Important Newspapers in Maharashtra: In this article candidate can find List of Important Newspapers in Maharashtra. Along with that you can see Year of establishment, Place and Founder of this Newspapers in Maharashtra.
Important Newspapers in Maharashtra | |
Category | Study Material |
Exam | MPSC Group B and Group C Exam |
Subject | History |
Name | Important Newspapers in Maharashtra |
Important Newspapers in Maharashtra
Important Newspapers in Maharashtra: महाराष्ट्रात MPSC मार्फत MPSC Group B पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 ला होणार आहे सोबतच, MPSC Group C पूर्व परीक्षा 03 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. या दोन्ही परीक्षेत सामान्य विज्ञान विषय खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे (Newspapers in Maharashtra) यावरप्रश्न आले आहेत. त्यामुळे आजच्या लेखात आपण महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे: स्थापना वर्ष, स्थळ आणि संस्थापक (Important Newspapers in Maharashtra: Year of establishment, place and founder) याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.
Important Newspapers in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे: स्थापना वर्ष, स्थळ आणि संस्थापक
वृत्तपत्रांनी (Newspapers) महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या जडणघडणीत आणि राष्ट्रीय चळवळीत खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रात वृत्तपत्रांची (Newspapers) सुरुवात 1780 च्या दशकात झाली आणि आधुनिक शिक्षणाच्या प्रसारानंतर मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रे (Newspapers) निघू लागली. वृत्तपत्रांच्या (Newspapers) विकासामुळे खालील फायदे महाराष्ट्राला झाले.
- आधुनिक शिक्षण, आधुनिक विचार, आधुनिक चालीरीती यांची ओळख सामान्य लोकांना झाली.
- वृत्तपत्रांतील (Newspapers) टीकेमुळे सामान्य लोकांना इंग्रजी राजवटीचे खरे रूप लक्षात आले.
- ब्रिटीशांकडे भारतीयांच्या मागण्या मांडण्यासाठी वृत्तपत्रे हक्काचे व्यासपीठ होते.
- समाज प्रबोधनाचे आणि सुधारणेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणून वृत्तपत्रे महत्त्वाची ठरतात.
- राष्ट्रभावना आणि देशप्रेम वाढविण्यास वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका निभाविली.
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली
Most Important Newspapers in Maharashtra | महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची वृत्तपत्रे (संक्षिप्त रुपात)
Most Important Newspapers in Maharashtra: महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची वृत्तपत्रे (Newspapers), त्यांचे स्थापना वर्ष (Establish Year), स्थळ (Place) आणि संस्थापक (Founder) खालील दिलेल्या तक्त्यात तुम्ही पाही शकता.
अनु.क्र. |
वृत्तपत्राचे नाव (Newspaper) | स्थापना वर्ष (Establish Year) | स्थळ (Place) | संस्थापक (Founder) |
01 | बॉम्बे हेराल्ड | 1789 | मुंबई |
मॅक्लीन |
02 |
बॉम्बे गॅझेट | 1790 | – | मॅक्लीन |
03 | बॉम्बे समाचार | 1822 | मुंबई |
फर्दून मर्जबान |
04 |
दर्पण | 1832 | मुंबई | बाळशास्त्री जांभेकर |
05 | ज्ञानसिंधु | 1842 | मुंबई |
वीरेश्वर छत्रे |
06 |
ज्ञानोदय | 1842 | अहमदनगर | हेन्री बॅलेन्टाईन |
7 |
प्रभाकर | 1841 | – | गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन (कुंटे) |
8 | मित्रोदय | 1844 | पुणे |
वीरेश्वर आणि तात्या छत्रे |
9 |
ज्ञानप्रकाश | 1849 | पुणे | कृष्णाजी रानडे |
10 | रास्त गोफ्तर | 1851 | मुंबई |
दादाभाई नौरोजी |
11 |
शुभसूचक | 1859 | सातारा | रामचंद्र अप्पाजी |
12 | अरुणोदय | 1862 | ठाणे |
काशिनाथ फडके |
13 |
खानदेश वैभव | 1867 | धुळे | बळवंत करंदीकर |
14 | दीनबंधू | 1877 | पुणे |
कृष्णराव भालेकर |
15 |
केसरी | 1881 | पुणे | गोपाळ आगरकर |
16 | मराठा | 1881 | पुणे |
लोकमान्य टिळक |
17 | सत्सार | 1885 | पुणे |
महात्मा ज्योतिबा फुले |
18 |
दीनमित्र | 1888 | पुणे | मुकुंदराव पाटील |
19 | काळ | 1806 | – |
शिवराम परांजपे |
20 |
सत्योदय | 1915 | विदर्भ | कृष्णाजी चौधरी |
21 |
जागरूक | 1917 | पुणे | वालचंद कोठारी |
22 |
डेक्कन रयत | 1918 | पुणे | अण्णासाहेब लठ्ठे व वालचंद कोठारी |
23 | मूकनायक | 1920 | मुंबई |
डॉ.बाबासाहेब आंबेडकर |
24 |
ब्राह्मणेतर | 1926 | वर्धा | व्यंकटराव गोडे |
25 | सत्यवादी | 1926 | सातारा |
बाळासाहेब पाटील |
26 |
लोकहितवादी | 1927 | पुणे | केशव ठाकरे |
27 | क्रांती | 1927 | मुंबई |
जोगळेकर, मिरजकर |
28 | कैवारी | 1928 | – |
दिनकरराव जवळकर |
29 |
सकाळ | 1932 | पुणे | नानासाहेब परुळेकर |
30 | दैनिक लोकशक्ती | 1935 | पुणे |
जावडेकर |
Important Passes in Maharashtra
Additional information about important newspapers in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वृत्तपत्रांविषयी अतिरिक्त माहिती
Additional information about important newspapers in Maharashtra: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वृत्तपत्रांविषयी (newspapers) अतिरिक्त माहिती खाली दिली आहे.
