Talathi Bharti 2023, अधिसूचना किती काळत प्रसिद्ध होऊ शकते, अर्ज कसा करावा

Talathi Bharti 2023

महाराष्ट्र शासनातील ग्रामपातळीवरील एक महत्वाचा अधिकारी म्हणजे तलाठी होय. ज्याला महाराष्ट्रात काही भागात पटवारी असे सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रात तलाठी भरतीची अधिसूचना जाहीर करणार आहे. एकूण 4122 जागेसाठी Maharashtra Talathi Bharti 2023 ची अधिसूचना जाहीर होणार आहे. वारंवार बातम्या येत आहेत कि, तलाठी भरती लवकरच जाहीर होणार आहे. पण तलाठी भरती 2023 कधी जाहीर होईल आणि त्यासाठी अर्ज कसे, कुठून व तलाठी भरतीची पात्रता काय आहे याबद्दल माहिती या लेखात दिली आहे.

Talathi Bharti 2023
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग महाराष्ट्र महसूल विभाग
भरतीचे नाव Talathi Bharti 2023
एकूण रिक्त पदे 4122

Talathi Bharti 2023 अधिसूचना किती काळात प्रसिद्ध होऊ शकते

महसूल विभागाच्या अखत्यारितील निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित), लघुटंकलेखक व तलाठी (गट-क) या संवर्गांची पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत “राज्यस्तरीय नोडल अधिकारी” व “विभागीय समन्वय अधिकारी” नियुक्ती करण्याचा शासन निर्णय 15 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्रातील सर्व सरळसेवेने भरण्यात येणाऱ्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी IBPS आणि TCS या दोन नामांकित कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. IBPS आणि TCS पैकी एका कंपनीची निवड राज्यस्तरीय नोडल अधिकारी करणार आहे. तलाठी भरतीची कार्यवाही अंतिम टप्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार पुण्यातील जमाबंदी आयुक्तांना कंपनीची निवड आणि कंपनीशी करार करणे ही कामे पार पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने 13 फेब्रुवारी 2023 रोजी तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. तलाठी भरतीसाठी मार्च 2023 च्या शेवटच्या सप्ताहात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. याआधी महसूलमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून महाराष्ट्र तलाठी भरती प्रक्रिये संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली होती. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं होते पण काही प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे तलाठी भरती 2023 ची अधिसूचना मार्च 2023 च्या शेवटच्या सप्ताहात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

Adda247 Marathi Application

Talathi Bharti 2023 अर्ज कसा करावा

तलाठी भरती 2023 साठी एकदा कंपनीशी करार झाल्यावर काही दिवसात तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अप्लिकेशन पोर्टल तयार केल्या जाईल. साधारणतः ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 दिवस चालेल. ऑनलाईन अप्लिकेशन पोर्टल वर उमेदवारास आपली संपूर्ण माहिती जसे नावं, पत्ता, शैक्षणिक पात्रता, मोबाईल व ईमेल आयडी, फोटो व स्वाक्षरी दिलेल्या वेबसाईट वर व्यवस्थितरित्या भरावे लागेल त्यानंतर प्रवर्गानुसार अर्ज शुल्काचा (खुला प्रवर्ग रु. 1000 आणि मागास प्रवर्ग रु. 900) भरणा करून अर्ज सबमिट करावा लागेल. तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याच्या सर्वसाधारण स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत.

  • तलाठी भरतीच्या ऑनलाईन पोर्टल वर जा.
  • तिथे नवीन अर्ज (New Application) वर क्लिक करा.
  • आपले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • आपला नवीनतम फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.
  • अर्ज शुल्काचा भरणा करा.
  • पुढील कार्यवाहीसाठी अर्जाची प्रिंट घ्या.

तलाठी भरतीच्या या सर्व स्टेप्स TCS आणि IBPS च्या आत्तापर्यंतच्या पोर्टल नुसार दिल्या आहेत. यात बदल असल्यात आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.

Talathi Bharti 2023 पात्रता काय आहे

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी उमेदवारांना आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
  • MSCIT किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ता
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा

  • सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38
  • मागास प्रवर्ग: 19 ते 43

टीप: वर दिलेली वयोमर्यादेत महाराष्ट्र शासनाने सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे) देण्यात आली आहे यासंदर्भात शासन निर्णय 03 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Maharashtra Talathi Bharti Online Batch 2.0

Other Blogs Related to Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 Maharashtra Talathi Salary
Best Books for Maharashtra Talathi Bharti Maharashtra Talathi Syllabus
Maharashtra Talathi cut off 2023 Maharashtra Talathi Bharti 2023
Talathi Bharti Previous Year Question Papers

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Talathi Bharti 2023 Full-Length Mock Online Test Series By Adda247

FAQs

When will be Talathi Bharti 2023 announced?

Talathi Bharati 2023 will be announced in the last week of March 2023.

Where can I get update about Talathi Bharati 2023?

In this article, we have provided updates regarding Talathi Bharati 2023.

What is the educational qualification for Talathi Bharti 2023?

Candidates for the post of Talathi should be Graduate in any discipline.

chaitanya

Recent Posts

1 May MPSC 2024 Study Kit | 1 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

9 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 01 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

9 hours ago

मराठी व्याकरण भाग 5 – शब्दसमूहाबद्दल एक शब्द : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी विषयात अनन्यसाधारण महत्व आहे. आगामी काळातील भरती जसे कि,…

9 hours ago

Question of the Day (History) | आजचा प्रश्न (इतिहास)

Question of the Day (History) Q. When was the Satyashodhak Samaj (Truth-seekers' Society) established? (a) 1873 (b) 1883 (c) 1863…

10 hours ago

India and Europe to Strengthen 6G Collaboration | भारत आणि युरोप 6G सहकार्य मजबूत करण्यासाठी

भारताची भारत 6G अलायन्स युरोपच्या इंडस्ट्री अलायन्स 6G सोबत सहकार्य करारावर स्वाक्षरी करणार आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट 6G तंत्रज्ञान विकसित…

10 hours ago

DRDO अप्रेंटीस भरती 2024, 127 पदांसाठी अधिसुचना जाहीर

DRDO अप्रेंटीस भरती 2024 DRDO अप्रेंटीस भरती 2024: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणेने DRDO अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली…

11 hours ago