शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023: शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि प्रथम छत्रपती म्हणून ओळखले जातात. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. त्यानंतरसर्वमान्यता मिळावी या हेतूने शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा पार पडला. आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात तिथीनुसार 350 वा शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 रायगड येथे संपन्न होत आहे. आज या लेखात आपण याच शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवणार आहोत.
शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 संपूर्ण विश्वात अतिउत्साहात साजरा केल्या जातो. शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात मिळावा.
शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
विषय | इतिहास |
लेखाचे नाव | शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 |
साम्राज्य | मराठा साम्राज्य |
शिवाजी महाराज राज्याभिषेक | 06 जून 1974 |
2023 मध्ये शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन | 02 जून 2023 (तिथीनुसार) |
राज्याभिषेक कोणी केला | पंडित गागाभट्ट |
भोसले कुळाचा उदयपूरातील क्षत्रिय घराण्याशी संबंध होता. हे सिद्ध करण्यामध्ये बाळाची अवजी आणि त्यांचे काही इतर सरदाराने पुढाकार घेतला होता. खूपच चढाओढी नंतर भोसले कुळ हे प्रभू रामचंद्रांच्या सूर्य वंशातील शुद्ध क्षत्रिय कुळ आहे. हे सिद्ध झालं. या भक्कम पुराव्याची शहानिशा केल्या नंतर पं. गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन महाराजांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली. त्या नंतर 6 जून 1674 मध्ये महाराजांवर रायगड मध्ये राज्यभिषेक झाला.
या सोहळ्यासाठी सिंहासनावर बसण्यासाठी बत्तीस हृदयांचे सुवर्ण सिंहासन तयार केले होते. तिजोरीत असलेल्या सर्व खजिन्यातून मौल्यवान दागिने शोधून सिंहासनावर बसवले गेले. रायरिकाला ‘रायगड’ असे नाव देण्यात आले. सिंहासनाची जागा किल्ला म्हणून ठेवली होती. सात महान नद्या आणि मुख्य नद्या, समुद्र आणि नामांकित तीर्थांचे पाणी आणले गेले. सोन्याचे कलश आणि भांडी बनवली. राजाला आठ कलश आणि आठ भांड्यांनी अभिषेक करायचे ठरवून, ‘शालिवाहन शके 1596, ज्येष्ठ महिन्याची शुक्ल त्रयोदशी हा शुभ दिवस म्हणून पाळण्यात आला आणि शुभ मुहूर्त ठेवण्यात आला.’
6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. भारतीय इतिहासात या घटनेकडे खूप महत्वाची घटना म्हणून पाहिले जाते. कारण त्या काळात संपूर्ण भारत परकिय आक्रमणांनी ग्रासला होता आणि एवढ्या मोठ्या शत्रूंना तोंड देऊन छत्रपतींनी आपला राज्याभिषेक केला होता. ही भारतीय इतिहासातील सामान्य गोष्ट नव्हती.
राज्याभिषेक करून राजा ही पदवी धारण करुन भारतातील परकीयांना शह देणे ही त्या काळात खुप धाडसाची कामगिरी छत्रपतींनी केली म्हणून भारतीय इतिहासात या घटनेकडे एक युगप्रवर्तक घटना म्हणून बघितले जाते. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपतींनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. परकीय शत्रूंना शह देणारा छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितले जाऊ लागले.
या सोहळ्यासाठी विविध राज्यांचे राजदूत, प्रतिनिधी, परदेशी उद्योगपतींनाही आमंत्रित करण्यात आले होते. शिवाजीने छत्रपती ही पदवी धारण केली. यामध्ये काशीचे पंडित विश्वेश्वर जी भट्ट यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यांच्या राज्याभिषेकानंतर केवळ 12 दिवसांनी त्यांच्या आईचे निधन झाले. या कारणास्तव, 4 ऑक्टोबर 1674 रोजी त्यांचा दुसऱ्यांदा राज्याभिषेक झाला. दोन वेळा झालेल्या या सोहळ्यात सुमारे 50 लाख रुपये खर्च झाले. या सोहळ्यात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली . विजयनगरच्या पतनानंतर दक्षिणेतील हे पहिले हिंदू राज्य होते एखाद्या स्वतंत्र राज्यकर्त्याप्रमाणे स्वराज्याला स्वतःची ओळख मिळाली.
शिवशक ही नवीन कालगणना सुरू झाली. छत्रपतींचा राज्याभिषेक झाल्यानंतर राजांनी शिवशक ही नवीन कालगणना सुरु केली. आजही शिवशक ही कालगणना अस्तित्वात आहे. या कालगणनेमागे राजांचा दूरदृष्टीचा महत्वपूर्ण गुण दिसून येतो.
शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी शिवराई व होन या दोन चलनाची निर्मिती केली. शिवराई ही चांदीची नाणी व होन ही सोन्याची नाणी चलनात आणली. राजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी ही चलन निर्मिती केली. शिवरायांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा वापर केला. मराठी भाषेस महत्त्व दिले. परकीय भाषा वापरण्यापेक्षा आपली मातृभाषा महाराजांनी राज्यकारभारात वापरली. यातून महाराजांचे भाषा प्रेम दिसून येते.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतर लेख
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 दिनांक 02 जून 2023 रोजी साजरा केल्या जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 06 जून 1674 मध्ये झाला होता.
विद्वान पंडित गंगाभट्ट यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…
Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…
Question of the Day (Current Affairs) Q. The exercise Poorvi Lehar was conducted by (a) Indian Army (b) Indian Navy…
Weekly English Vocab 22 to 27 April 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…