1) मुंबई समाचार
स्थापना – 1822 (मुंबई)
- समाचार प्रेस चे मालक फर्दुनजी मर्झबान यांनी सुरु केले.
- गुजराती भाषेतील पहिले वृत्तपत्र
- मुंबई प्रांतातील भारतीय भाषेतील पहिले वृत्तपत्र
- 1855 ला दैनिक झाले आधी साप्ताहिक होते.
2) दर्पण
स्थापना – 6 जानेवारी 1832 (मुंबई)
- संस्थापक – बाळशास्त्री जांभेकर
- मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र
- साप्ताहिक होते (दर शुक्रवारी)
- मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये निघत असत
- 6 जानेवारी – बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन – पत्रकार दिन म्हणून पाळला जातो.

3) प्रभाकर
स्थापना – 1841
- संस्थापक – गोविंद कुंटे / भाऊ महाजन
- गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात सुरुवात
- लोकहितवादी यांनी शतपत्रे या वृत्तपत्रात लिहिली
- प्रथमतः इंग्रजी राज्यपद्धतीवर टीका केली
- इतर वृत्तपत्रातील मजकूर भाषांतरित करून छापला जाई.
4) ज्ञानोदय
स्थापना – 1842 (अहमदनगर)
- संस्थापक – अमेरिकन मिशनरी (हेन्री बॅलेन्टाईन)
- मराठी वर्तमान पत्रात पहिल्यांदा चित्रे काढली
- आशियाचा व युरोपचा नकाशा दिला
- रेल्वेची सुरुवात झाली तेव्हा ‘चाक्या म्हसोबा’ या नावाचा लेख लिहिला
5) नेटिव्ह ओपिनियन
स्थापना – 1854
- संस्थापक – विश्वनाथ मंडलिक
- सुरुवातीला फक्त इंग्रजीत होते आणि नंतर मराठीत सुरु झाले
- नारायण महादेव हे देखील महत्त्वाचे व्यक्ती होते
- हायकोर्टाचे निकाल देण्याची पद्धत सुरु केली
6) इंदुप्रकाश
स्थापना – 1862 (मुंबई)
- संस्थापक – विष्णू पंडित
- इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांत
- प्रामुख्याने विधवा विवाह पुरस्काराचे लेखन व स्त्रियांच्या प्रश्नांवर लेखन
- नारायण चंदावरकर यात पॉलिटिकल ऋषि या नावाने लेखन करीत
- या वृत्तपत्रात अरविंद घोष यांची न्यू लॅम्प फॉर ओल्ड ही लेखमाला प्रकाशित झाली
7) अरुणोदय
स्थापना – 1866 (ठाणे)
- संस्थापक – काशिनाथ फडके
- परकीय सत्तेच्या उच्चाटनासाठी मार्गदर्शन
- बातमीदार नेमण्याची प्रथा सुरु केली
8) केसरी व मराठा
स्थापना – 1881 (पुणे)
- संस्थापक– टिळक व आगरकर
- या दोन्ही वृत्तपत्रात टिळक व आगरकर यांचा मोठा सहभाग होता.
- मराठा हे दैनिक 2 जानेवारी 1881 मधे सुरू झाले.
- केसरी काही काळ साप्ताहिक स्वरूपाचे होते.
