Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Durand Cup to be held at...

130th Durand Cup to be held at Kolkata | 130 वा ड्युरँड चषक कोलकाता येथे होणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

130 वा ड्युरँड चषक कोलकाता येथे होणार

आशियातील सर्वात जुनी आणि जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा,ड्युरँड चषक एका वर्षाच्या अंतरानंतर पुन्हा भरविण्यात येणार आहे. ड्युरँड चषकाची 130वी आवृत्ती कोलकाता येथे 05 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर 2021 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. कोव्हीड-19 च्या साथीमुळे, गेल्या हंगामात ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. ही प्रतिष्ठित स्पर्धा प्रथम 1888 मध्ये डागशाई (हिमाचल प्रदेश) येथे आयोजित करण्यात आली होती आणि तिचे नाव भारताचे तत्कालीन परराष्ट्र सचिव मॉर्टिमर ड्युरँड यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. सुरुवातीला केवळ ब्रिटीश सैनिकांमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्ती  राखण्याचा उद्देशाने ही स्पर्धा भरविण्यात यायची नंतर मात्र ती नागरिकांसाठी खुली करण्यात आली. सध्या ही जगातील अग्रगण्य क्रीडा स्पर्धांपैकी एक मानली जाते. मोहन बागान आणि ईस्ट बंगाल हे ड्युरँड चषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत ज्यांनी प्रत्येकी सोळा वेळा स्पर्धा जिंकली आहे. विजेत्या संघाला तीन करंडक म्हणजेच राष्ट्रपती चषक (प्रथम डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सादर केलेले), ड्युरँड चषक (मूळ बक्षीस – एक फिरता चषक) आणि शिमला करंडक (प्रथम 1903 मध्ये शिमलाच्या नागरिकांनी सादर केले आणि 1965 नंतर एक फिरता चषक) प्रदान केले जाते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!