Marathi govt jobs   »   Latest Post   »   Chhatrapati Shivaji Maharaj

Life lessons from Shri Chhatrapati Shivaji Maharaj | श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांकडून सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे गुण

Chhatrapati Shivaji Maharaj: Today in this article we will see what important things students should know from Chhatrapati Shivaji Maharaj. Some of Qualities of Chhatrapati Shivaji Maharaj are very important for students who are preparing for competitive exams. We need to learn following things from Chhatrapati Shivaji Maharaj to get success in you life. So lets start..

Chhatrapati Shivaji Maharaj
Category Study Material
Exam All Competitive Exams
Name What we need to learn from Chhatrapati Shivaji Maharaj

Life lessons from Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांकडून सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे गुण

सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या..!!!

भारताच्या इतिहासात अनेक राजांनी जनमानसात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. परंतु छ‍त्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजांमध्ये एक मूलभूत फरक होता. बहुतांशी राजांनी आपापल्या वाडवडिलांच्या राजगादीवर विराजमान होऊन गादी चालविली. पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र त्याला अपवाद होते. ते स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं.

Chatrapati Shivaji Maharaj1
Chatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांकडून सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे गुण

  1. गनिमी कावा

गनिमी कावा कसा केला जायचा याची माहिती सर्वांना असणारचं. कधी हा गनिमी कावा खानाचा कोथळा काढताना दिसला तर कधी 35 हजार मुघल सैनिकांशी फक्त 7 हजार मराठा सैनिक लढताना दिसला. शत्रूवर कशी मात करायची हा गनिमी कावा शिकवतो. उघड्या डोळ्यांनी बघणार्यांना वाटेल ही लढाई छत्रपतींना जिंकणे शक्य नाही, फौज खूप कमी आहे, पण याच कमी फौजेच्या बळावर गनिमी कावा करून लढाया जिंकल्या. अमावसेच्या रात्री शत्रू गाफील असताना हल्ले केले. शत्रूला वाटायचे 30 हजाराची फौज समोरून येत आहे पण एक मावळा हातामध्ये 2 मशाली पकडायचा सोबतच जनावरांच्या शिंगालाही त्या मशाली बांधल्या जायच्या ज्यामुळे दुरून येत असताना हजारो सैनिक येत असल्याचा भास होत असे. अगदी याच प्रमाणे आपणही संकटाच्या काळी घाबरून न जाता स्वतःला कमी न लेखता संकटांवर गनिमी कावा कसा करता येईल याचा विचार करायला हवा. कोणताही वाद किंवा भांडण शक्तीचा वापर करण्याआधी युक्तीचा वापर करून सोडवण्याचा प्रयत्न करा 100% याचा तुम्हाला फायदा होईल. योग्य गनिमी काव्याने कोणत्याही स्पर्धा परीक्षेत सर्व संकटांवर मात करून उत्तम यश मिळवता येते.

Chatrapati Shivaji Maharaj1
Chatrapati Shivaji Maharaj
  1. चिकाटी

छत्रपती शिवाजी महाराज एक लढाई जिंकल्यानंतर त्याचे सेलिब्रेशन करत महिना वाया घालवत नव्हते. एक मोहीम जिंकली की लगेच पुढची मोहीम.. त्याचे काय कारण असते? ते म्हणजे वेळ वाया घालवायचा नाही, कामाची गती कमी होऊ द्यायची नाही, शत्रू एका धक्क्यातून सावरतो न सावरतो तेवढ्यात दुसरा धक्का द्यायचा. आपण काय करतो? एक काम झाले की शांत बसतो, खूप काही आता आपण केले आहे पुढे काहीही करायचं नाही, पुढे निवांत राहायचं, छोटा दुकान सुरु केलं आता बस त्यावरच राहायचं. नोकरी लागली आता बस पुढे काहीच करायचं नाही. इथेच तुम्ही चुकता. आज जे काही आहे त्यापेक्षा उद्या वेगळं काहीतरी असायला हवं. आजपेक्षा उद्याचा दिवस खूप चांगला बनवायला हवा हाच विचार तुमच्या डोक्यामध्ये असायला हवा. दिवसेंदिवस आपण आपला अभ्यास कसा वाढवू शकतो, आपल्या ज्ञानात कशी वृद्धी करता येईल याचा विचार करावा.

Chatrapati Shivaji Maharaj
Chatrapati Shivaji Maharaj
  1. प्रतिमा

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सांगत की हा देव आहे. कोणताही व्यक्ती महाराजांबद्दल वाईट बोलू शकत नाही किंवा विचारही करू शकत नाही. जनतेचं भलं करणे, परस्रीला मातेसमान मानने, स्वराज्याच्या प्रत्येक जातीधर्माचा आदर करणे, दिलेला शब्द कधीही माघार न घेणे ही होती छत्रपतींची प्रतिमा. समाजातील तुमची प्रतिमा तुमचे भविष्य ठरवते. आयुष्यात झालेली एखादी वाईट चूक, आयुष्यभर कमावलेली इज्जत शून्य करते. म्हणूनच स्वतःची प्रतिमा सांभाळा. प्रतिमेला अजून उजळवण्यासाठी प्रयत्न करा.

“प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावतंस् सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज

श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय”

तर चला या शुभ दिवशी या सर्व गोष्टी आत्मसात करूया आणि येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत आपल्याला आपल्या आयुष्यात जे हवे आहे ते मिळवूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की… जय! जय!! जय!!!

Sharing is caring!