Table of Contents
MPSC Exam Update 2023: Maharashtra Public Service Commission (MPSC) has released a new notice about Rajyaseva Mains Exam. As per the new MPSC Exam Update 2023, The State Services Main Exam will be descriptive in nature from 2025 onwards. MPSC had earlier announced that from 2023 MPSC Rajyaseva Exam 2023 will be conducted in descriptive mode. It was opposed by many candidates. Now the MPSC has accepted the demand of the candidates. In this article, you will get detailed information about MPSC Exam Update 2023.
MPSC Exam Update 2023 | |
Category | Latest Update |
Organization Name | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
Useful for | All Students who give MPSC Exams |
Name | MPSC Exam Update 2023 |
Official Website of MPSC | www.mpsc.gov.in |
MPSC Exam Update 2023
MPSC Exam Update 2023: 23 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्यसेवा परीक्षा 2023 बद्दल एक माहिती प्रदान करण्यात आली आहे. MPSC ने या आधी 2023 पासून MPSC Rajyaseva Exam 2023 परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले होते. याला खूप उमेदवारांचा विरोध होता. त्याची मागणी होती कि, राज्यसेवा मुख्य परीक्षा ही 2025 पासून वर्णनात्मक स्वरुपाची घेण्यात यावी. ही मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केल्याचे जाहीर केले आहे. या लेखात आपण याच MPSC Exam Update 2023 बद्दल माहिती पाहणार आहे.
MPSC Rajyaseva Mains Descriptive Exam will be implemented from 2025 onwards | MPSC राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षा 2025 पासून लागू होणार आहे
MPSC Rajyaseva Mains Descriptive Exam will be implemented from 2025 onwards: राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केले.
MPSC Exam Update regarding MPSC Answer key 2023 | MPSC च्या उत्तरतालीकेसंदर्भात महत्वाचा अपडेट
MPSC Exam Update regarding MPSC Answer key 2023: सरळसेवा भरतीअंतर्गत आयोगाकडे मोठ्या प्रमाणात मागणीपत्रे प्राप्त झाली असून, त्यांच्या निवड प्रक्रियेसाठी चाळणी परीक्षांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संगणकावर आधारित ऑनलाईन चाळणी परीक्षांच्या उत्तरतालिकांसंदर्भातील बदल झाले आहेत. MPSC Exam Update regarding MPSC Answer key 2023 खालीलप्रमाणे आहेत.
- आयोगामार्फत घेण्यात आलेल्या व यापुढे घेण्यात येणाऱ्या संगणकावर आधारित ऑनलाईन चाळणी परीक्षांच्या प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या हरकतींसाठी प्रसिद्ध करण्यात येणार नाहीत.
- संबंधित चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या योग्य उत्तरांचे पर्याय विचारात घेऊन एकच उत्तरतालिका तयार करण्यात येईल व ती अंतिम राहील.
- सदर उत्तरतालिकेच्या आधारे संबंधीत चाळणी परीक्षेच्या निकालाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.
- आयोगामार्फत संबंधित चाळणी परीक्षांचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधीत परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 30 जानेवारी 2023 रोजी जाहीर केलेली नोटीस डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC Exam Update regarding MPSC Answer key 2023
MPSC Exam Update 2023: All Clerical Post will be Recruited by MPSC | लिपिक संवर्गातील सर्व पदांची भरती MPSC द्वारे होणार
Latest GR of 02 November 2023: 02 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय जाहीर केल्या त्यात आता यापुढील सर्व लिपिक संवार्गीय पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात येईल असे निर्देश देण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना सुद्धा जाहीर केल्या आहेत. 02 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
- मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे नियुक्ती प्राधिकारीनिहाय गट-क मधील सरळसेवेने भरावयाच्या लिपिक-टंकलेखक पदांचे मागणीपत्र क्षेत्रिय कार्यालयाकडून मागवावे. जेथे बृहन्मुंबई व बृहन्मुंबईबाहेरील कार्यालयातील लिपिक-टंकलेखक पदाचे नियुक्ती प्राधिकारी एकच असतील, तेथे मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने बृहन्मुंबई व बृहन्मुंबईबाहेरील कार्यालयासाठी स्वतंत्र मागणीपत्र मागवण्यात येतील.
- त्यानंतर लिपिक-टंकलेखक पदांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात येतील.
- सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लिपिक-टंकलेखक पदांकरीता स्पर्धा परीक्षा घेण्यात येईल.
- जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करताना उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम घेण्यात येईल.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे उमेदवारांची शिफारस यादी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार नियुक्ती प्राधिकारीनिहाय प्रसिध्द करण्यात येईल.
- दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील लिपिकवर्गीय पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणली असली तरी, सदर पदांना जे आरक्षण यापूर्वी लागू होते त्यानुसारच सदर पदांना आरक्षण व अनुषंगिक सोयी-सवलती यापुढेही लागू राहतील.
02 नोव्हेबर 2022 रोजी जाहीर झालेला शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Maharashtra Government Resolution (02 November 2022)
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |