Table of Contents
भारतीय तटरक्षक दल भरती 2023
भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) असिस्टंट कमांडंट पदाच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. इंडियन कोस्ट गार्डने 01/2024 बॅचसाठी असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी, कमर्शियल पायलट लायसन्स (CPL-SSA) आणि टेक्निकल (इंजिनियरिंग) आणि लॉ शाखेतील रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दल भरती 2022 च्या अधिकृत वेबसाइट @joinindiancoastguard.cdac.in किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. भारतीय तटरक्षक दल भरती 2023 ची अर्ज प्रक्रिया 25 जानेवारी 2023 पासून सुरु झाली आहे. आज आपण या लेखात भारतीय तटरक्षक दल भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
भारतीय तटरक्षक दल भरती 2023: विहंगावलोकन
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 अंतर्गत एकूण 71 रिक्त पदांची भरती होणार असून ऑनलाईन अर्ज प्रणाली 25 जानेवारी 2023 पासून सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी असून उमेदवार भारतीय तटरक्षक दल भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात तपासू शकतात.
भारतीय तटरक्षक दल भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | भारतीय तटरक्षक दल |
पोस्टचे नाव | असिस्टंट कमांडंट (AC) |
रिक्त पदे | 71 |
नोकरीचे स्थान | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
ऑनलाईन अर्जाचा कालवधी | 25 जानेवारी 2023 ते 09 फेब्रुवारी 2023 |
भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत वेबसाइट | https://joinindiancoastguard.cdac.in |
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 25 जानेवारी 2023 पासून सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारखा |
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 ची अधिसूचना | 14 जानेवारी 2023 |
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 25 जानेवारी 2023 (सकाळी 11 पासून) |
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 फेब्रुवारी 2023 (संध्याकाळी 05 पर्यंत) |
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 अधिसूचना
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 अंतर्गत विविध शाखेतील (Branch) असिस्टंट कमांडंट पदाच्या एकूण 71 रिक्त जागेसाठी अधिसूचना जाहीर झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज 25 जानेवारी 2023 पासून अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण भारतीय तटरक्षक दल भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करू शकता.
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय तटरक्षक दलभरती 2023 मधील रिक्त जागेचा तपशील
भारतीय तटरक्षक दलभरती 2023 अंतर्गत एकूण 71 जागा भरण्यात येणार आहेत. खाली दिलेल्या तक्त्यात भारतीय तटरक्षक दलभरती 2022 च्या रिक्त जागेचा तपशील दिला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
General Duty(GD) (सामान्य कर्तव्य (GD)) | 40 |
Commercial Pilot Licence (SSA) (कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)) | 10 |
Technical (Mechanical) (टेक्निकल (मेकॅनिकल)) | 06 |
Technical (Electrical/Electronics) (टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)) | 14 |
Law Entry (लॉ एन्ट्री) | 01 |
एकूण पदे | 71 |
भारतीय तटरक्षक दल भरती 2022: पात्रता निकष
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 अंतर्गत असिस्टंट कमांडंट पदासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे
शैक्षणिक पात्रता
भारतीय तटरक्षक भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे येथे नमूद केल्याप्रमाणे किमान पात्रता असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
General Duty(GD) (सामान्य कर्तव्य (GD)) |
|
Commercial Pilot Licence (SSA) (कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)) |
|
Technical (Mechanical) (टेक्निकल (मेकॅनिकल)) |
|
Technical (Electrical/Electronics) (टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)) |
|
Law Entry (लॉ एन्ट्री) |
|
वयोमर्यादा
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 मधील पदानुसार वयोमर्यादा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
पदाचे नाव | वयोमर्यादा |
सामान्य कर्तव्य (GD) |
|
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) |
|
तांत्रिक (यांत्रिक) |
|
तांत्रिक ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स ) |
|
कायदा प्रवेश |
|
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 अर्ज शुल्क
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 साठी उमेदवारास लागणारे अर्ज शुल्क संवर्गानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.
प्रवर्ग | अर्ज शुल्क |
सर्वसाधारण / ओबीसी / ईडब्लूएस | 250 |
एसी / एसटी | अर्ज शुल्क लागू नाही |
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 अंतर्गत असिस्टंट कमांडंट पदाच्या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 25 जानेवारी 2023 पासून अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण पासून भारतीय तटरक्षक दल भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सर्व स्टेप्स खाली दिल्या आहे.
- भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइटला @indiancoastguard.cdac.in ला भेट द्या किवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
- सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ई-मेल आयडी/मोबाईल क्रमांकासह स्वतःची नोंदणी करा.
- अर्जातील सर्व तपशील काळजीपूर्वक भरा.
- पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा, ओळखीचा पुरावा (आधार कार्ड किंवा मतदार आयडी किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स), 10वी /12वी / ग्रॅज्युएशन मार्कशीट, सेवा प्रमाणपत्र याच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
- ऑनलाइन मोडद्वारे अर्ज शुल्क भरा.
- सर्व तपशीलांचे काळजीपूर्वक पूर्वावलोकन केल्यानंतर अर्ज सबमिट करा.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.
भारतीय तटरक्षक दल भरती 2023 निवड प्रक्रिया
भारतीय तटरक्षक दलाच्या सहाय्यक कमांडंटच्या निवड प्रक्रियेत पाच टप्प्यांचा (स्टेज) समावेश आहे. ज्याची खाली तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे.
(a) स्टेज-I (CGCAT) – स्टेज-I ही पात्र अर्जदारांसाठी एक स्क्रीनिंग चाचणी आहे जी संपूर्ण भारतातील विविध केंद्रांवर संगणक आधारित परीक्षा असेल. जीडी/सीपीएल आणि तांत्रिक (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाणार आहे. स्क्रिनिंग चाचणी MCQ पॅटर्नची जास्तीत जास्त 400 गुणांची असेल ज्यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुणांसह 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण नकारात्मक असेल. परीक्षेचा कालावधी २ तासांचा असेल आणि परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल.
(b) स्टेज-II [प्राथमिक निवड मंडळ (PSB)] – स्टेज-I मधील कामगिरीच्या आधारे, उमेदवारांना स्टेज-II (PSB) मध्ये बसण्यासाठी निवडले जाईल जी नोएडा, मुंबई येथे एक दिवसीय परीक्षा असेल. /गोवा, चेन्नई आणि कोलकाता केंद्रे. अर्ज भरताना उमेदवारांनी PSB केंद्राची निवड द्यावी. संगणकीकृत कॉग्निटिव्ह बॅटरी टेस्ट (CCBT) आणि पिक्चर परसेप्शन आणि डिस्कशन (PP&DT) द्वारे उमेदवारांची तपासणी केली जाईल. CCBT फक्त इंग्रजीत असेल आणि वस्तुनिष्ठ प्रकारचा असेल. PP&DT दरम्यान उमेदवारांनी इंग्रजीत बोलणे आणि चर्चा करणे अपेक्षित आहे. तथापि, त्यांना इंग्रजी येत नसेल तर ते हिंदीत बोलण्यास मोकळे आहेत. स्टेज-II परीक्षा केवळ पात्रता स्वरूपाची असते.
(c) स्टेज-III: अंतिम निवड मंडळ (FSB) – स्टेज-III साठी पात्र उमेदवारांना संबंधित केंद्रांवर टप्पा-II पूर्ण झाल्यावर सूचित केले जाईल. स्टेज-III चे वेळापत्रक उमेदवाराला वैयक्तिक लॉगिन आयडीवर सूचित केले जाईल. वैयक्तिक लॉगिन आयडीवरील उमेदवारांना अहवाल सूचनांसह FSB कॉल अप लेटर सूचित केले जाईल. अंतिम निवड मंडळ नोएडा येथे स्थित कोस्ट गार्ड निवड मंडळ (CGSB) येथे आयोजित केले जाते.
(d) स्टेज-IV (वैद्यकीय परीक्षा) – स्टेज-III उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना बेस हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे विशेष वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. भारतीय तटरक्षक वैद्यकीय मानकांनुसार उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
(e) स्टेज-V (इंडक्शन) – जे उमेदवार स्टेज – IV उत्तीर्ण करतात आणि उपलब्ध रिक्त पदांनुसार ICG च्या अखिल भारतीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवतात त्यांची प्रशिक्षणासाठी तात्पुरती निवड केली जाईल आणि त्यांना नौदल अभिमुखतेसाठी INA Ezhimala येथे अहवाल द्यावा लागेल. अखिल भारतीय गुणवत्ता यादी स्टेज-I आणि स्टेज-III च्या एकत्रित गुणांवर आधारित असेल.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
Maharashtra Exam Study Material
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |