Marathi govt jobs   »   Study Materials   »   मराठी शब्दसंपदा - म्हणी व वाक्प्रचार

मराठी शब्दसंपदा – म्हणी व वाक्प्रचार : आदिवासी विकास विभाग भरतीसाठी अभ्यास साहित्य

मराठी शब्दसंपदा – म्हणी व वाक्प्रचार

मराठी शब्दसंपदा – म्हणी व वाक्प्रचार : महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. परीक्षेत मराठी व्याकरणासोबत म्हणी व वाक्प्रचार यावर नेहमी प्रश्न असतोच. मराठीतल्या शब्दसंपदा यावर सहसा 2 ते 3 प्रश्न मराठी विषयात विचारल्या जातात. दररोजच्या वाचनाने या मराठी विषयातील शब्दसंपदेवरील प्रश्नात पैकीच्या पैकी मार्क मिळवणे शक्य आहे. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील आगामी काळातील आदिवासी विकास विभाग भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा विषय मराठी शब्दसंपदा –  म्हणी व वाक्प्रचार याची माहिती पाहणार आहोत.

मराठी शब्दसंपदा – म्हणी व वाक्प्रचार: विहंगावलोकन

मराठी शब्दसंपदा – म्हणी व वाक्प्रचार : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय मराठी व्याकरण
उपयोगिता आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव मराठी शब्दसंपदा – म्हणी व वाक्प्रचार
लेख तुम्हाला काय प्रदान करतो? मराठी शब्दसंपदा – म्हणी व वाक्प्रचार विषयी सविस्तर माहिती

मराठी शब्दसंपदा – म्हणी व वाक्प्रचार

म्हणी स्वतःला व्यक्त करण्याचा एक नवीन, सर्जनशील मार्ग देतात. ‘आपली उन्नती आपल्या कार्तुत्वावरच अवलंबून असते’ असे म्हणण्याऐवजी, आपण ‘आपला हात जगन्नाथ’ असे म्हणू शकतो.  जे अधिक प्रभावी व  मनोरंजक आहे. आपल्याला आपले व्यक्तिमत्व आणि विनोदबुद्धी दाखवण्यासह स्वतःला अधिक अस्सल मार्गाने व्यक्त करण्यास म्हणी मदत करतात.

म्हणी व त्याच्या अर्थाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वाक्प्रचार हा शब्दांचा एक समूह आहे. वाक्प्रचार खूप महत्वाचे आहेत. कारण वाक्प्रचारामुळे आपण  लिहिण्यात व बोलण्यात थोड्याशा शब्दात मोठा सार सांगू शकतो. याचा निबंधात विशेषकरून फायदा होतो.

वाक्प्रचार व त्याच्या अर्थाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रश्न उत्तरे –

Q1.’गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

(a)  दृढ मैत्री होणे

(b)  ढवळा ढवळ करणे

(c)  षट्कर्णी होणे

(d)  शहानिशा करणे

Q2. नेहमी मॅच खेळायला जाताना सुनिता खो घालते.

अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ –

(a)  आपले वर्चस्व प्रस्थापित करणे

(b)  अडथळा आणणे

(c)  आतुरता वाढवणे

(d)  क्षमायाचना करणे

Q3. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली. यातील ‘धूम ठोकली’ या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार-

(a)  सूंबाल्या करणे

(b)  शंख करणे

(c)  सव्यापसव्य करणे

(d)  हतबल होणे

Q4. ‘जें साहित्यानें वोजावी । अमृतानें चुकी ठेवी ।’ या ओवीतील ‘चुकी ठेवणे’ या शब्दांचा अर्थ असलेला पर्याय निवडा.

(अ) दोष लावणे

(ब) नावे ठेवणे

(क) वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे

(ड) कनिष्ठपणा देणे

(a)   फक्त अ व क बरोबर

(b)  फक्त अ, ब व क बरोबर

(c)   फक्त क व ब बरोबर

(d)  अ, ब, क व ड बरोबर

Q5. ‘पोबारा करणे’, या वाक्प्रचाराचा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता ?

(a)   वर्ज्य करणे

(b)  सूंबाल्या करणे

(c)   वाखाणणी करणे

(d)  पायमल्ली करणे

Q6. ‘कधीही न दिसणारी कुसूम, दुर्मिळ वस्तूप्रमाणे वारंवार दृष्टीस पडत नाही.’ या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार निवडा.

(a)  उंबराचे फूल

(b)  गट्टी फू करणे

(c)  गुलाबाचे फूल

(d)  कपिला षष्टीचा योग

Q7. योग्य तो पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा.

‘कशात काय नि……. पाय’

(a)  गोलात 

(b)  सगळीकडे 

(c)  फाटक्यात

(d)  दुकानात 

Q8. ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’

या म्हणीतून कोणत्या स्वभावदोषावर टीका केली आहे ?

(a)  नटवेपणा

(b)  उतावीळपणा

(c)  बेजबाबदारपणा

(d)  स्वार्थीपणा

Q9. खालील म्हणीचा नेमका अर्थ कोणता ?

कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शाम घटाची तट्टाणी

(a)  सारी माणसे शेवटी सारखीच असतात.

(b)  एक अतिशय थोर तर एक अतिशय क्षुद्र.

(c)  इंद्र व शामभट यांची वाहने वेगवेगळी आहेत.

(d)  प्रत्येक माणसाचा स्वभाव धर्म वेगवेगळा असतो.

Q10. ‘सन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात’ या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा.

(a)  वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती

(b)  थोडे थोडे करण्याने काम पूर्ण होते.

(c)  एकही गोष्ट व्यवस्थित नसणे

(d)  एखाद्या गोष्टीचा आरंभ मूळापासून करणे.

Solutions

S1. Ans (c)

Sol.  

वाक्यप्रचार – ‘गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे’ 

अर्थ – षट्कर्णी होणे

S2. Ans (b)

Sol. 

वाक्यप्रचार- खो घालणे 

अर्थ – अडथळा आणणे

S3. Ans (a)

Sol. 

वाक्यप्रचार-‘धूम ठोकणे’

अर्थ – सूंबाल्या करणे

एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीपासून पळ काढत असेल, तर त्याला धूम ठोकणे असे म्हणतात.

S4. Ans (d)

Sol.

‘जें साहित्याने वोजावी । अमृतानें चुकी ठेवी ।’ या ओवीतील ‘चुकी ठेवणे’ या शब्दांचा अर्थ पुढीलप्रमाणे-

(अ) दोष लावणे

(ब) नावे ठेवणे

(क) वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे

(ड) कनिष्ठपणा देणे

त्यामुळे पर्याय (d) बरोबर आहे. 

S5. Ans (b)

Sol.

वाक्यप्रचार-‘पोबारा करणे’

अर्थ -सूंबाल्या करणे

S6. Ans (a)

Sol.

‘कधीही न दिसणारी कुसूम, दुर्मिळ वस्तूप्रमाणे वारंवार दृष्टीस पडत नाही.’ या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार उंबराचे फूल हा आहे. 

उंबराचे फूल – वारंवार न दिसणारा 

S7. Ans (c)

Sol. 

म्हण – ‘कशात काय नि फाटक्यात पाय’

अर्थ – वाईटात आणखी वाईट घडणे.  

S8. Ans (b)

Sol. 

‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ या म्हणीतून उतावीळपणा या स्वभावदोषावर टीका केली आहे. 

S9. Ans (b)

Sol. 

म्हण – कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शाम घटाची तट्टाणी

अर्थ –  एक अतिशय थोर तर एक अतिशय क्षुद्र

S10. Ans (d)

Sol. 

म्हण – ‘सन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात’ 

अर्थ – एखाद्या गोष्टीचा आरंभ मूळापासून करणे.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

शब्दसंपदा म्हणजे काय?

एखाद्याला माहीत असलेले किंवा एखाद्या पुस्तकात, विषयात वगैरे वापरले गेलेले सर्व शब्द; शब्दसंग्रह, शब्दभांडार.

आदिवासी विकास विभाग भरतीसाठी मराठी शब्दसंपदा - म्हणी व वाक्प्रचार या घटकावरील माहिती अभ्यासात उपयुक्त आहे का ?

होय, आदिवासी विकास विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा - म्हणी व वाक्प्रचार या घटकावरील माहिती अभ्यासात अतिशय उपयुक्त आहे.

या लेखात आपण मराठी शब्दसंपदा - म्हणी व वाक्प्रचार या विषयी अत्यंत महत्वाचे प्रश्न - उत्तरे पाहणार आहोत का ?

होय, या लेखात आपण मराठी शब्दसंपदा - म्हणी व वाक्प्रचार या विषयी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रश्न - उत्तरे पाहणार आहोत.