Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
130 वा ड्युरँड चषक कोलकाता येथे होणार
आशियातील सर्वात जुनी आणि जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा,ड्युरँड चषक एका वर्षाच्या अंतरानंतर पुन्हा भरविण्यात येणार आहे. ड्युरँड चषकाची 130वी आवृत्ती कोलकाता येथे 05 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर 2021 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. कोव्हीड-19 च्या साथीमुळे, गेल्या हंगामात ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. ही प्रतिष्ठित स्पर्धा प्रथम 1888 मध्ये डागशाई (हिमाचल प्रदेश) येथे आयोजित करण्यात आली होती आणि तिचे नाव भारताचे तत्कालीन परराष्ट्र सचिव मॉर्टिमर ड्युरँड यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. सुरुवातीला केवळ ब्रिटीश सैनिकांमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्ती राखण्याचा उद्देशाने ही स्पर्धा भरविण्यात यायची नंतर मात्र ती नागरिकांसाठी खुली करण्यात आली. सध्या ही जगातील अग्रगण्य क्रीडा स्पर्धांपैकी एक मानली जाते. मोहन बागान आणि ईस्ट बंगाल हे ड्युरँड चषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत ज्यांनी प्रत्येकी सोळा वेळा स्पर्धा जिंकली आहे. विजेत्या संघाला तीन करंडक म्हणजेच राष्ट्रपती चषक (प्रथम डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सादर केलेले), ड्युरँड चषक (मूळ बक्षीस – एक फिरता चषक) आणि शिमला करंडक (प्रथम 1903 मध्ये शिमलाच्या नागरिकांनी सादर केले आणि 1965 नंतर एक फिरता चषक) प्रदान केले जाते.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 02 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Question of the Day (Geography) Q. Pagladia Dam Project is located in which state? (a) Arunachal Pradesh (b) Sikkim (c)…
भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: कोणत्याही देशाचे वित्त हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा…
पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…