Marathi govt jobs   »   Study Materials   »   सहसंबंध

सहसंबंध (Analogy) – युक्त्या आणि प्रश्न, ZP भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

सहसंबंध (Analogy)

बुद्धिमत्ता चाचणी हा सर्व सरळसेवा भरती परीक्षांसाठी महत्वाचा घटक आहे. यातील तार्किक बुद्धीमत्तेमध्ये सहसंबंध हा महत्वाचा टॉपिक आहे. सहसंबंध या घटकरील प्रश्न विद्यार्थ्यांची तार्किक क्षमता तपासण्यासाठी आणि दोन घटकातील संबंध ओळखण्यासाठी केल्या जातो. यासाठी आपले सामान्य ज्ञान चांगले असणे आवश्यक आहे. आगामी काळातील जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या लेखात सहसंबंध (Analogy) या घटकावरील प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सहसंबंध: विहंगावलोकन

एकाद्या घटकाचा दुसऱ्या घटकाशी कोणता संबंध आहे हे उमेदवाराकडून जाणून घेण्यासाठी सहसंबंध या घटकावर प्रश्न विचारल्या जातात.

सहसंबंध: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता ZP भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय बुद्धिमत्ता चाचणी
टॉपिकचे नाव सहसंबंध (Analogy)
महत्वाचे मुद्दे
  • सहसंबंध या घटकाची संकल्पना
  • सहसंबंध या घटकावरील उदाहरणे

सहसंबंध या घटकाची संकल्पना

सहसंबंध या घटकावर सामान्यतः जर A : B तर C : ? यासारखे प्रश्न विचारलेले असतात. यात आपल्याला जा A चा B शी संबंध आहे त्याचप्रमाणे C चा संबंध प्रश्नात दिलेल्या कोणत्या पर्यायाशी तोच संबंध प्रस्तापित केल्या जाऊ शकतो. तो पर्याय आपल्याला निवडावा लागणार आहे. सहसंबंध या घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले सामान्य ज्ञान, अक्षरमाला आणि गणित याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.

के के वाघ एज्युकेशन सोसायटी भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

सहसंबंध या घटकावरील उदाहरणे

Directions (1-9): :: च्या एका बाजूला दिलेल्या दोन शब्दांमध्ये एक विशिष्ट संबंध आहे आणि एक शब्द :: च्या दुसर्‍या बाजूला दिलेला आहे, तर दिलेल्या पर्यायांमधून दुसरा शब्द शोधायचा आहे, ज्याचा समान संबंध आहे. दिलेल्या जोडीला हा शब्द आहे. सर्वोत्तम पर्याय निवडा. 
 
Q1. कांडला : गुजरात :: कोचीन : ? 
(a) कर्नाटक
(b) केरळ
(c) गोवा
(d) चेन्नई
उत्तर. (b)
स्पष्टीकरण: कांडला हे गुजरातमधील प्रसिद्ध सागरी बंदर आहे. त्याचप्रमाणे कोचीन हे केरळमधील प्रसिद्ध सागरी बंदर आहे.

Q2. टायपिस्ट : टंकलेखक :: लेखक : ?   
(a) एक पुस्तक
(b) कागद
(c) स्क्रिप्ट
(d) पेन
उत्तर. (d)
स्पष्टीकरण: जसा टंकलेखक टायपिस्ट मशीन वापरतो तसा  लेखक पेन वापरतो
Q3. अंदाज : भविष्य :: खेद : ?  
(a) भेटवस्तु
(b) प्रायश्चित
(c) भूतकाळ
(d) पापे
उत्तर. (c)
स्पष्टीकरण: अंदाज भविष्यातील घडामोडींसाठी असतो आणि पश्चात्ताप भूतकाळातील कृतींसाठी असतो.

Q4. सूर्य : भास्कर :: गणपती: ?  
(a) चंद्रशेखर
(b) इंद्र
(c) विनायक
(d) यापैकी नाही
उत्तर.(c)
स्पष्टीकरण: जसे सूर्याला भास्कर म्हणतात तसे गणपतीला विनायक म्हणतात.

Q5. भारत : रुपया : : जपान : ___
(a) डॉलर
(b) पौंड
(c) रियाल
(d) येन
उत्तर. (d)
स्पष्टीकरण: भारताचे चलन रुपया आहे त्याचप्रमाणे जपानचे चलन येन आहे.

Q6. लक्षद्वीप : कावरत्ती :: अंदमान निकोबार : ?  
(a) पोर्ट ब्लेअर
(b) दमण
(c) पाँडिचेरी
(d) सिल्वासा
उत्तर. (a)
स्पष्टीकरण: लक्षद्वीपची राजधानी कावरत्ती  आहे तसे अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर  आहे. 

Q7. वारा : चक्रीवादळ :: रिमझिम : ?  
(a) भूकंप
(b) वादळ
(c) पूर
(d) मुसळधार पाऊस
उत्तर. (d)
स्पष्टीकरण: जसे चक्रीवादळ हे वाऱ्याचे तीव्र रूप आहे तसे मुसळधार पाऊस हे रिमझिमचे तीव्र रूप आहे

Q8. REKM : UHNP : : PKDL : ?
(a) SNGO
(b) SGNO
(c) SNOG
(d) MHAG
उत्तर. (a)
स्पष्टीकरण: प्रत्येक अक्षरानंतरचे तिसरे अक्षर
Q9. 5 : 125 : : 11 : ?
(a) 1231
(b) 1331
(c) 1441
(d) 1551
उत्तर. (b)
स्पष्टीकरण: ज्याप्रमाणे 5 चा घन 125 आहे त्याचप्रमाणे 11 चा घन 1331 आहे.
 
Q3.  6 : 215 : : 8 : ?
(a) 510
(b) 511
(c) 512
(d) 520
उत्तर (b)
स्पष्टीकरण:
6³ – 1 = 215
8³ – 1 = 511
अड्डा 247 मराठी टेलिग्राम
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

ZP भरतीसाठी बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित
बुद्धिमत्ता चाचणी  अंकगणित
असमानता 
अंकमालिका
आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा अपूर्णांक व दशांश
अक्षरमालिका शेकडेवारी
वेन आकृती वेळ आणि काम
घनाकृती ठोकळे नफा व तोटा
सांकेतिक भाषा भागीदारी
दिशा व अंतर सरासरी
रक्त संबंध (Blood Relation) मसावी व लसावी
क्रम व स्थान (Order and Ranking) वर्ग / घन व त्याचे मुळ
घड्याळ (Clock) विभाज्यतेच्या कसोट्या
गणितीय क्रिया सरळव्याज सूत्र
गहाळ पद शोधणे चक्रवाढ व्याज
 बैठक व्यवस्था  

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सहसंबंध हा घटक कोणत्या विषयात येतो?

सहसंबंध हा घटक तार्किक बुद्धिमत्ता या घटकात येतो.

सहसंबंध या टॉपिकवरील प्रश्न कसे सोडवावे?

सहसंबंध या टॉपिकवरील प्रश्न सोडवतांना प्रश्नात दिलेल्या जोडीचा काय संबंध येतो त्यानुसार विचारल्या घटकाचा संबंध ज्या पर्यायाशी येतो तो पर्याय निवडायचा

सहसंबंध या टॉपिकवरील प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या विषयाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे?

सहसंबंध या टॉपिकवरील प्रश्न सोडवण्यासाठी सामान्य ज्ञान, अक्षरमाला आणि गणित विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.