Lok Sabha in Marathi: In this article you get detailed information about the Lok Sabha like the Role, Structure, and Duration of Lok Sabha Members. Qualifications for Membership of Lok Sabha and Some special power of Lok Sabha.
Click here to view Download Talathi Admit Card
Last Minutes Tips for Talathi Bharti 2023
Lok Sabha in Marathi | |
Category | Study Material |
Exam | Talathi and Other Competitive Exams |
Subject | Indian Polity |
Name | Parliament of India: Lok Sabha |
Parliament of India: Lok Sabha: भारतीय संसदेचे तीन प्रमुख अंग आहेत राष्ट्रपती (President), राज्यसभा (Parliament of India: Rajya Sabha) व लोकसभा (Parliament of India: Lok Sabha in Marathi). याआधी आपण राज्यसभा बद्दल महत्वपूर्ण माहिती पहिली आहे. लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभे चे सदस्य हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. लोकसभे ची निवडणूक ही भारतीय प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून निवडणूक केली जाते. प्रत्येक लोकसभेचा कालावधी हा जास्तीत जास्त 5 वर्षाचा असतो. आज या लेखात आपण लोकसभा (Parliament of India: Lok Sabha in Marathi) याबद्दल माहिती जसे की, लोकसभेची भूमिका, लोकसभेची रचना, लोकसभेचे अधिकार, व इतर महत्वाची माहिती पाहणार आहे.
Parliament of India: भारतीय संघाच्या सर्वोच्च कायदेमंडळाला ‘संसद’ (Parliament) म्हणून संबोधले जाते. संसद ही भारतीय शासनव्यवस्थेचे कायदेकारी अंग (Legislative organ) आहे. घटनेच्या कलम 79 अन्वये, भारताच्या संघराज्यासाठी एक संसद असेल, आणि ती राष्ट्रपती (President) व लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभा (Rajya Sabha) ही दोन सभागृहे मिळून बनलेली असेल. घटनेतील ‘Council of States’ आणि ‘House of Peoples’ या सभागृहांसाठी अनुक्रमे ‘राज्यसभा’ व ‘लोकसभा’ ही हिंदी नावे स्विकारण्यात आली. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह (Upper House) असून ते भारतीय संघराज्यातील घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीत्व करते. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह (Lower House) असून ते भारतातील जनतेचे प्रत्यक्ष प्रतिनिधीत्व करते.
Parliament of India: Rajya Sabha
Composition of Lok Sabha in Marathi: लोकसभेच्या (Lok Sabha) रचनेची तरतूद कलम 81 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार, लोकसभेची (Lok Sabha) महत्तम सदस्य संख्या (maximum strength) 552 इतकी ठरविण्यात आली आहे. त्यांपैकी, 530 सदस्य राज्यांचे प्रतिनिधी असतील, 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतील, तर 2 सदस्य राष्ट्रपतींमार्फत अँग्लो-इंडियन समाजातून नामनिर्देशित केले च जातील. मात्र, सध्या लोकसभेची (Lok Sabha) सदस्यसंख्या 545 आहे. त्यामध्ये 522 सदस्य राज्यांचे प्रतिनिधी असतात, 21 सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतात, तर 2 सदस्य अँग्लो-इंडियन समाजातून नामनिर्देशित केले जातात.
सध्या लोकसभेतील जागाची घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी पुढीलप्रमाणे आहे:
राज्ये | जागा | राज्ये | जागा |
महाराष्ट्र | 48 | छत्तिसगड | 11 |
अरुणाचल प्रदेश | 2 | झारखंड | 14 |
आसाम | 14 | तामिळनाडू | 39 |
मेघालय | 2 | हरियाणा | 14 |
मिझोरम | 1 | त्रिपूरा | 2 |
बिहार | 40 | उत्तरप्रदेश | 80 |
नागालँड | 1 | हिमाचल प्रदेश | 4 |
ओडिशा | 21 | उत्तराखंड | 5 |
पंजाब | 13 | कर्नाटक | 28 |
गोवा | 2 | पश्चिम बंगाल | 42 |
गुजराथ | 26 | केरळ | 20 |
राजस्थान | 25 | मणीपूर | 1 |
तेलंगणा | 17 | मध्यप्रदेश | 29 |
सिक्किम | 1 | आंध्रप्रदेश | 25 |
केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी पुढीलप्रमाणे आहे:
केंद्रशासित प्रदेश | जागा |
अंदमान व निकोबार बेटे | 1 |
चंदिगड | 1 |
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव | 2 |
दिल्ली | 7 |
लक्षद्विप | 1 |
पुदुचेरी | 1 |
लडाख | 1 |
जम्मू-काश्मिर | 5 |
जागांमध्ये आरक्षण: कलम 330 अन्वये,लोकसभेतील (Parliament of India: Lok Sabha) जागांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण देण्यात आले आहे.
