Marathi govt jobs   »   Study Materials   »   Shimga 2023

Shimga 2023, Story, Rituals, Celebrations of Popular Festival in Konkan | शिमगा उत्सवाबद्दल माहिती

Shimga 2023: Shimga festival in Konkan is an invention of various unique methods, traditions, and folk arts. The festival is celebrated with great enthusiasm from Phak Panchami i.e. Phalgun Shuddha Panchami usually to Gudhipadwa. Shimga is made by burning grass, wood, and cow dung in a purposely dug pit. In this article, we are going to see detailed information about the folk festival of Shimga.

Shimga 2023
Category Study Material
Story Holika Dahan Story
Article Name Shimga 2023
When was Shimga celebrated in Maharashtra in 2023 07 March 2023

Shimga 2023

Shimga 2023: शिमगा (Shimga) हा एक लोकोत्सव आहे. होरी (उत्तर भारत), होळी, शिमगा (महाराष्ट्र), शिग्मा, शिग्मो (कोकण, गोमंतक) ह्या नावांनी तो प्रसिद्ध आहे. देशी नाममाले त हेमचंद्रा ने ह्या लोकत्सवाला ‘सुगिम्हअ’ (सुग्रीष्मक) असे म्हटले आहे. सुगिम्हअवरून शिग्मा हा शब्द आला आणि वर्णविपर्यासाने त्याला शिमगा हे नाव पडले. ते महाराष्ट्रात रूढ आहे. याशिवाय शिमगा (Shimga) उत्सवाला हुताशनी महोत्सव आणि दोलायात्रा, कामदहन अशीही नावे आहेत. शालिवाहन शकाच्या मासगणनेप्रमाणे शेवटचा महिना जो फाल्गुनत्यात फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत हा उत्सव करावा, असे म्हटले जाते. फाल्गुन शुक्ल नवमीपासून फाल्गुनी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो, असे ऋग्वेदी ह्यांनी त्यांच्या आर्यांच्या सणांचा प्राचीनव अर्वाचीन इतिहास ह्या ग्रंथात नमूद केले आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. या लेखात आपण शिमगा (Shimga) या लोकोत्सवाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Story of Shimga | शिमगा सणाची कथा

Story of Shimga: कृष्णाचा वध करायला आलेल्या पूतनेचे उदाहरण प्रसिद्ध आहे. होळी ही एका मुद्दाम खणलेल्या खड्ड्यात गवत, लाकूड, गोवऱ्या पेटवून केली जाते. पूतनेला स्वतः कृष्णाने ठार मारले; तथापि होलाका, ढूंढा ह्या राक्षसिणींचे दहन केल्याच्या पुराणोक्त कथा आहेत. मदनाचे शिवाने दहन केल्याच्याकथेशीही होळीच्या उत्सवाचा संबंध जोडण्यात येतो. होळीच्या संदर्भातला धार्मिक विधी असा : होळी पौर्णिमेच्या सायंकाळी व्रत कर्त्याने शुचिर्भूत होऊन ‘ढूंढा राक्षसिणीच्या पिडेचा परिहार व्हावा, म्हणून मी कुटुंबासह होलिकेची पूजा करतो’, असा संकल्प प्रकट करावा. नंतर होलिकेची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर होलिकेची प्रार्थना करून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि मग होळी पेटवावी. नंतर बोंबा ठोकाव्यात. शिमगा (Shimga) ह्या सणाच्या संदर्भात भविष्यपुराणा त ढूंढा राक्षसिणीची कथा आलेली आहे.

Shimga
Adda247 Marathi App

Holika Dahan Story in Marathi

What rituals are performed on Shimga 2023? | शिमगा सणाला कोणते विधी केल्या जातात?

शिमगा (Shimga) हा सन विविध पध्दतीने साजरा केल्या जातो. त्यातील काही पद्धती खालीलप्रमाणे आहे.

