World Population Day celebrated on 11th July | 11 जुलै: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस
11 जुलै: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. वाढत्या लोकसंख्येच्या परिणामाबद्दल आणि जनतेत लिंग समानता, कुटुंब नियोजनाचे महत्त्व, दारिद्र्य, माता आरोग्य, मानवी हक्क इत्यादी विषयांबद्दल जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
2021 ची संकल्पना: “कोव्हीड-19 महामारीचा प्रजनन क्षमतेवर होणारा परिणाम”
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवसाची पार्श्वभूमी:
1989 साली संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या कार्यकारी मंडळाने 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्जाच्या वर गेल्याच्या स्मरणार्थ 11 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस म्हणून आयोजित करण्याचे ठरवले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने डिसेंबर 1990 मध्ये ठराव क्रमांक 45/216 पारित करून या दिनाची औपचारिक सुरुवात केली. 11 जुलै 1990 रोजी हा दिवस 90 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रथम आयोजित करण्यात आला.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी मुख्यालय: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या कार्यकारी संचालिका: नतालिया कनेम