Marathi govt jobs   »   Study Materials   »   धारा विद्युत

धारा विद्युत (Current Electricity) | WRD भरतीसाठी अभ्यास साहित्य

धारा विद्युत (Current Electricity)

धारा विद्युत (Current Electricity): धारा विद्युत हा भौतिक शास्त्रातील एक महत्त्वाचा घटक आहे. तसेच मानवी जीवनात दैनंदिन उपकरणांमध्ये धारा विद्युत (Current Electricity) चा वापर होतो. आगामी काळातील WRD जलसंपदा विभाग भरती मध्ये विज्ञान विषयावर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यामुळे या घटकावर हमखास प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या लेखात आपण धारा विद्युत (Current Electricity) बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

धारा विद्युत: विहंगावलोकन

खालील तक्त्यात तुम्ही मृदा या घटकाचे विहंगावलोकन पाहू शकता.

धारा विद्युत: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता WRD भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय विज्ञान
टॉपिकचे नाव धारा विद्युत

धारा विद्युत

धारा विद्युत: एखादया सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सना जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला ‘धारा विद्युत‘ मिळते. जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युतप्रवाह वाहतो, तर कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युतप्रवाहाने होते. घरामध्ये तारांमधून, विजेच्या बल्बमधून, उपकरणांमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा तुम्हांला परिचय आहेच. रेडिओच्या विद्युत घटांमधून (electric cells) आणि मोटारीच्या बॅटरीमधून धनप्रभारित अन् ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युतप्रवाह निर्माण होतो.

विद्युतस्थितिक विभव (Electrostatic Potential)

विद्युतस्थितिक विभव (Electrostatic Potential): पाणी किंवा द्रव पदार्थ उंच पातळीतून खालील पातळीकडे वाहतात. उष्णता नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते. त्याचप्रमाणे धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युतपातळीच्या बिंदूपासून कमी विद्युतपातळीच्या बिंदूपर्यत वाहण्याची असते. विद्युतप्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युतपातळीस विद्युतस्थितिक विभव (electrostatic potential) असे म्हणतात.

विभवांतर (Potential difference):

विभवांतर (Potential difference): ‘धबधब्याची उंची’, ‘उष्ण व थंड’ वस्तूंच्या तापमानातील फरक, याचप्रमाणे दोन बिंदूच्या विभवांमधील फरक म्हणजे ‘विभवांतर‘ आपल्या दृष्टीने रोचक आहे.

विद्युतप्रवाह हा विद्युतप्रभारित कणांच्या वहनामुळे निर्माण होतो हे आपण पाहिले. एखादया तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युतप्रवाह म्हणता येईल. विद्युतप्रवाहाचे SI एकक कूलोम प्रति सेकंद म्हणजेच अँपिअर (Ampere) हे आहे.

1 Ampere = 1A = 1 Coulomb/1 second = 1 C/s विद्युतप्रवाह ही अदिश राशी आहे.

विद्युतघट (Electric cell):

विद्युतघट (Electric cell): एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युतप्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्त्रोताची गरज असते, असे एक सर्वसाधारण साधन म्हणजे विद्युतघट. विविध त-हेचे विद्युतघट आज उपलब्ध आहेत. ते मनगटी घड्याळांपासून पाणबुड्यांपर्यंत अनेक यंत्रांमध्ये वापरले जातात. विद्युतघटांपैकी सौरघट (solar cell) तुम्हांला माहीत असतील. विविध विद्युतघटांचे मुख्य कार्य त्याच्या दोन टोकांमधील विभवांतर कायम राखणे हे होय. विद्युतप्रभारावर कार्य करून विद्युतघट हे विभवांतर कायम राखतात.

विद्युतघट
विद्युतघट

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

FAQs

विभवांतर म्हणजे काय?

दोन बिंदूच्या विभवांमधील फरक म्हणजे 'विभवांतर'.

धारा विद्युत म्हणजे काय?

एखादया सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सना जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला 'धारा विद्युत' मिळते.