  • देवाची रूपे लागल्यानंतर पालखी बाहेर काढली जाते.
  • काही गावांमध्ये होळी झाल्यानंतर पालखी गावोगावी फिरते.
  • यावेळी ग्रामदेवतेचे मुखवटे पालखीमध्ये स्थापन केले जातात.
  • पालखीला छान अशी आरास करून गावातील प्रत्येकाच्या घरी फिरवली जाते.
  • ज्यादिवशी पालखी येणार आहे त्या दिवशी अंगणामध्ये सडा सारवण घालून ग्रामदेवतेच्या आगमनाची तयारी केली जाते.
  • सुहासिनी ग्रामदेवतेची ओटी भरतात. नवस बोलले जातात. कुटुंबाच्या सुखसमाधानासाठी गाऱ्हाणी घातली जातात.
  • यादिवशी घरामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात.

Shimga Festival in Konkan | कोकणातील शिमगोत्सव

Shimga in Konkan: कोकणातला शिमगोत्सव (Shimga) म्हणजे विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, परंपरा, लोककला यांचा आविष्कार असतो. फाक पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणात शिमग्याचे महत्त्व आणि उत्साह दिवाळीपेक्षा किती तरी अधिक. बाहेरगावी असलेले चाकरमानीही हमखास शिमगोत्सवासाठी (Shimga) गावी येतात. ग्रामदेवतेच्या पालख्या गावागावांत फिरत असतात आणि सगळीकडे एक वेगळेच जल्लोषाचे वातावरण असते.

आजही शिमगा (Shimga) म्हटले की आठ दिवसांची सुट्टी काढून, वेळप्रसंगी एसटी च्या गर्दीतून धक्के खात आपल्या बायली, पोरांसोबत आवर्जून गावाकडे जाणारा मुंबईचा चाकरमानी डोळ्यांसमोर येतो. गावाकडे त्याचे होणारे स्वागत, घरच्या अंगणात, खळ्यात केली जाणारी शिमग्याची तयारी या सगळ्यांची वर्णने आठवायला लागतात.

Vedas In Marathi

How Shimga Festival Celebrated in Konkan? | शिमगोत्सव कोकणात कसा साजरा केल्या जातो?

या शिमगोत्सवामध्ये (Shimga) होळी पेटवण्यापासून रंगांची उधळण, स्थानिक ग्रामदेवतांची पालखी नाचवणं, जळती लाकडं फेकण्याचा खेळ अनेक प्रकार पहायला मिळतात. अंगण शेणाने सारवून सज्ज केले जाते. सड्यावरच्या गेरूने घराला तांबडा लखलखीत रंग दिला जातो

ढोलताशाच्या गजरात, नाचत, गात ती गावात देवळाच्या समोर किंवा परंपरेनुसार ठरलेल्या जागी आणली जाते. आणि सुरू होतो शिमगा, पौणिर्मेच्या अगोदर तीन, पाच, सात दिवस. पौणिर्मेला मुख्य होळी जळण्याच्या अगोदर सारी वाडी, सारा गाव शिमगामय होतो. देवळाच्या मुख्य मंडपाच्या माडीवर ठेवलेली पालखी खाली आणली जाते. ही पालखी व त्यातले देव हा या सोहळ्याचा मुख्य गाभा असतो.

त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

Also See

Article Name Web Link App Link
Mahabharat in Marathi Click here to View on Website  Click here to View on App
Ramayan in Marathi Click here to View on Website  Click here to View on App
Epics in Marathi Click here to View on Website  Click here to View on App
Jainism in Marathi Click here to View on Website  Click here to View on App
Cloud and Types of Wind Click here to View on Website  Click here to View on App
Forests in Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Fathers Of Various Fields. Click here to View on Website  Click here to View on App
Important List Of Sports Cups And Trophies Click here to View on Website  Click here to View on App
Important Events Of Indian Freedom Struggle Click here to View on Website  Click here to View on App
Important List Of Sports Cups And Trophies Click here to View on Website  Click here to View on App
Samruddhi Mahamarg Click here to View on Website Click here to View on App

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

Sharing is caring!

FAQs

What is meant by Shimga?

Locals believe that Shimga represents the arrival of God and therefore carry idols of the deities to their houses in Palkhis or palanquins.

What is shimga in konkan?

Shimga is celebrated according to each village tradition in Konkan form 5 to 15 days.

Where is Shimga celebrated?

In Maharashtra, particular to kokan region(Raigad, Ratnagiri, Sindhudurg) locals have a special and grand way of observing this joyous occasion of Shimga.