Categories: Latest Post

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-13th July

 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. आपण एमपीएससी आणि इतर परीक्षाची तयारी करत असाल तर आपल्याला क्विझ देण्याचे महत्त्व माहित असलेच पाहिजे. बर्‍याच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पुरेसे तास दिले जात असतानाही त्यांना या परीक्षांची पूर्तताही करता आली नाही कारण ते त्यांचे परीक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत आणि संशोधन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या संबंधित विषयाची किंवा विषयाची क्विझ देणे कारण आपण या मार्गाने कव्हर करू शकता कमी वेळात जास्तीत जास्त विषय.  दैनिक क्विझ देऊन तुम्ही तुमच्या तयारीची पातळी तपासू शकता. महाराष्ट्र राज्य संदर्भात आपला एकूण किती अभ्यास झालेला आहे ह्याची पूर्तता करण्यासाठी घेऊन येत आहोत Maharashtra State GK Quiz प्रश्न व संपूर्ण मराठीत स्पष्टीकरणासह.

 

Q1. दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे

(a) भिमा, निरा, कृष्णा, वारणा

(b) वारणा, कृष्णा, भिमा, निरा

(c) कृष्णा, वारणा, भिमा, निरा

(d) वारणा, कृष्णा, निरा, भिमा

 

Q2. मुंबई शहराचे स्थान, आणि स्थितीवैशिष्टय मुंबईच्या विकासासाठी कारण

  1. मुंबई एक नैसर्गिक बंदर आहे सागरी मार्गाने सर्व जगाशी जोडलेले आहे.
  2. मुंबई देशाच्या सर्व भागाशी रस्ते रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. ज्या मुळे देशाच्या इतर भागाशी समृध्द असे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध विकसित झालेले आहे.
  3. शासनाने मुंबईच्या विकासावर विशेष लक्ष पुरविलेले आहे.
  4. मुंबई एक औदयोगिक शहर आहे.

वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे?

(a) (1)

(b) (2)

(c) (1) आणि (2)

(d) (3) आणि (4)

 

Q3. बॉम्बे हाय येथे पहिली तेल विहिर केव्हा खोदली गेली?

(a) 13 मार्च 1999

(b) 3 फेब्रुवारी 1974

(c) 1मे 1960

(d) 10 ऑगस्ट 1948

 

Q4. मालवण, वेंगुर्ला आणि गोव्याकडे जाण्यासाठी —– हा घाट अत्यंत उपयुक्त आहे.

  1. फोंडा आणि आंबोली
  2. थळघाट बोरघाट
  3. आंबा घाट
  4. आंबेनळी

पर्यायी उत्तरे :

(a) फक्त (1) बरोबर

(b) फक्त (2) बरोबर

(c) (1) आणि (3) बरोबर

(d) (3) आणि (4) बरोबर

 

Q5. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

  1. महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची घनता सांगली सोलापूर जिल्हयात असून सर्वात कमी घनता कोकण विभागात नागपूर विभागात आहे.
  2. महाराष्ट्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण 15% असून विदर्भातील बहुतेक जिल्हयात तलावाच्या साहाय्याने 60% टक्के पाणी पुरवठा केला जातो.

पर्यायी उत्तरे :

(a) फकत (1)

(b) फक्त (2)

(c) (1) आणि (2)

(d) वरीलपैकी कोणतही नाही.

 

Q6. महाराष्ट्रातील कोकणच्या प्रदेशात पडणाऱ्या पावसासंबंधी कोणते विधान बरोबर आहे?

  1. कोकणात प्रतिरोध अभिसरण पाऊस पडतो.
  2. कोकणात प्रतिरोध पाऊस पडतो.
  3. कोकणात आवर्त अभिसरण पाऊस पडतो.
  4. कोकणात आवर्त पाऊस पडतो.

पर्यायी उत्तरे :

(a) फक्त (1) बरोबर

(b) फक्त (2) बरोबर

(c) फक्त (3) आणि (4) बरोबर

(d) फक्त (1) आणि (4) बरोबंर

 

Q7. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो?

(a) महाबळेश्वर

(b) माथेरान

(c) लोणाळळा

(d) आंबोली

 

Q8. सुधागड जिल्हयाचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?

