Categories: Latest Post

राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023, पदानुसार वेतनश्रेणी आणि जॉब प्रोफाइल बद्दल माहिती मिळावा

राज्य उत्पादन शुल्क विभाग वेतन 2023

राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023: राज्य उत्पादन शुल्क विभाग विभाग भरती 2023 अंतर्गत जवान, जवान-नि-वाहनचालक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक आणि चपराशी या संवर्गातील रिक्त पदाची भरती होणार आहे. जे उमेदवार राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 ची परीक्षा देत असतील त्यांना राज्य उत्पादन शुल्क त्यांच्या कर्मचार्‍यांना ऑफर करत असलेले राज्य राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023 याबद्दल जाणून घ्यायची उत्सुखता असेल. या लेखात आपण राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023 अंतर्गत भरती होणाऱ्या सर्व पदांचे वेतन, भत्ते, मानधन, जॉब प्रोफाईल (कामाचे स्वरूप) इत्यादींबद्दल माहिती पाहणार आहोत

राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023: विहंगावलोकन

या लेखात पदानुसार राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023 देण्यात आले आहे. ज्यात वेतनश्रेणी आणि इतर भत्ते याबद्दल माहिती दिली आहे. त्यासोबतच पदानुसार कोणती कर्तव्य उमेदवारास पार पडावी लागतात याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभागाचे नाव राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव राज्य उत्पादन शुल्क भरती 2023
पदांची नावे
  • जवान
  • जवान-नि-वाहनचालक
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • लघुटंकलेखक
  • चपराशी
लेखाचे नाव राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023
अधिकृत संकेतस्थळ www.stateexcise.maharashtra.gov.in

राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023: पदानुसार वेतनश्रेणी आणि जॉब प्रोफाइल

जवान, जवान-नि-वाहनचालक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक आणि चपराशी या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. या लेखात वरील सर्व पदास किती वेतन मिळते, त्याची वेतनश्रेणी, महाराष्ट्र शासनातर्फे मिळणारे इतर भत्ते व जॉब प्रोफाइल (कामाचे स्वरूप) याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

अड्डा 247 मराठी अँप

राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023: पदानुसार वेतन संरचना

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 मधील सर्व पदांची वेतन संरचना खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे. 

पदाचे नाव वेतन श्रेणी
जवान S7: रु. 25,500 ते रु. 81,100
जवान-नि-वाहनचालक S7: रु. 25,500 ते रु. 81,100
लघुलेखक (निम्नश्रेणी) S15: रु. 41,800 ते रु. 1,32,300
लघुटंकलेखक S8: रु. 25,500 ते रु. 81,800
चपराशी S1: रु. 15,000 ते रु. 47,600
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 टेस्ट सिरीज

राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023 सोबत मिळणारे इतर भत्ते

राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणेआहेत.

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात. जसे जवान पदासाठी बेसिक पे 25,500 आहे तर जवान पदाची इन हॅन्ड सॅलरी (एकूण वेतन) खालीलप्रमाणे असेल. 

वेतन संरचना रु. मध्ये रक्कम
मुळ वेतन 25500
महागाई भत्ता (DA) 10710
घरभाडे भत्ता (HRA) 4590
वाहतूक भत्ता (TA) 2556
एकूण वेतन 43356

टीप: हे वेतन फक्त उदाहरण म्हणून दार्शाविण्यात आले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे, नोकरीच्या ठिकाणांनुसार यात बदल असू शकतो.

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत येणाऱ्या सर्व पदांचे जॉब प्रोफाईल

राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्याने मद्यार्कयुक्त /अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम करतो. तसेच अशा मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज या विभागमार्फत केले जाते. सदरचा उद्देश हा मद्यार्कयुक्त पदार्थांची निर्मिती / वाहतुक / विक्री / बाळगणे / आयात / निर्यात / इत्यादीसाठी विविध अनुज्ञप्ती / परवाने मंजुर करुन साध्य करण्यात येते. तसेच गुन्हा अन्वेषण करून सक्त अंमलबजावणी व दक्षता राखली जाते. राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 मधील जवान, जवान-नि-वाहनचालक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक आणि चपराशी या सर्व पदांचे जॉब प्रोफाईल खालील तक्त्यात दिले आहे.

पदाचे नाव जॉब प्रोफाईल
जवान
  • राज्याच्या मद्य धोरणाचे पालन सुनिश्चित करणे.
  • राज्यातील दारूची अवैध वाहतूक आणि संकलन यावर लक्ष ठेवणे.
  • छापे टाकण्यात आणि अवैध दारू जप्त करण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदत करणे.
  • तपासादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदत करणे
  • कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना नियुक्त केलेल्या परिसरात गस्त घालणे.
जवान-नि-वाहनचालक
  • गस्त घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जाणे
  • रात्री शहरात / तालुक्यात फेरफटका मारणे
  • गरजेनुसार जवानाची सर्व कार्य पार पाडणे
लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कार्यालयीन कामकाजाचे प्रतीलेखन करणे
  • लघुलेखन करणे
  • वरिष्ठ अधिकार्‍यांच्या भाषणांची नोंद करणे
  • मीटिंगच्या नोट्स तयार करणे
  • सर्व शासकीय कार्यवाही सुरळीतपणे पार पडतील याची खात्री करणे
  • आवश्यकतेनुसार इतर प्रशासकीय कामे करणे
लघुटंकलेखक
  • अधिकारी वर्गाची महत्वपूर्ण कार्याचे नियोजन करणे
  • लाघुलेखनाद्वारे मिळालेली माहिती संगणकावर टाईप करणे
  • अधिकाऱ्याने दिलेली इतर पत्रव्यवहार सांभाळणे
चपराशी
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे पार पाडणे
  • सर्व फाईल्स व्यवस्थित रिक्त्या ठेवणे
  • इतर कार्यालयीन कामकाज
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 टेस्ट सिरीज

FAQs

राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023 बद्दल माहिती मला कोठून मिळू शकते?

राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान या पदाची वेतनश्रेणी काय आहे?

राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान या पदाची वेतनश्रेणी S7: रु. 25,500 ते रु. 81,100 ही आहे.

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला कोणते भत्ते दिले जातात?

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता इत्यादी भत्ते दिले जातील.

chaitanya

Recent Posts

तुम्हाला “कर्तव्यपराङ्मुख” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

8 mins ago

Do you know the meaning of Cozen? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

39 mins ago

Current Affairs in Short (02-05-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

राष्ट्रीय बातम्या चिनी आयातीवर भारताचे अवलंबित्व: ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने चिनी आयातीवरील भारताच्या अवलंबनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे,…

1 hour ago

1 May MPSC 2024 Study Kit | 1 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

16 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 01 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

16 hours ago

मराठी व्याकरण भाग 5 – शब्दसमूहाबद्दल एक शब्द : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी विषयात अनन्यसाधारण महत्व आहे. आगामी काळातील भरती जसे कि,…

17 hours ago