Marathi govt jobs   »   Job Notification   »   Last Minute Revision and Tips for...

MAHATET 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे | Last Minute Revision and Tips for MAHATET Exam 2021

Last Minute Revision and Tips for MAHATET Exam 2021: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 ची परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे.  दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 चे प्रवेशपत्र (Admit Card) जारी झाले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक खाली देण्यात आली आहे. परीक्षेच्या अगोदरचे काही दिवस फार महत्वाचे असतात. या दिवसात आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी होणे फार आवशक आहे. कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे (Last Minute Revision & Tips) तपासणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरुन तुमची परीक्षा सुरळीत होईल. आज आपण या लेखात Last Minute Revision and Tips for MAHATET Exam 2021 पाहणार आहोत.

Last Minute Revision and Tips for MahaTET Exam 2021 | MahaTET 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Last Minute Revision and Tips for MahaTET Exam 2021: MAHATET 2021 परीक्षा काही दिवसांवर आहे. जसजसा वेळ जवळ येत आहे तसतशी सर्वच परीक्षर्थ्यांमध्ये थोडी  चिंता (Tension) आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे अलीकडेच सरकारनी जाहीर केलीली MAHATAIT 2022 परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कारण ही परीक्षा देण्यासाठी MAHATET किवा CTET परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. सोबतच परीक्षेच्या काही दिवस अगोदर थोडा गोंधळ होतो जसे की, अजून काय वाचायचे आहे? महत्त्वाचे विषय कोणते? मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेत कोणत्या घटकावर भर देण्यात आला होता? कोणत्या विषयात मला सहज गुण मिळवता येतील? मी माझे प्रवेशपत्र डाउनलोड केले आहे का? हे सर्व विचार तुमच्या मनात घोळत असतील. परीक्षेपूर्वी या गोंधळाच्या स्थितीतून मुक्त होण्यासाठी आज आम्ही तुम्हच्यासाठी Last Minute Revision and Tips for MAHATET Exam 2021 हा लेख आणला आहे. ज्याचा आपणास नक्की फायदा होईल.

MAHATET अभ्यासक्रम 2021: अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना

MahaTET -2021 Exam Pattern | MahaTET -2021 परीक्षेचे स्वरूप

MahaTET -2021 Exam Pattern: MAHATET परीक्षा दोन पेपर्समध्ये घेण्यात येते म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.

  • प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. 6 वी ते इ. 8 वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

पेपर 1

अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप
1 बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 30 30 बहुपर्यायी
2 भाषा-1 30 30 बहुपर्यायी
3 भाषा-2 30 30 बहुपर्यायी
4 गणित 30 30 बहुपर्यायी
5 परिसर अभ्यास 30 30 बहुपर्यायी
एकूण 150 150

पेपर 2

अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप
1 बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 30 30 बहुपर्यायी
2 भाषा-1 30 30 बहुपर्यायी
3 भाषा-2 30 30 बहुपर्यायी
4 अ) गणित व विज्ञान
किंवा
ब) सामाजिक शास्त्रे
60 60 बहुपर्यायी
एकूण 150 150

How to Download MahaTET 2021 Admit Card? | MahaTET 2021 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

How to Download MahaTET 2021 Admit Card?: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याची माहिती खाली स्टेप नुसार देण्यात आली आहे.

  1. सर्वात पहिले महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 च्या अधिकृत वेबसाईट  ला भेट द्यावी किंवा खाली दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा. 
  2.  त्या नंतर फॉर्म भरतांना तुम्हाला Login Id व  Password मिळाला आहे तो व Captcha टाका 
  3. नंतर ‘Login’ वर Click करा. 
  4. आता नवे पेज उघडेल तेथे वरच्या बाजूला Admit Card for Paper 1 व Admit Card for Paper 2 असा Option दिसेल त्यावर क्लीक करा आणि Admit Card डाऊनलोड करून घ्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Last minute tips for MahaTET 2021 Exam | MahaTET 2021 परीक्षेच्या शेवटच्या क्षणीच्या टिप्स

Last minute tips for MAHATET 2021 Exam: MAHATET 2021 परीक्षेच्या दृष्टीने Last minute tips खाली देण्यात येत आहे.

मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करा आणि भूतकाळातून शिका: कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. विचारलेल्या प्रश्नाचा प्रकार आणि प्रत्येक प्रकारच्या प्रश्नासाठी लागणारा वेळ तुम्हाला आधीच कळला आहे. जेणेकरून यावेळी तुम्ही तुमचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकाल.

