दैनिक चालू घडामोडी: 9 जुलै 2021
चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 9 जुलै 2021चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.
राष्ट्रीय बातम्या
1. गांधीनगरमध्ये उभारले जाणारे भारताचे पहिले सागरी लवाद केंद्र
- गुजरात सागरी लवाद केंद्र (जीआयएमएसी) स्थापन करण्यासाठी गुजरात सागरी विद्यापीठ (गुजरात मेरीटाईम युनिव्हर्सिटीने) जीआयएफटी (गिफ्ट सिटी) शहरातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (आयएफएससीए) सह सामंजस्य करार (एमओयू) करार केला आहे.
- समुद्री व जहाज वाहतूक क्षेत्राशी संबंधित वादांकरिता लवाद आणि मध्यस्थी प्रक्रियेचे व्यवस्थापन करणारे जीआयएमएसी हे भारतातील पहिले केंद्र असून ते गांधीनगरमधील गिफ्ट सिटी येथे गुजरात मेरीटाईम बोर्डाने (जीएमबी) स्थापन केलेल्या सागरी समूहाचा हा भाग असेल.
- भारतीयांशी संबंधित सागरी विविदाची सुनावणी सिंगापूर लवाद केंद्रात केली जाते.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- गुजरातचे मुख्यमंत्री: विजय रुपाणी
- गुजरातचे राज्यपाल: आचार्य देवव्रत
राज्य बातमी
2. बंगळुरु स्थानकात भारतातील पहिले चल गोड्या पाण्यातील भुयारी मत्स्यालय स्थापित
- बंगळुरु शहर रेल्वे स्टेशन अथवा क्रांतिवीर सांगोली रयना रेल्वे स्टेशन परिसरात भारतातील पहिले चल गोड्या पाण्यातील भुयारी मत्स्यालय स्थापित करण्यात आले आहे.
- एचएनआय अॅक्वाटिक किंगडमच्या सहकार्याने भारतीय रेलवे स्टेशन विकास कोऑपरेशन लिमिटेड (आयआरएसडीसी) च्यावतीने अत्याधुनिक मत्स्यालय स्थापित केले आहे.
- अॅक्वाटिक किंगडम मत्स्यालय अॅमेझॉन नदीच्या संकल्पनेवर आधारित असून 12 फुट लांब आहे.
3. केरळ सरकार स्वत:चे ओटीटी मंच सुरु करणार
- केरळ सरकारने 1 नोव्हेंबर पासून स्वत:चा ओव्हर-द-टॉप (ओटीटी) मंच सुरु करण्याची योजना आखली आहे.
- मल्याळम चित्रपट आणि मालिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि इच्छुकांना कमी खर्चात आणि योग्य मोबदल्यात आपली लोकांपर्यंत पोहोचवता येईल या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय बातम्या
4. जगातील सर्वात उंच वाळूचा किल्ला (सँडकॅसल) डेन्मार्कमध्ये तयार करण्यात आला.
- डेन्मार्कमध्ये उभारण्यात आलेली सँडकॅसल ने सर्वात उंच वाळूचा किल्ला म्हणून जागतिक विक्रम करत गिनीज बुक मध्ये प्रवेश केला आहे.
- या त्रिकोणाकृती किल्ल्याची निर्मिती डेन्मार्कमधील ब्लोखस शहरात करण्यात आली असून त्याची उंची 21.16 मीटर (69.4 फूट) आहे.
- .जर्मनीतील सध्याच्या सर्वात उंच सँडकॅसल पेक्षा त्याची उंची 3.5 मीटर जास्त आहे.
- डच शिल्पकार विल्फ्रेड स्टीजर यांनी जगातील सर्वोत्तम 30 शिल्पकारांच्या साथीने या किल्ल्याची निर्मिती केली आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- डेन्मार्क राजधानी: कोपेनहेगन
- डेन्मार्क चलन: डॅनिश क्रोन
5. फेसबुकने “बुलेटिन” नावाचा वृत्तपत्र मंच सुरू केला
- अमेरिकेतील स्वतंत्र लेखकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फेसबुकने “बुलेटिन” नावाचा प्रकाशन आणि सदस्यता साधनांचा एक संच सुरु केला आहे.
- याचा उद्देश विद्यमान लेखन आणि ध्वनिमुद्रित साहित्यांना प्रोत्साहन देणे असा आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- फेसबुक स्थापना: फेब्रुवारी 2004
- फेसबुक मुख्य कार्यकारी अधिकारी: मार्क झुकरबर्ग
- फेसबुक मुख्यालय: कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
6. अंटार्क्टिकाने सर्वाधिक 18.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली
- युनायटेड नेशन्सच्या जागतिक हवामान संस्थेने अंटार्क्टिकामध्ये विक्रमी उच्चांकी तापमानाची नोंद केली आहे.
- 6 फेब्रुवारी 2020 रोजी, एस्पेरेंझा स्थळ (ट्रिनिटी द्वीपकल्पातील अर्जेटिनाचे संशोधन केंद्र) येथे 18.3 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.
- यूएन एजन्सीच्या मते, अंटार्क्टिकामधील उच्च तापमान “फॉन कंडिशन्स” निर्माण करणार्या मोठ्या उच्च-दाब प्रणालीमुळे होते ज्यात खालच्या दिशेने वारे वाहून पृष्ठभागावरील तापमान वाढते.
