Mahatma Jyotirao Phule is the greatest Social Reformer of Maharashtra. In this article, you will get detailed information about Mahatma Phule like their Biography, Activities, Social work, and Quotes. He led the movement against the prevailing caste restrictions in India. He revolted against the domination of the Brahmins and struggled for the rights of peasants and other low-caste people. Mahatma Jyotiba Phule was also a pioneer for women’s education in India and fought for the education of girls throughout his life.
Mahatma Jyotirao Phule | |
Category | Study Material |
Exam | All Competitive Exams |
Subject | History (Social Reformers) |
Name | Mahatma Jyotirao Phule Biography, Activities, Social work, Quotes |
Mahatma Jyotirao Phule: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा जसे की, MPSC राज्यसेवा परीक्षा, MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि तसेच गट क संयुक्त परीक्षा सोबतच महाराष्ट्रातील इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातील समाजसुधाराकांवर बरेच प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील थोर समाजसुधाराकांपैकी एक म्हणजे महात्मा फुले (Mahatma Jyotirao Phule) आहेत. पुरोगामी विचारांची मांडणी करणारे आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotirao Phule) यांची जयंती महाराष्ट्रात दरवर्षी 11 एप्रिल रोजी साजरी करण्यात येते. आज या लेखात आपण महात्मा ज्योतीराव फुले (Mahatma Jyotirao Phule) यांच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे.
Mahatma Jyotirao Phule Biography: महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत Mahatma Jyotirao Phule होते.मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले. जोतीरावांच्या (Mahatma Jyotirao Phule) लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवरच पडला. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या, तरी शालान्त परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. Mahatma Jyotirao Phule यांच्या शिक्षणासंबंधीच्या प्रसिद्ध Quote खालीलप्रमाणे आहे.
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।
Mahatma Jyotirao Phule Biography | |
---|---|
जन्म / Born | 11 एप्रिल, 1827 |
जन्म ठिकाण / Place of Birth | सातारा, महाराष्ट्र |
वडील / Father | गोविंदराव शेरीबा फुले |
आई / Mother | चिमणाबाई फुले |
पत्नी / Spouse | सावित्रीबाई फुले |
अपत्ये / Childeren | यशवंत फुले |
मृत्यू / Passed Away | 28 नोव्हेंबर 1890 (वय 63) पुणे, महाराष्ट्र |
संघटना / Organizaion | सत्यशोधक समाज |
प्रमुख स्मारके / Memorial | भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे |
Social Reformers of Maharashtra- Part 1 (भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर आणि सार्वजनिक काका)
Mahatma Jyotirao Phule Social work: मानवी हक्कावर इ.स.1791 मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव Mahatma Jyotirao Phule यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते.
‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी (Mahatma Jyotirao Phule) सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ‘ सार्वजनिक सत्यधर्म ‘ संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे. त्यातील काही महत्त्वाची वचने लिहिली.
Social Reformers of Maharashtra- Part 2 (जगन्नाथ शंकरशेट, गोपाळ हरी देशमुख, आणि न्या. महादेव गोविंद रानडे)
Mahatma Jyotirao Phule: Started Schools: महात्मा फुले (Mahatma Jyotirao Phule) यांनी सुरू केलेल्या शाळा व त्यांची वर्ष खालीलप्रमाणे आहे.
Social Reformers of Maharashtra- Part 3 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
Mahatma Jyotiba Phule: Important Events: ज्योतिबा फुले (Mahatma Jyotirao Phule) यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना खालीलप्रमाणे आहे.
Social Reformers of Maharashtra- Part 4 (लोकमान्य टिळक)
Mahatma Jyotirao Phule: Written Books ज्योतिबा फुले (Mahatma Jyotirao Phule) यांची ग्रंथ संपदा खालीलप्रमाणे आहे.
Social Reformers of Maharashtra- Part 5 (राजर्षी शाहू महाराज)
Social Reformers of Maharashtra- Part 6 (सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई)
Q1. महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म कधी झाला?
Ans. महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला.
Q2. महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुहे सुरु केली?
Ans. महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे सुरु केली.
Q3. महात्मा फुले यांच्या मनावर कोणत्या पुस्तकाचा प्रभाव पडला?
Ans. महात्मा फुले यांच्या मनावर थॉमस पेन यांच्या “Rights of man” या पुस्तकाचा प्रभाव पडला.
Q4. महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली?
Ans. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
Mahatma Jyotirao Phule was born on 11 April 1827.
Mahatma Jyotirao Phule and Savitribai Phule started the first school for girls at Bhidewada in Pune.
Mahatma Phule was influenced by Thomas Payne's book "Rights of Man".
Mahatma Phule founded Satyashodhak Samaj.
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…