Table of Contents
MPSC Rajyaseva Exam 2021 Online Registration Reopen: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC), विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 390 पदांसाठी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात 4 ऑक्टोबर 2021 रोजी MPSC च्या Official Website वर जाहीर केली होती. ज्याची ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2021 होती. परंतु आता MPSC Rajyaseva परीक्षेसाठी Online Registration पुन्हा सुरु झाले आहे. तर चला आज या लेखात MPSC Rajyaseva Exam 2021 Online Registration Reopen (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरु आहे) याची संपूर्ण माहिती घेऊयात, तसेच MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या Important Dates, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन अर्ज करण्यासाठीचे थेट लिंक, इत्यादी गोष्टींचा सविस्तर माहिती घेणार आहोत.
MPSC Rajyaseva Exam 2021 Online Registration Reopen | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरु
MPSC Rajyaseva Exam 2021 Online Registration Reopen: राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता दिनांक 04 ऑक्टोबर, 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून (जाहिरात क्रमांक 106/2021) वयोमर्यादेची कमाल गणना तत्कालिन शासन नियमानुसार करण्यात आली होती. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरव्ही 2021/प्र.क्र.61 / कार्या- 12. दिनांक 17 डिसेंबर, 2021 अन्वये दिनांक 01 मार्च, 2020 ते दिनांक 17 डिसेंबर, 2021 (शासन निर्णयाचा दिनांक) या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल त्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाकडून प्रस्तुत दिनांक 17 डिसेंबर, 2021 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित परीक्षेकरीता दिनांक 01 मार्च, 2020 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधील कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार फक्त दिनांक 01 मार्च, 2020 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांनी खालीलप्रमाणे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे :
- अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 28 डिसेंबर, 2021 रोजी 17.00 वाजल्यापासून दिनांक 01 जानेवारी, 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत.
- ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याकरीता विहित अंतिम दिनांक 01 जानेवारी, 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत.
- भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे याकरीता विहित अंतिम दिनांक 02 जानेवारी, 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत.
- चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 03 जानेवारी, 2022 बँकेच्या कार्यालयीन वेळेत.
वरीलप्रमाणे विहित पद्धतीने व विहित कालावधीत अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनाच विषयांकित परीक्षेच्या प्रवेशासाठी विचार करण्यात येईल.
MPSC Rajyaseva Exam 2021 Online Registration Reopen
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Important Dates | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 महत्वाच्या तारखा
MPSC Rajyaseva Purva Pariksha Important Dates: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021: Important Dates | |
Events | Dates |
Notification (जाहिरात) | 4 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) | 5 ऑक्टोबर 2021 28 डिसेंबर, 2021 (Reopen) |
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) |
2 नोव्हेंबर 2021 01 जानेवारी, 2022 |
पूर्व परीक्षेची तारीख (Prelims Exam Date) |
2 जानेवारी 2022
|
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date) | 7, 8 व 9 मे, 2022 |
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात | MPSC Rajyaseva Prelims Exam Notification 2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online Link | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज लिंक
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online Link: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 5 ऑक्टोबर 2021 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या रिक्त पदांची वाट पाहत असलेले सर्व उमेदवारांना MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला जाण्याची गरज नाही, ते फक्त खालील लिंकवर click करून अर्ज करू शकतात.
Apply Online MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021
MPSC Rajyaseva Prelims Exam Notification 2021 Vacancies | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 जाहिरात: रिक्त जागा
MPSC Rajyaseva Prelims Exam Notification 2021- Vacancies: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवगातील एकूण 390 पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 रविवार दिनांक 02 जानेवारी, 2022 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खाली दिलेल्या PDF मध्ये पाहू शकता.
MPSC Rajyaseva Prelims Exam Vacancy details पाहण्यासाठी येथे किल्क करा
वाढीव Vacancy details पाहण्यासाठी येथे किल्क करा
MPSC Rajyaseva Prelims Exam 2021 Application Fees | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा- अर्ज शुल्क
MPSC Rajyaseva Prelims Exam 2021 Application Fees: उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.
- अराखीव (खुला): 544/- रुपये
- मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ: 344/- रुपये
- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
MPSC च्या आगामी परीक्षा | MPSC Upcoming Exams
Also Read,
MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed
MPSC Group B Exam 2021 Online Registration Reopen
MPSC राज्य सेवा परीक्षेचे स्वरूप (पूर्व + मुख्य)
MPSC राज्यसेवा परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम
MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण
FAQs: MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Online Registration Date Extended
Q.1 MPSC ने राज्यसेवा पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?
Ans: MPSC ने MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना 4 ऑक्टोबर 2021 जारी केली आहे.
Q2. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
Ans: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क 544/- रुपये आहे.
Q.3 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती कुठे मिळेल ?
Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती Adda247 च्या App आणि website वर मिळेल.