अनुसूचित जातींना (SCs) आरक्षण: लोकसभेतील (Lok Sabha) एकूण 543 निर्वाचित जागांपैकी 84 जागा अनुसूचित जातींना (SCs) आरक्षित आहेत. या जागा 20 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. त्यांपैकी सर्वाधिक आरक्षित जागा उत्तरप्रदेशात (80 पैकी 17) आहेत. महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी 5 जागा अनुसूचित जातींना आरक्षित आहेत: अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर व सोलापूर.
अनुसूचित जमातींना (STs) आरक्षण: लोकसभेतील (Lok Sabha) एकूण 543 निर्वाचित जागांपैकी 47 जागा अनुसूचित जमातींना (STs) आरक्षित आहेत. या जागा 17 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. त्यांपैकी सर्वाधिक आरक्षित जागा मध्यप्रदेशात (29 पैकी 6) आहेत. महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी 4 जागा अनुसूचित जमातींना आरक्षित आहेतः नंदूरबार, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी व पालघर.
See Complete Information about Missiles Of India
Tenure of Lok Sabha Members: लोकसभेचा (Lok Sabha) कालावधी पाच वर्षे असतो. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्यानंतर तिच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून पुढे पाच वर्षे, असा लोकसभेचा कार्यकाल असतो. हा कार्यकाल संपल्यानंतर लोकसभा (Lok Sabha) आपोआप विसर्जित होते. (लोकसभेचा (Lok Sabha) सामान्य कालावधी 42 व्या घटनादुरूस्तीने (1976) सहा वर्षे इतका वाढविला होता, मात्र 44 व्या घटनादुरूस्तीने (1978) तो पुन्हा पाच वर्षे केला.)
लोकसभेचा (Lok Sabha) कार्यकाल पुढील परिस्थितींमध्ये कमी किंवा जास्त होऊ शकतो:
लोकसभेच्या सदस्यत्वासाठी पात्रता (Qualifications for Membership of Lok Sabha): कलम 84 अन्वये, लोकसभेचा (Lok Sabha) सदस्य म्हणून पात्र ठरण्यासाठी | (म्हणजेच निवडणुकीस पात्र होण्यासाठी) व्यक्तीच्या अंगी पुढील पात्रता असाव्याः
Disqualification for membership of Lok Sabha: लोकसभेच्या सदस्यत्वाबाबत अपात्रता पुढीलप्रमाणे:
List of Ramsar Wetland Sites in India 2023 (Updated List)
Double Membership: कोणताही व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहाचा एकाच वेळी सदस्य असणार नाही. अशा परिस्थितीत त्याची कोणती जागा रिक्त होईल याबाबतची तरतूद कायद्याने करण्याचा अधिकार संसदेस आहे. त्या तरतुदी पुढीलप्रमाणे:
Speaker of Lok Sabha: लोकसभेच्या अध्यक्षाचे पद आपल्या संसदीय (Parliament) लोकशाहीमध्ये एक महत्वपूर्ण पद आहे. असे म्हटले जाते की, लोकसभेचे (Lok Sabha) सदस्य आपापल्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असतात, मात्र लोकसभेचे अध्यक्ष पूर्ण सभागृहाच्या प्राधिकाराचे प्रतिनिधीत्व करतात.
लोकसभेच्या अध्यक्षांचा पदावधी (Tenure): लोकसभेच्या अध्यक्षांचा पदावधी लोकसभेच्या कालावधी इतकाच असतो. मात्र, लोकसभा (Lok Sabha) विसर्जित झाल्यानंतरही अध्यक्ष आपले पद रिक्त न करता, पद धारण करणे चालू ठेवतात. नवीन लोकसभेच्या (Lok Sabha) पहिल्या बैठकीच्या तात्काळ आधी ते आपले पद रिक्त करतात.
