Table of Contents
Talathi Bharti 2023
महाराष्ट्र शासनातील ग्रामपातळीवरील एक महत्वाचा अधिकारी म्हणजे तलाठी होय. ज्याला महाराष्ट्रात काही भागात पटवारी असे सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रात तलाठी भरतीची अधिसूचना जाहीर करणार आहे. एकूण 4122 जागेसाठी Maharashtra Talathi Bharti 2023 ची अधिसूचना जाहीर होणार आहे. वारंवार बातम्या येत आहेत कि, तलाठी भरती लवकरच जाहीर होणार आहे. पण तलाठी भरती 2023 कधी जाहीर होईल आणि त्यासाठी अर्ज कसे, कुठून व तलाठी भरतीची पात्रता काय आहे याबद्दल माहिती या लेखात दिली आहे.
Talathi Bharti 2023 | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | महाराष्ट्र महसूल विभाग |
भरतीचे नाव | Talathi Bharti 2023 |
एकूण रिक्त पदे | 4122 |
Talathi Bharti 2023 अधिसूचना किती काळात प्रसिद्ध होऊ शकते
महसूल विभागाच्या अखत्यारितील निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित), लघुटंकलेखक व तलाठी (गट-क) या संवर्गांची पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत “राज्यस्तरीय नोडल अधिकारी” व “विभागीय समन्वय अधिकारी” नियुक्ती करण्याचा शासन निर्णय 15 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्रातील सर्व सरळसेवेने भरण्यात येणाऱ्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी IBPS आणि TCS या दोन नामांकित कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. IBPS आणि TCS पैकी एका कंपनीची निवड राज्यस्तरीय नोडल अधिकारी करणार आहे. तलाठी भरतीची कार्यवाही अंतिम टप्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार पुण्यातील जमाबंदी आयुक्तांना कंपनीची निवड आणि कंपनीशी करार करणे ही कामे पार पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने 13 फेब्रुवारी 2023 रोजी तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. तलाठी भरतीसाठी मार्च 2023 च्या शेवटच्या सप्ताहात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. याआधी महसूलमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून महाराष्ट्र तलाठी भरती प्रक्रिये संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली होती. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं होते पण काही प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे तलाठी भरती 2023 ची अधिसूचना मार्च 2023 च्या शेवटच्या सप्ताहात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
Talathi Bharti 2023 अर्ज कसा करावा
तलाठी भरती 2023 साठी एकदा कंपनीशी करार झाल्यावर काही दिवसात तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अप्लिकेशन पोर्टल तयार केल्या जाईल. साधारणतः ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 दिवस चालेल. ऑनलाईन अप्लिकेशन पोर्टल वर उमेदवारास आपली संपूर्ण माहिती जसे नावं, पत्ता, शैक्षणिक पात्रता, मोबाईल व ईमेल आयडी, फोटो व स्वाक्षरी दिलेल्या वेबसाईट वर व्यवस्थितरित्या भरावे लागेल त्यानंतर प्रवर्गानुसार अर्ज शुल्काचा (खुला प्रवर्ग रु. 1000 आणि मागास प्रवर्ग रु. 900) भरणा करून अर्ज सबमिट करावा लागेल. तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याच्या सर्वसाधारण स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत.
- तलाठी भरतीच्या ऑनलाईन पोर्टल वर जा.
- तिथे नवीन अर्ज (New Application) वर क्लिक करा.
- आपले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- आपला नवीनतम फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्ज शुल्काचा भरणा करा.
- पुढील कार्यवाहीसाठी अर्जाची प्रिंट घ्या.
तलाठी भरतीच्या या सर्व स्टेप्स TCS आणि IBPS च्या आत्तापर्यंतच्या पोर्टल नुसार दिल्या आहेत. यात बदल असल्यात आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
Talathi Bharti 2023 पात्रता काय आहे
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी उमेदवारांना आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
- MSCIT किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ता
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा
- सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38
- मागास प्रवर्ग: 19 ते 43
टीप: वर दिलेली वयोमर्यादेत महाराष्ट्र शासनाने सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे) देण्यात आली आहे यासंदर्भात शासन निर्णय 03 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Other Blogs Related to Talathi Bharti 2023
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |