • प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप
  • प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
  • उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्‍यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत मिळणार

Maharashtra Budget 2023 For Women | महिलांसाठी योजना

Maharashtra Budget 2023 For Women: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 (Maharashtra Budget 2023) मधील महिलांसाठी लागू असणाऱ्या योजना / सवलत यातील प्रमुख घोषणा खालीलप्रमाणे आहे.

  • राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
  • चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
  • महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
  • कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
  • मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
  • महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
  • माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
  • अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रीकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना.

Maharashtra Budget 2023 For Health Department | आरोग्य क्षेत्रातील घोषणा

Maharashtra Budget 2023 For Health Department: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 (Maharashtra Budget 2023) मधील आरोग्य क्षेत्रातील यातील प्रमुख घोषणा खालीलप्रमाणे आहे.

  • महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
  • नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
  • मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत करण्यात येतील.
  • राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारणार.
  • राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार.
  • सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे).
  • मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे

Union Budget 2023-24 in Marathi

Maharashtra Budget 2023 for infrastructure | पायाभूत सुविधा

Maharashtra Budget 2023 For infrastructure: पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 (Maharashtra Budget 2023) मधील प्रमुख घोषणा खालीलप्रमाणे आहेत.

  • 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं राज्याचं लक्ष्य आहे.
  • सिंदखेड राजापासून ते शेगावपर्यंत चार पदरी रस्ता बांधणार.
  • सर्वांसाठी घरे या एका नवी घोषणा जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रस्तावित आहे.
  • इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’ राबवण्यात येईल.
  • प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे (2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)
  • रमाई आवास: 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये (किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)
  • शबरी, पारधी, आदिम आवास: 1 लाख घरे/1200 कोटी रुपये
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी (25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)

Maharashtra Budget 2023: Public Transport and Air Services Sector | सार्वजनिक वाहतूक आणि हवाई सेवा क्षेत्रातील तरतुदी

Maharashtra Budget 2023: Public Transport and Air Services Sector: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 (Maharashtra Budget 2023) मधील सार्वजनिक वाहतूक आणि हवाई सेवा क्षेत्रातील तरतुदी खालीलप्रमाणे आहेत.

  • शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी खर्चून उभारणार
  • छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
  • नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
  • पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी
  • बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे
  • मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला.
  • मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी, मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये.
  • मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये.
  • नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी.
  • पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर.
  • अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो.
  • सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये.
  • नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार.
  • सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल.
  • 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

World Health Organization (WHO)
Adda247 Marathi Telegram
Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

महाराष्ट्र टेस्ट मेट
Maharashtra Test Mate

Sharing is caring!

FAQs

Maharashtra Budget 2023 is released on which date?

Maharashtra Budget 2023 is released on 09 March 2023.

What is the definition of a budget?

A budget expresses intended expenditures along with proposals for how to meet them with resources.

Who presented Maharashtra Budget 2023?

Maharashtra Budget 2023 was presented by Devendra Fadnavis.