महाराष्ट्रातील विभाग: महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभागाबद्दल सविस्तर माहिती, जिल्हा परिषद भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

महाराष्ट्रातील विभाग

महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग: आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्रात सुरुवातीला 26 जिल्हे होते. आज काळाच्या ओघात यात वाढ झाली. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे अस्तित्वात आहेत. प्रशासकीय हेतूने त्यांची विभागणी सहा महसूली विभागांत आणि आठ शैक्षणिक विभागांत करण्यात आली आहे. या 36 जिल्ह्यांची विभागणी 109 उपविभाग आणि 355 तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे. राज्यात स्थानिक अथवा जिल्हा स्तरावर नियोजनाच्या सक्षम यंत्रणांची दीर्घ परंपरा आहे. आगामी काळातील जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा घटक आहे. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग याबद्दल माहिती जसे की महाराष्ट्रातील प्रशाकीय विभाग कोणते आहे. प्रादेशिक विभाग कोणते याबद्दल माहिती दिली आहे.

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील विभाग: विहंगावलोकन

महाराष्ट्रात एकूण 06 प्रशासकीय विभाग असून आपण या लेखात महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांबद्दल थोडक्यात खालील तत्क्त्यात माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील विभाग: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता जिल्हा परिषद भरती व  सर्व स्पर्धा परीक्षा
विषय महाराष्ट्राचा भूगोल
लेखाचे नाव महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग
महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग 06
प्रशासकीय विभागांची नावे
  • कोकण
  • नाशिक
  • पुणे
  • छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
  • अमरावती
  • नागपूर

प्रशासकीय विभाग म्हणजे काय

प्रादेशिक विभागाच्या प्रशासनाकरिता शासनाने संपूर्ण महाराष्ट्राची काही प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. ते म्हणजे कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. सध्या महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आहेत. अमरावती आणि नाशिक हे दोन नविन प्रशासकीय विभाग करण्यात आले.

प्रादेशिक विभागाचा नकाशा

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि त्यांच्याविषयी माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

प्रशासकीय विभाग क्षेत्रफळ

(चौ.कि.मी.)

जिल्हे तालुके मोठा जिल्हा (चौ. कि.मी.) लहान जिल्हा (चौ. कि.मी.)
कोकण 30728 7 50  रत्नागिरी (8208) मुंबई शहर (157)
नाशिक 54493 5 54 अहमदनगर (17,048) नंदुरबार (5034)
पुणे 57275 5 58 पुणे (15,643) कोल्हापूर (7685)
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) 64813 8 76 बीड (10,693) हिंगोली (4524)
अमरावती 46027 5 56 यवतमाळ (13,552) वाशीम (5153)
नागपूर 51377 6 64 गडचिरोली (14,412) भंडारा (3895)

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार जिल्हे

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार जिल्हे खालीलप्रमाणे आहेत.

प्रशासकीय विभाग जिल्हे
नाशिक नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर
कोकण मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
अमरावती अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम
नागपुर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाबद्दल महत्वाचे मुद्दे

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाबद्दल महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहे.

प्रशासकीय विभागाची क्षेत्रफळानुसार क्रमवारी

  1. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) 64813 (चौ.कि.मी.)
  2. नाशिक 57493 (चौ.कि.मी.)
  3. पुणे 57275 (चौ.कि.मी.)
  4. नागपूर 51377 (चौ.कि.मी.)
  5. अमरावती 46027 (चौ.कि.मी.)
  6. कोकण 30728 (चौ.कि.मी.)

क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे 05 जिल्हे:-

  1. अहमदनगर: 17048चौ.कि.मी
  2. पुणे: 15643 चौ.कि.मी
  3. नाशिक: 15530 चौ.कि.मी
  4. सोलापूर: 14895 चौ.कि.मी
  5. गडचिरोली: 14412 चौ.कि.मी

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे :- 

  1. मुंबई शहर: 157 चौ.कि.मी
  2. मुंबई उपनगर: 446 चौ.कि.मी
  3. भंडारा: 3896 चौ.कि.मी
  4. ठाणे: 4214 चौ.कि.मी
  5. हिंगोली: 4524 चौ.कि.मी

प्रादेशिक विभाग म्हणजे काय

महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागला आहे. या विभागांना प्रादेशिक विभाग असे म्हणतात. ते विभाग पुढीलप्रमाणे आहेत:

  1. कोकण
  2. पश्चिम महाराष्ट्र
  3. मराठवाडा
  4. उत्तर महाराष्ट्र / खानदेश
  5. विदर्भ

महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागानुसार जिल्हे

महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागानुसार जिल्हे खालीलप्रमाणे आहेत.