(a) आंबा

(b) सावित्री

(c) उल्हास

(d) भोगवती

 

Q9. महाराष्ट्राची किनारपट्टी —- म्हणून ओळखली जाते.

(a) कारवार किनारा

(b) मलबार किनारा

(c) कोकण किनारा

(d) उत्कल किनारा

 

Q10. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे धुळीची वादळे ही आहेत किंवा एकदोन वादळे एप्रिल आणि मे मध्ये किंवा जूनच्या सुरुवातीस विशेषतः राज्याच्या अंतर्गत या भागात तयार होतात.

(a) विदर्भ

(b) मराठवाडा

(c) धुळे आणि जळगाव जिल्हे

(d) दक्षिण मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्र

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

SOLUTIONS

S1. Ans.(d)

Sol. वारणा ही कृष्णा नदीची उपनदी आहें. तर भीमा नदीची उपनदी निरा आहे.

वारणानदी पुर्व व आग्नेय दिशेने वाहत जाते व सांगली जवळ उजव्या किनाऱ्याने कृष्णेस मिळते.

नीरा नदीचा उगम भोर तालुक्‍यात होतो. पुणे व साताऱ्याची सरहद निर्माण करते. पुढे नीरा व कऱ्हा चा संगम होतो व शेवटी भीमानदीस मिळतात.

 

S2. Ans.(c)

Sol. मुंबई शहराचे स्थान आणि स्थिती वैशिष्ट्ये :

स्थान व विस्तार – मुंबईच्या पूर्वेस, दक्षिणेस, पश्‍चिमेस अरबी समुद्र आहे. उत्तरेस ठाणे आहे.

एकूण क्षेत्रफळ-603 चौ. कि.मी.आहे. (मुंबई शहर –उपनगर)

मुंबई स्थान समुद्र किनारी असल्यामुळे तसेच ते भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर असल्यामळे इतर देशांशी सागरी मार्गाने सहज संपर्क साधता येतो. मुंबई शहराचा देशाचे कापड उद्योगाचे माहेरघर म्हणतात. देशातला सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज बाजार मुंबईत आहे.

मुंबई शहराचा विकास होण्यामागील कारणे :

1.स्थान (समद्र किनारी)

  1. वाहतूक/दळणवळणाचे सोपे ठिकाण
  2. स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध
  3. बाजारपेठ
  4. भांडवल पुरवठा
  5. नैसर्गिक बंदर
  6. सागरीमार्गे इतर देशांशी सहज संपर्क
  7. उपलब्ध मजुरांची संख्या
  8. वेगवेगळ्या उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण
  9. लोकसंख्या

 

S3. Ans.(b)

Sol. बॉम्बे हाय : प्रकल्पाचे नाव – सागर सम्राट

मुंबईजवळ पश्‍चिमेस 176 किमी अंतरावर अरबी समुद्रात 3 फेब्रुवारी 1974 पहिली विहीर खोदण्यात आली व ते तेलक्षेत्र म्हणजे बॉम्बे हाय या नावाने ओळखले जाते.

भारतातील खनिज तेलाचे 50 टक्के उत्पादन बॉम्बे हाय तेलक्षेत्रामधून घेतले जाते.

येथील नैसर्गिक वायू उरण बंदराजवळ साठवला जातो.

या क्षेत्रात तेल विहीरी खोदण्याचे काम ONGC मार्फत केले जाते.

 

S4. Ans.(a)

Sol. उत्तरेकडून दक्षिणेकडे जातांना लागणारा घाटांचा क्रम :

थळ घाट (कसारा घाट) – मुंबई-नाशिक

माळशेज घाट – ठाणे-अहमदनगर

बोर घाट – मुंबई – पुणे

खंबाटकी घाट – पुणे-सातारा

पसरणी घाट – वाई-महाबळेश्वर

आंबेनळी घाट – महाबळेश्वर-महाड

कुंभार्ली घाट – कराड-चिपळुन

आंबा घाट – कोल्हापुर-रत्नागिरी

फोडा घाट – कोल्हापुर-पणजी

अंबोली घाट – बेळगाव-सावंतवाडी

 

S5. Ans.(c)

Sol. महाराष्ट्रातील जलसिंचन :

अहमदनगर जिल्हयात सर्वात जास्त विहीरी आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची घनता सांगली व सोलापूर जिल्ह्यात आहे.