लोकसभेच्या अध्यक्षांची भूमिका, अधिकार व कार्य (Role, Powers and Functions):
अध्यक्षांची प्रशासकीय भूमिका (Administrative role): अध्यक्ष हे लोकसभेच्या (Lok Sabha) सचिवालयाचे (Secretariat) प्रमुख म्हणून कार्य करतात. सचिवालय त्यांच्या अंतिम नियंत्रण व निर्देशनाखाली कार्य करते. संसदेच्या सभागृहातील सर्व अनोळखी व्यक्ती, आगंतुक व पत्रकार हे अध्यक्षांच्या शिस्त व आदेशांच्या अधिन असतात. अध्यक्षांच्या संमतविना सभागृहात कोणतेही नवीन बांधकाम किंवा त्यात बदल करता येत नाही.
Check Complete list of Maharashtra State Symbols
उपाध्यक्षांची निवडणूक (Election): अध्यक्षाप्रमाणेच, लोकसभेचे(Lok Sabha) उपाध्यक्ष आपल्यातील एका सदस्याची निवडणूक उपाध्यक्ष म्हणून करतात. त्यांची निवडणूक अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर होते. निवडणुकीची तारीख अध्यक्षांमार्फत ठरविली जाते.
उपाध्यक्षांचा पदावधी (Tenure): अध्यक्षांप्रमाणेच, उपाध्यक्ष सुद्धा लोकसभेच्या (Lok Sabha) कालावधी दरम्यान आपले पद धारण करतात. मात्र, पुढील तीन परिस्थितींमध्ये पदावधी संपण्याच्या आतच त्यांचे पद रिक्त होते.
उपाध्यक्षांचे कार्ये व अधिकार (Functions and Powers): उपाध्यक्षांचे कार्ये व अधिकार पुढीलप्रमाणे:
Lok Sabha Vs Rajya Sabha:
Also See:
Q.1 लोकसभेत महाराष्ट्राच्या किती जागा आहेत ?
Ans: लोकसभेत महाराष्ट्राच्या 48 जागा आहेत.
Q.2 लोकसभेच्या रचनेची तरतूद कितव्या कलमात आहे?
Ans. लोकसभेच्या रचनेची तरतूद कलम 81 मध्ये आहे.
Q.3 लोकसभेतील जागेसाठी वयाची अट किती आहे ?
Ans: लोकसभेतील जागेसाठी वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली असावी.
Q.4 भारताची संसद: लोकसभा याची माहिती कुठे मिळेल?
Ans. भारताची संसद: लोकसभा याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.
लेखाचे नाव | लिंक |
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग | |
कार्य आणि उर्जा | |
गांधी युग | |
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
चक्रवाढ व्याज (Compound Interest) | |
भारताचे नागरिकत्व | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय संविधानाची उद्देशिका | |
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे हवामान | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
सिंधू संस्कृती | |
जगातील 07 खंड | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न | |
भारतातील कृषी अर्थव्यवस्था | |
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गती व गतीचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
आम्ल व आम्लारी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वात लांब पूल 2023 | |
रोग व रोगांचे प्रकार | |
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ | |
महाराष्ट्रातील लोकजीवन | |
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती | |
वनस्पतीची रचना आणि कार्ये | |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स | |
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग | |
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग | |
पृथ्वीवरील महासागर | |
महाराष्ट्राचे हवामान | |
भारताची क्षेपणास्त्रे | |
महाराष्ट्रातील शहरांची यादी | |
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) | |
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या | |
ढग व ढगांचे प्रकार | |
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी | |
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये | |
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य | |
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण |
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Maharashtra has 48 seats in the Lok Sabha.
Article 81 provides for the composition of the Lok Sabha.
25 years of age should be completed for a seat in Lok Sabha.
Parliament of India: Loksabha can be found on Adda247 Marathi app and website.
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 29 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Question of the Day (Reasoning) Q. If ‘P’ denotes ‘–‘, ‘Q’ denotes ‘÷’, ‘R’ denotes ‘×’ and ‘W’ denotes ‘+’…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…
Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…
ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…