- टिळकांच्या निधनानंतर केसरी व मराठा ची जबाबदारी न. चि. केळकर यांच्याकडे आली.
9) मराठा दीनबंधू
स्थापना – 1900 (पुणे)
- संस्थापक – भास्करराव जाधव
- पहिल्या पानावर – विद्येत मागासलेल्या सर्व लोकांसाठी’ असे लिहिले जाई
- शिवराम जनाबा कांबळे यात लेखन करी.
Checklist For MPSC Combine Prelims Exam 2022
10) बॉम्बे क्रोनिकल
स्थापना – 1910 (मुंबई)
- संस्थापक- फिरोजशाह मेहता
- यावेळी त्यांना जे. बी. पेटीट यांची मदत झाली. 1913 ते 1919 पर्यंत बी. जी हर्निमन हे बॉम्बे क्रोनिकल चे संपादक होते.
- या हर्निमान यांनी रोलेट ॲक्ट चे नामकरण ब्लॅक बिल असे केले होते. या वृत्तपत्रात सय्यद अब्दुल्हा बरेलवी यांनी देखील लिखाण केले होते. 1924 ते 1948 या काळात ते संपादक होते.
11) विजयी मराठा
स्थापना – डिसेंबर, 1919 (पुणे)
- संस्थापक- श्रीपतराव शिंदे
- मराठा व विद्येत मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक व शिक्षणादी विषयांवर लेख त्यात प्रसिद्ध होत.
- शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे विजयी मराठाचे ब्रीद होते. विजयी मराठा हे ब्राह्मणेतर पक्षाचे मुखपत्र मानले जात असे. तसेच बहुजन समाजाचा केसरी म्हणून देखील तो ओळखला जात असे.
- यात दिनकरराव जवळकर भवानी तलवार’ या टोपण नावाने ‘तलवारीचे वार’ हे सदर लिहीत.
12) तरुण मराठा
स्थापना – 1920 (कोल्हापूर)
- संस्थापक- सखाराम पांडुरंग सावंत
- सखाराम पांडुरंग सावंत यांनी शाहू महाराजांच्या प्रेरणेने हे नियतकालिक कोल्हापूरवरून सुरू केले. नंतर शाहू महाराजांनी दिनकरराव जवळकर यांना कोल्हापूरला बोलावून त्यांच्या स्वाधीन केले
13) राष्ट्रवीर
स्थापना – 1921 (बेळगाव) – 2021 ला 100 वर्ष पूर्ण
- संस्थापक – भुजंगराव दळवी, भोसले इत्यादी
- शिवाजी प्रिंटींग प्रेस च्या सहाय्याने
- शाहू महाराजांची प्रेरणा होती
- सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी उपयोग
14) हंटर
स्थापना – मे 1925 (कोल्हापूर)
- संस्थापक– हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण
- सुरुवातीच्या 13 अंकांनंतर दत्तात्रय सखाराम जाधव व खांडेराव गोपाळराव बागल यांनी संपादनाची जबाबदारी सांभाळली.
- हंटरच्या मुखपृष्ठावर ‘फणसा अंगी काटे । आत अमृताचे साठे । नारळ वरुता कठीण । परी अंतरी जीवन ।’ हा शेख महमदाचा प्रसिद्ध अभंग छापला जात असे.
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये
15) ब्राह्मणेतर
स्थापना – 1926 (वर्धा)
- संस्थापक – व्यंकटराव गोडे
- मज म्हणती ब्राह्मणेतर | ध्येय माझे देशोद्धार | घेई दीनांचा कैवार | हेच ठरले ब्रीद सार – या ओळी पहिल्या पानावर होत्या
- ब्राह्मणेतर पक्षाचे मुखपत्र होते
तुम्हाला हेही बघायला आवडेल:
Chief Minister Role and Function
MPSC Group B Combined Subject and Topic wise Weightage
Social Reformers of Maharashtra- Part 1
MPSC Social Reformers of Maharashtra – Part 2
Parliament of India: Lok Sabha
Parliament of India: Rajya Sabha
Important Events of Indian Freedom Struggle
FAQS: Important Newspapers in Maharashtra
Q.1 मराठा दीनबंधू या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?
Ans: मराठा दीनबंधू या वृत्तपत्राचे संस्थापक भास्करराव जाधव आहेत.
Q.2 इतिहास या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?
Ans. इतिहास या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.
Q.3 काळ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?
Ans: काळ या वृत्तपत्राचे संस्थापक शिवराम परांजपे आहेत
Q.4 महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे याची माहिती कुठे मिळेल?
Ans. महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