सर्वात कमी घनता कोकण व नागपूर विभागात आहे.

विहीरीखालोखाल कालव्यांद्रारे सुमारे 23 टक्के क्षेत्र अंमलात आणले जाते.

मुख्यत्त्वेकरून पठारावर कृष्णा, गोदावरी, भीमा व त्यांच्या उपनद्यांच्या क्षेत्रात पाटबंधारे योजना अमलात आणली जाते.

विहीर व कालवे यानंतर तलावांद्रारे सिंचन केले जाते.

 

S6. Ans.(b)

Sol. कोकणातील पावसाची वैशिष्ट्ये :

कोकणात मान्सून प्रकारचा पाऊस पडतो.

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस घाटमाध्यावर पडतो, त्यानंतर कोकणात पडतो

नैऋत्य मान्सून वारे सह्याद्रीमुळे आडून प्रतिरोध प्रकारचा पाऊस मुख्यतः जून ते ऑक्टोबर मध्ये पडतो.

 

S7. Ans.(d)

Sol. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाच्या प्रमाणानुसार उतरता क्रम:

आंबोली (745cm), महाबळेश्वर(723cm), गगनबावडा(621cm), माथेरान(517cm),

खंडाळा (471cm), लोणावळा (430cm), कणकवली (410cm), सावंतवाडी (376cm)

 

S8. Ans.(a)

Sol. 1.आंबा नदी: पाली तालुका रायगड जिल्ह्यामध्ये आंबा नदीच्या काठावर वसले आहे.

काठावरील शहरे : रेवास, नागोठाण.

  1. भोगावती: भोगावती नदी ही सीना नदीची वितरिका आहे.

सोलापुरातील मोहोळ येथे सीना नदीस भोगावती नदी मिळते

  1. उल्हास नदी: कोकणातील सर्वात मोठी नदी 130 किमी नदीकाठावरील शहरे – उल्हासनगर, कर्जत.

4.सावित्री नदी: महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या पाच नद्यांपैकी एक आहे.

नदीकाठावरील शहरे – पोलादपूर, महाड

 

S9. Ans.(c)

Sol. एकूण नऊ राज्यास समुद्रकिनारा लाभला आहे. सर्वाधिक सागरी सीमा लागलेली राज्य.

समुद्रकिनाऱ्याची नावे:

तमिळनाडू – कोरोमंडल

ओडिशा – उत्कल

केरळ – मलबार

महाराष्ट्र – कोकण

कर्नाटक – कारवार

 

S10. Ans.(a)

Sol.

महाराष्ट्रात एप्रिल-मे महिन्यात विदर्भात तुरळक धुळीची वादळे निर्माण होतात.

उन्हाळ्यात महाराष्ट्रात सर्वत्र तापमान जास्त असते व हवा कोरडी असते.

महाराष्ट्रात तापमानात विषमता आढळून येते..

मराठवाड्यात-एप्रिल तसेच मे मध्ये तापमान जास्त असते.

कोकणात मार्च मध्ये तापमान जास्त असते.

विदर्भात मे मध्ये तापमान जास्त असते.

मध्य महाराष्ट्र एप्रिल मध्ये तापमान जास्त असते.

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 27 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

9 hours ago

Top 05 Current Affairs of Maharashtra MCQs for MPSC, Police Constable, ZP, MIDC | Eng + Mar

For candidates preparing for the MPSC, Police Constable, ZP, MIDC exams, mastering the Current Affairs of Maharashtra is essential. This…

11 hours ago

टॉप 20 अंकगणित MCQ | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | डाउनलोड फ्री PDF

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

12 hours ago

World Day for Safety and Health at Work 2024 | कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस 2024

कामावरील सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस ही सर्व कामगारांसाठी सुरक्षित आणि निरोगी कामाच्या परिस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी 28 एप्रिल रोजी पाळली…

12 hours ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. Which among the following functions is not done by the Indian President? (a) Appointment…

13 hours ago

Top 20 Arithmetic MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Arithmetic…

13 hours ago