मूलभूत कर्तव्ये: कलम 51A – तलाठी आणि इतर सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

मूलभूत कर्तव्ये: कलम 51A

कोणत्याही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी योग्य अभ्यासाचे नियोजन असेलच पाहिजे आणि अभ्यासक्रमाप्रमाणे सर्व विषय कव्हर झाले पाहिजे. Adda247 मराठी, सर्व उमेदवारांसाठी उत्तम नियोजनासोबत विविध विषयातील अभ्यासक्रमातील विविध टॉपिकसवर लेख आणत असते. ज्याणेंकरून या लेखांमार्फत उमेदवारांना चांगला अभ्यास करता यावा. तर चला आजच्या या लेखात आपण राज्यशास्त्र या विषयावरील मूलभूत कर्तव्ये: कलम 51A यावर चर्चा करणार आहोत.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय भारतीय राज्यघटना
लेखाचे नाव मूलभूत कर्तव्ये: कलम 51A

मूलभूत कर्तव्ये: कलम 51A

समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदाऱ्या पार पाडणेही अपेक्षित असते. लोकशाहीत लोकांनी केवळ हक्कांचीच मागणी करू नये, तर कर्तव्यांप्रती त्यांनी दक्ष असावे लागते. भारताच्या मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. पुढे 1976 मध्ये 42व्या घटनादुरूस्तीने घटनेत 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. 2002 मध्ये 86व्या घटनादुरूस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले.

भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे कलम

मूलभूत कर्तव्ये कलम 51A: प्रस्तावना

भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत. मात्र, युएसए, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रमुख देशांच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्ये आढळून येत नाही. केवळ जपानच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्ये आढळून येतात. याउलट समाजवादी देशांनी नागरिकांच्या मूलभूत हक्क व कर्तव्यांना सारखेच महत्व प्रदान केले आहे.

मूलभूत कर्तव्ये कलम 51A: घटनादुरूस्ती

आणिबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976 मध्ये मूलभूत कर्तव्यांबाबत सरदार स्वर्ण सिंह समिती स्थापन केली. या समितीने मूलभूत कर्तव्यांचे(Fundamental Duties of India) एक स्वतंत्र प्रकरण घटनेत समाविष्ट करण्याची शिफारस केली. सरकारने ही शिफारस स्विकारून 42व्या घटनादुरूस्ती(1976) अन्वये घटनेत भाग IV A समाविष्ट करण्यात आला. या नवीन भागात कलम 51A हे केवळ एकच कलम टाकण्यात आले. या कलमात 10 मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आली.

10 मूलभूत कर्तव्यांपैकी केवळ आठच कर्तव्यांची शिफारस स्वर्ण सिंह समितीने केली होती. तसेच, समितीने शिफारस केलेल्या इतर काही कर्तव्यांचा समावेश घटनेत करण्यात आला नाही.

11 वे मूलभूत कर्तव्य 86 व्या घटनादुरूस्ती, 2002 ने समाविष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील धरणे

मूलभूत कर्तव्यांची यादी

कलम 51A मध्ये दिल्याप्रमाणे नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत:

  1. घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
  2. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली. त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे.
  3. भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.
  4. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
  5. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.
  6. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे.
  7. वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त सुधारणा करणे, आणि प्राणिमात्रांबद्दल दया-बुद्धी बाळगणे.
  8. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.
  9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.
  10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी (en-devour and achievements) यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे.
  11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास, त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. (हे मूलभूत कर्तव्य 86 व्या घटनादुरूस्ती, 2002 ने समाविष्ट केले.)

रत्क्ताभिसरण संस्था

Adda247 Marathi App

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे कि तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, वन विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव लिंक
भारतीय संविधानाची उद्देशिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील कृषी अर्थव्यवस्था पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कार्य आणि उर्जा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 पाहण्यााठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रोग व रोगांचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील लोकजीवन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वनस्पतीची रचना आणि कार्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त पाहण्यासाठी येथे क्लिक करा
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पृथ्वीवरील महासागर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारताची क्षेपणास्त्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील शहरांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ढग व ढगांचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण पाहण्यासाठी येथे क्लिक करा
.Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

महाराष्ट्र टेस्ट मेट

FAQs

मूलभूत कर्तव्ये यासाठी कोणते कलम वापरले जाते ?

कलम 51A  हे मूलभूत कर्तव्येसाठी (Fundamental Duties) कलम वापरले जाते.

मूलभूत कर्तव्ये याची माहिती कुठे मिळेल?

मूलभूत कर्तव्ये याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल

राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

मूलभूत कर्तव्य किती आहे?

भारताच्या राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आली.

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 27 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

8 hours ago

Top 05 Current Affairs of Maharashtra MCQs for MPSC, Police Constable, ZP, MIDC | Eng + Mar

For candidates preparing for the MPSC, Police Constable, ZP, MIDC exams, mastering the Current Affairs of Maharashtra is essential. This…

10 hours ago

टॉप 20 अंकगणित MCQ | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | डाउनलोड फ्री PDF

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

11 hours ago

World Day for Safety and Health at Work 2024 | कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस 2024

कामावरील सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस ही सर्व कामगारांसाठी सुरक्षित आणि निरोगी कामाच्या परिस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी 28 एप्रिल रोजी पाळली…

11 hours ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. Which among the following functions is not done by the Indian President? (a) Appointment…

12 hours ago

Top 20 Arithmetic MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Arithmetic…

12 hours ago