प्रादेशिक विभाग जिल्ह्याची संख्या जिल्हे
कोकण 7 मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पश्चिम महाराष्ट्र 7 पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर
मराठवाडा 8 औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर
उत्तर महाराष्ट्र / खानदेश 3 जळगाव, धुळे, नंदुरबार
विदर्भ 11 नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम

महाराष्ट्रातील नवीन जिल्हे व निर्मिती दिनांक

महाराष्ट्रातील नवीन जिल्हे व निर्मिती दिनांक खालीलप्रमाणे आहे.

मूळ जिल्हा नविन जिल्हा निर्मिती
रत्नागिरी सिंधूदुर्ग 1 मे 1981
औरंगाबाद जालना
उस्मनाबाद लातूर 15 ऑगस्ट 1982
चंद्रपूर गडचिरोली 26 ऑगस्ट 1982
बृहन्मुबई मुंबई उपनगर 4 ऑक्टोंबर 1990
अकोला वाशिम 1 जुलै 1998
धुळे नंदुरबार
भंडारा गोंदिया 1 मे 1999
हिंगोली परभणी
ठाणे पालघर 1 ऑगस्ट 2014

महाराष्ट्रातील सर्वाधिक तालूक्यांची संख्या असणारे जिल्हे: 

  • नांदेड व यवतमाळ: प्रत्येकी 16 तालुके
  • नाशिक, जळगाव, चंद्रपुर, रायगड: प्रत्येकी 15 तालुके
  • पुणे, अहमदनगर, नागपूर: प्रत्येकी 14 तालुके
  • कोल्हापूर व गडचिरोली: प्रत्येकी 12 तालुके

महाराष्ट्रातील समान नावाचे तालुके असणारे जिल्हे :-

  • नांदगाव:नाशिक-अमरावती
  • शिरूर: बीड-पुणे
  • आष्टी: बीड-वर्धा
  • खेड:  पुणे-रत्नागिरी
  • कळंब: यवतमाळ-उस्मानाबाद
  • मालेगाव: नाशिक-वाशिम
  • कारंजा: वाशिम-वर्धा
  • कर्जत: अहमदनगर-रायगड
  • सेलू: परभणी-वर्धा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी टेलिग्राम

जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव लिंक
राष्ट्रीय आरोग्य अभियान
महाराष्ट्रातील लोकजीवन
भारतीय संविधानाची उद्देशिका
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023)
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

FAQs

महाराष्ट्राचे विभाग का केले?

प्रादेशिक विभागांच्या कारभारासाठी शासनाने संपूर्ण महाराष्ट्राची काही प्रशासकीय विभागांमध्ये विभागणी केली आहे.

महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत?

राज्यात 36 जिल्हे आहेत जे सहा महसुली विभागांमध्ये विभागले गेले आहेत ते पुढीलप्रमाणे कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर.

महाराष्ट्राचे प्रसासकीय आणि प्रादेशिक विभाग किती आहेत?

महाराष्ट्र 6 प्रशासकीय विभाग आणि 5 प्रादेशिक विभागांमध्ये विभागलेला आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे?

औरंगाबाद हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे.

महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?

महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत.

chaitanya

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

1 hour ago

प्रधानमंत्री जन धन योजना | Pradhan Mantri Jan Dhan Yojana : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

प्रधानमंत्री जन धन योजना Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment 2024…

3 hours ago

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती…

3 hours ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. When were the Fundamental Duties of the Indian citizens incorporated in the Constitution? (a)…

3 hours ago

Auxiliary Verb : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

Auxiliary Verb Title  Link  Link  महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना अँप लिंक वेब लिंक  Auxiliary Verb Auxiliary verbs, also known…

4 hours ago

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) | Five Year Plan (Short Trick to Remember) : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) Title  लिंक लिंक  आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक पंचवार्षिक योजना…

4 hours ago