MAHATET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

शहाणे व्हा आणि सुधारणा करा: तुमच्या आजूबाजूला नवीन माहिती मिळत असेल. तुमची तयारी सुलभ करण्यासाठी काही जण नवीन ट्रिक्स सांगून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे स्वागतच करा पण शेवटच्या काही दिवसात ती ट्रिक आत्ता उपयोगी ठरेल का याचा सुद्धा विचार करा. कारण कोणतीही ट्रिक वापरण्यासाठी चांगल्या सरावाची गरज असते. त्यामुळे याचा सुद्धा विचार करणे गरजेचे ठरते

आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे: तुमच्या ज्ञानाचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी तुम्ही दररोज किमान 8 तास झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परीक्षेच्या अगोदर दिवसभर व रात्रभर जागून वाचन टाळा. कारण परीक्षेदरम्यान एकाग्र करण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होतो. तुम्ही दररोज 15 मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न देखील करू शकता कारण त्यामुळे शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहते. हे तुमचा मेंदू रीसेट करते, मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि सुयोग्य विचार आणि धारणा यासाठी तुम्हाला तयार करते.

शांत राहा आणि परीक्षा द्या: शेवटी, तुमचा आत्मविश्वास चांगला आणि परीक्षेचा ताण घेऊ नका. तुम्हाला वाचवणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुमची पुनरावृत्ती आणि अचूकता. स्मार्ट धोरण आखा. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा त्यांना दिलेल्या वेळेत उत्तर द्या. चांगले खा आणि रात्रीचे उल्लू बनू नका. विश्रांती घ्या आणि पुरेशी झोप घ्या, विशेषतः आगामी दिवसांमध्ये.

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : आरोग्य विभाग भरती 2021 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

  1. लांब पल्ल्यावरून प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्ये परिक्षा केंद्रामध्ये पोहोचणे शक्य होईल.
  2. उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
  3. उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे,
  4. फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. (पॅन कार्ड, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक)
  5. आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा, फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.
  6. यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्यास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
  7. प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे.
  8. परिक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या 30 मिनिट अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल. उशीरा उपस्थित झाल्यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतील उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Last Minute Revision for MahaTET Exam | MahaTET परीक्षेसाठी उजळणीसाठी अभ्यास साहित्य

Last Minute Revision for MahaTET Exam: MAHATET परीक्षेच्या तयारीसाठी Adda 247 मराठी ने असेच आवश्यक लेख आणले असून त्या सर्व लेखाच्या लिंक खालील तक्त्यात दिलेल्या आहे. त्याचा आपणास नक्की फायदा होईल.

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
English Grammar for Competitive Exams: Part 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
English Grammar for Competitive Exams: Part 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
English Grammar for Competitive Exams: Part 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्पर्धा परीक्षांसाठी क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड फॉर्मुलास वाचण्यासाठी येथे क्लिक करा
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला वाचण्यासाठी येथे क्लिक करा
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास- जन्म, स्वराज्याची स्थापना आणि इतर तथ्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा
छत्रपती शिवाजी महाराज- लढाया, स्वराज्य विस्तार, राज्याभिषेक, कारभार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Best of Luck for Exam !!!

FAQs Last Minute Revision and Tips for MAHATET Exam 2021

Q1. MAHATET 2021ची परीक्षा कधी आहे?

Ans. MAHATET 2021 परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्हात आहे.

Q2. MAHATET 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे का?

Ans. MAHATET2021 परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे.

Q3. MAHATET 2021 परीक्षेचा कालावधी किती आहे?

Ans. MAHATET 2021 परीक्षेचा कालावधी 2.30 तास आहे.

Q4. MAHATET 2021 परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?

Ans. MAHATET 2021 परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र  न्यावे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MAHA-TET |"द्रोणाचार्य"- मिशन शिक्षक भरती
MAHA-TET |”द्रोणाचार्य”- मिशन शिक्षक भरती

Sharing is caring!

FAQs

When is the MAHATET 2021 exam?

MAHATET 2021 exam is on 21st November 2021 in various districts of Maharashtra.

Have you got the admission card for MAHATET 2021 exam?

The admission card for the MAHATET2021 exam has arrived.

What is the duration of MAHATET 2021 exam?

The duration of the MAHATET 2021 exam is 2.30 hours.

What kind of identity card do you have to take while going for MAHATET 2021 exam?

Bring Aadhar card, voting card or any other government issued identity card while going for MAHATET 2021 exam.