- सर्वाधिक तापमानाचा या आधीचा विक्रम याच स्थळावर 24 मार्च 2015 रोजी 17.5 डिग्री सेल्सियस नोंदविला गेला होता.
निर्देशांक आणि अहवाल
7. न्यूजऑनएअर रेडिओ थेट-प्रक्षेपण ची जागतिक क्रमवारी
- ज्या देशांमध्ये अखिल भारतीय रेडीओ चे न्यूजऑनएअर अॅप वरील थेट-प्रक्षेपण सर्वाधिक लोकप्रिय आहे अशा देशांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.
- पहिल्या दहा देशांची यादी खालीलप्रमाणे
क्रमांक देश 1 युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका 2 फिजी 3 ऑस्ट्रेलिया 4 युनायटेड किंगडम 5 कॅनडा 6 संयुक्त अरब अमिराती 7 सिंगापूर 8 कुवेत 9 सौदी अरेबिया 10 जर्मनी
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- एआयआर भारताचा राष्ट्रीय सार्वजनिक रेडिओ प्रसारक आहे. 1956 पासून अधिकृतपणे आकाशवाणी म्हणून ओळखले जाते.
- हा प्रसार भारतीचा एक विभाग असून 1936 साली याची स्थापना झाली आहे.
अर्थव्यवस्था बातम्या
8. सार्वजनिक उपक्रम विभाग वित्त मंत्रालयाअंतर्गत आणण्यात आला
- भारत सरकारने सार्वजनिक उपक्रम विभाग (डीपीई) अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
- हा विभाग पूर्वी अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत होता.
वित्त मंत्रालयाअंतर्गत इतर विभाग:
- आर्थिक व्यवहार विभाग
- खर्च विभाग
- महसूल विभाग
- गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग
- गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री: निर्मला सीतारमण
संरक्षण बातम्या
9. संरक्षण मंत्रालयाने स्पर्श यंत्रणा सुरु केली
- संरक्षण मंत्रालयाने एसपीएआरएसएच (सिस्टम फॉर पेन्शन अॅडमिनिस्ट्रेशन रक्षा) ही संरक्षण दलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांसाठी स्वयंचलित मंजुरी आणि वितरण करण्यासाठी एकात्मिक प्रणाली सुरु केली आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) – या संरक्षण निवृत्तीवेतनधारकांच्या संबंधित दोन सर्वात मोठी बँकांची सेवा केंद्र म्हणून निवड झाली आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- संरक्षणमंत्री: राजनाथ सिंह
10. आयएनएस ताबर आणि इटालियन नौसेना यांच्यात संयुक्त लष्करी सराव
- इंडियन नेव्हल शिप (आयएनएस) ताबर ने इटालियन नौदलाच्या फ्रंटलाइन फ्रिगेटसह भूमध्यसागरीय संयुक्त सरावात भाग घेतला.
- आयएनएस ताबरचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन महेश मांगीपुडी हे होते.
व्यवसाय बातम्या
11. अॅमेझॉनने गुजरातमध्ये भारतातील पहिले डिजिटल केंद्र सुरु केले.
- अॅमेझॉनने गुजरातमधील सुरत येथे भारतात आपले पहिले डिजिटल केंद्र सुरू केले आहे.
- या केंद्राचे उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
- या केंद्रात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) ई-कॉमर्सच्या फायद्यांविषयी शिकण्याची संधी दिली जाते
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अँड्र्यू आर. जॉसी
- अॅमेझॉनची स्थापना: 5 जुलै 1994
12. भारत सरकारने सिमेंट उद्योगासाठी 25 सदस्यांची विकास परिषद स्थापन केली)
- केंद्र सरकारने दालमिया भारत ग्रुप सीएमडी, पुनीत दालमिया, यांच्या अध्यक्षतेखाली सिमेंट उद्योगाच्या विकाकरिता 25 सदस्यांची एक विकास परिषद स्थापन केली आहे.
- कचरा निर्मुलन, उत्पादन वाढविणे, खर्च कमी करणे आणि उत्पादनांचे प्रमाणिकरण वाढवणे, स्थापित क्षमतेचा परिपूर्ण वापर करणे, व्यक्ती प्रशिक्षण प्रोत्साहन, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन, इत्यादी महत्त्वाच्या बाबींवर शिफारसी सुचवणार आहे.
- सदस्य: श्री सिमेंट लिमिटेडचे एमडी एच.एम. बांगूर; द इंडिया सिमेंट्स लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष राकेश सिंह; बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेडचच्या सीईओ प्रचेता मजुमदार; जे.के.सिमेंट लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक माधवकृष्ण सिंघानिया; जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नार्वेकर यांचा समावेश आहे.
पुस्तके आणि लेखक
13. जयराम रमेश यांचे ‘द लाईट ऑफ एशिया’ हे नवीन पुस्तक प्रकाशित
- जयराम रमेश यांनी सर एडविन अर्नोल्ड यांनी 1879 लिहिलेल्या बुद्धावर “द लायट ऑफ एशिया” या प्रचंड गाजलेल्या महाकाव्याच्या उगमाचे आणि त्याच्या जगावरील प्रभावाचे चरित्र “द लाईट ऑफ एशिया” या पुस्तकात लिहिले आहे.
- जयराम रमेश हे लेखक, संसद सदस्य, माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस नेते आहेत.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा