Marathi govt jobs   »   Study Materials   »   Revolt of 1857 in India and...

Revolt of 1857 in India and Maharashtra, Study Material for MPSC Combine Exam | भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव

Revolt of 1857 in India and Maharashtra: In this article we will study about different reasons for the revolt of 1857, Leaders and Places of revolts, and Revolt of 1857 in Maharashtra. This information is very useful for competitive exams. So lets start.

Revolt of 1857 in India and Maharashtra
Article Name Revolt of 1857 in India and Maharashtra
Useful for MPSC Group B, Grp C and other Competitive Exams
Category Study Material

Revolt of 1857 in India and Maharashtra | भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव

Revolt of 1857 in India and Maharashtra: गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 रोजी होणार असून गट क संयुक्त पूर्व परीक्षा 3 एप्रिल 2022 आयोजित आहे त्यामुळे या आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम अभ्यास साहित्य मिळावे यासाठी Adda247 मराठीची content टीम दररोज स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाच्या विषयवार लेख आणत असते. ज्याणेकरून विद्यार्थ्यांना योग्य अभ्यास साहित्य कमी वेळात आणि चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावे. तर चला आजच्या या लेखात आपण अभ्यास करूयात Revolt of 1857 in India and Maharashtra (भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव), जाणून घेऊयात या उठावाची राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, लष्करी, आणि तात्कालिक कारणे कोणती होती. त्याचप्रमाणे उठावाचे ठिकाण, उठावाचे नेतृत्व आणि महाराष्ट्रातील 1857 चा उठवाबद्दल सर्व महत्वाची माहिती.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र जाहीर

Revolt of 1857 in India and Maharashtra | भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव 

Indian Rebellion of 1857 and Maharashtra: MPSC घेत असलेले सर्व परीक्षांचे जुने पेपर पाहता इतिहास या विषयात महाराष्ट्रातील 1857 चा उठाव यावर बरेच प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या MPSC च्या सर्व पूर्व परीक्षेत भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव आणि महाराष्ट्र याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

MPSC Group B Vacancy Increased 2022

Reasons for the Revolt of 1857 |  1857 च्या  उठावाची कारणे 

Reasons for the Revolt of 1857: इ.स. 1857 पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे संपूर्ण भारतावर राजकीय वर्चस्व निर्माण झाले होते. कंपनीच्या अधिकारी व नोकरांनी भारताचे अधिकाधिक आर्थिक व राजकीय शोषण सुरू केले. त्यांनी भारतीयांच्या सामाजिक प्रकरणातही हस्तक्षेप सुरू केला. त्यामुळे भारतीय लोकामध्ये कंपनी सरकारविरुद्ध असंतोष निर्माण झाला. परिणामी भारतीय लोकांनी इ.स. 1857 साली इंग्रज कंपनीच्या विरोधात सशस्त्र उठाव केला. इंग्रजांच्या राजकीय गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी भारतीय लोकांनी केलेला हा सशस्त्र उठाव म्हणजे “भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्राम’ ठरतो. 1857 च्या सशस्त्र उठावाला सर जॉन सीले, सर जॉन लॉरेन्स, स्मिथ, पी. ई. रॉबर्टस या इंग्रज इतिहासकारांनी एक सैनिकी विद्रोह मानले, इतिहासकार न. र. फाटक यांस ‘शिपायांची भाऊगर्दी’ म्हणून संबोधतात तर पट्टाभिसीतारामैया व वि. दा. सावरकर यांनी भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्राम असे मानले आहे.

भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव | Revolt of 1857 in India and Maharashtra
भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव | Revolt of 1857 in India and Maharashtra

1857 च्या  उठावाची कारणे थोडक्यात आपण पाहुयात :

  1. राजकीय कारणे:
  • इंग्रजांचे विस्तारवादी धोरण
  • तैनाती फौजेची पद्धत.
  • संस्थानांचे विलीनीकरण.
  • वेतन व इनामदारीचा -हास.
  • पदव्या व पेन्शनीचे उच्चाटन
  • राज्यकारभाराची इंग्रजी भाषा.
  1. आर्थिक कारणे:
  • डोईजड कर आकारणी
  • व्यापार व उद्योगांचा न्हास.
  • शेतकऱ्यांचे हाल कायमधारा, रयतवारीमुळे
  • आर्थिक शोषण

Checklist For MPSC Combine Prelims Exam 2022

  1. सामाजिक कारणे:
  • समाजसुधारणाविषयक कार्ये सती, विधवा इ. यामुळे समाजात झालेली लुडबूड बऱ्याच जणांना आवडली नाही.
  • वंशश्रेष्ठत्व भारतीय लोकांना दुय्यम समजले जाई.
  1. धार्मिक कारणे
  • ख्रिश्चन धर्मप्रसार – 1813 च्या कायद्यानंतर
  • धर्मप्रसारकांचे येणे वाढले.
  • हिंदू धर्म, ग्रंथ, देवांची होणारी हेटाळणी,
  • धार्मिक सुधारणांचा इंग्रजांचा प्रयत्न.
  1. लष्करी कारणे
  • हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक.
  • शिपायांचा धार्मिक असंतोष.
  • बंगाल आर्मीतील बेशिस्त.
  • शिपायांची आर्थिक समस्या.
  1. तात्कालिक कारणे– ‘एनफिल्ड‘ काडतुसांवर गाय- डुकराची चरबी.

भारतात विविध ठिकाणी झालेले उठाव पुढील प्रमाणे:

क्र.        उठाव ठिकाण उठावाचे नेतृत्व इंग्रजांचे नेतृत्व
1 दिल्ली जनरल बख्त खां जॉन निकलसन, जनरल हडसन
2 कानपूर नानासाहेब व्हीलर, कॉलीन कॅम्पबेल
3 लखनौ बेगम हजरत महल हॅवलॉक नील, औट्रम
4 बरेली (रोहिलखंड खान बहादूर खान विसेंट ऑथट, कॅम्पबेल
5 बिहार (जगदीशपूर) कुंवर सिंह विलियम टेलर
6 फैजाबाद (अवध मौलवी अहमदुल्ला जनरल रेनर्ड
7 ग्वाल्हेर तात्या टोपे ह्यू रोज
8 झांशी राणी लक्ष्मीबाई ह्यू रोज

Main Passes of Himalayas

Revolt of 1857 in Maharashtra |  महाराष्ट्रातील 1857 चा उठाव

Revolt of 1857 in Maharashtra: 1857 च्या सशस्त्र क्रांतीचे नेतृत्व मोगल सम्राट बहादुरशाह आणि काही देशी संस्थानिकांनी केले असले तरी या क्रांतीस भारतीय लष्कराचीही मदत होती. या उठावाने महाराष्ट्रातील जनतेला इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध पेटून उठण्यास भाग पाडले. त्यामध्ये काहींनी सशस्त्र उठाव केले तर काहींनी शाब्दिक असंतोष प्रगट केला. या क्रांतीचे क्षेत्र व्यापक होते. तसेच त्यामध्ये अनेक देशभक्त सामील झाले होते. या उठावात महाराष्ट्रही आघाडीवर होता. यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्यात आले; परंतु हा उठाव यशस्वी झाला नाही.

रंगो बापूजी गुप्ते आणि 1857 चा उठाव – सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजीने अविरत प्रयत्न केले. त्यांना इंग्लंडलाही जावे लागले परंतु तेथून हताश होऊन परत यावे लागले. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा देण्याचे विचारात असतानाच महाराष्ट्रात 1857 च्या उठावाची सुरुवात झाली होती. रंगो बापूजीने याचा फायदा उठवण्याचे ठरवले.

त्यात युरोपियन अधिकाऱ्यांना ठार करायचे, सरकारी खजिने लुटायचे, कैदयांची सुटका करायची, त्यासाठी भोरपासून बेळगावपर्यंत हिंडून मांग, रामोशी, कोळी यांना एकत्र करून सैन्य उभारले.

उठावासाठी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाठार, बेळगाव, कळंबी, कराड, आरळे, देऊर इ. ठिकाणे निवडली. परंतु त्यांच्या हालचालीचा सुगावा इंग्रज सरकारला लागला. त्यांनी धरपकड सुरू केली. मात्र रंगो बापूजी भूमिगत झाले. आरोपींना फासावर लटकवले.

Adda247 App
Adda247 Marathi App

कोल्हापूरमधील उठाव: 1857 च्या उठावाचे पडसाद कोल्हापूरमध्ये उमटले. पहिला उठाव 31 जुलै 1857 च्या रात्री झाला. 27 व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यांनी रेजिमेंटची तिजोरी लुटली व युरोपियन अधिकाऱ्यांच्या घरावरही हल्ले केले. बंड मोडून काढण्यासाठी बेळगाव, सातारा, पुण्यावरून फौजा बोलावण्यात आल्या. यावेळी जेकब नावाच्या अधिकाऱ्याने हा उठाव दडपून टाकला.

6 डिसेंबर 1857 रोजी दुसरा उठाव घडून आला. कोल्हापूर, बेळगाव, धारवाड येथील हिंदी शिपायांनी बंडाची योजना आखली. उठाव सुरू होताच कोल्हापुरातील हिंदी शिपाई बंड करून उठतील असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र ब्रिटिश सावध होऊन दुसऱ्या उठावाच्यावेळी त्यांनी अनेकांना ठार केले व उठाव दडपून टाकण्यात आला.

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22

पेठ(नाशिक) मधील उठाव: नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे कोळ्यांनी उठाव केला होता. पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव हा या उठावाच्या मागे होता. 6 डिसेंबर 1857 रोजी कोळ्यांनी हर्सूल च्या बाजारात लूटमार केली आणि खजिना लुटला. जंगलातील लपलेल्या बंडखोरांना पकडून ग्लासपुलने हद्दपार केले. अनेकांना शिक्षा केल्या. पेठच्या राजाला फाशी देण्यात आली.

नाशिक-नगरमधील उठाव: 1857 ला भिल्लांनी केला. 21 जानेवारी 1857 ला नांदगावला भिल्ल व इंग्रज यांच्यात जोरदार चकमक झाली.ब्रिटिशांनी भिल्लांवर हल्ला केला, काहींना कैद केले तर काहींना फाशी दिली.

जमखिंडी संस्थांनातील उठाव: जमखिंडी संस्थान चे राजे आप्पासाहेब पटवर्धन होते. आप्पासाहेब इंग्रजांच्या मर्जीतील होते. 1857 च्या उठावाच्या वेळी काही गडबड झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी त्यांनी किल्ल्यात शस्त्रास्त्रे व दारूगोळा साठवला, किल्ल्याची दुरुस्ती केली तेथील रेसिडेंटला या हालचाली संशयास्पद वाटल्याचे इंग्रजांनी तेथील उठाय होण्यापूर्वीच बंदोबस्त केला.

औरंगाबादचा उठाव: इंग्रजांच्या सैन्यातील हिंदी शिपाई व घोडदळाच्या फलटणीतील मुस्लीम शिपायांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने उठाव होण्यापूर्वीच अनेकांना पकडून फाशी देण्यात आली.

नागपूरचा उठाव: येथील बंडखोरांना लखनौ व कानपूरच्या बंडखोरांचे साहाय्य मिळाले. 13 जून 1857 हा दिवस उठावासाठी ठरवला. रात्री 12 वाजता आकाशात शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते. तोच इशारा समजून बंडखोरांनी रेसिडन्सी सीताबर्डीचा किल्ला, कामठी इ. ठिकाणे ताब्यात घ्यायचे होते, पण इंग्रजांना कळताच त्यांनी बंडखोरांना पकडले. तिघांना फाशी दिली, अनेकांना जन्मपेठ दिली.

मुघोळमधील बेरड जमातीचा उठाव: झग्रजांनी 1857 ला शस्त्रबंदी कायदा लागू केला. त्यानुसार “आपआपली हत्यारे लोकांनी सरकारात जमा करावी, ज्यांना वैयक्तिक संरक्षणासाठी हत्यारे हवी असतील त्यांनी अर्ज करावा, त्यांना परवाना दिला जाईल” असे जाहीर केले. मुधोळमधील हुलगडीच्या बेरडांना हा कायदा मान्य नव्हता. त्यांच्या प्रमुखाने नोंद केल्यावर त्यालाही समाजाने गद्दार समजून वाळीत टाकले. बेरडांनी गावोगावी जाऊन प्रचार केला की, कोणीही शस्त्रास्त्रे सरकारात जमा करू नयेत. पाचशेच्या आसपास बेरड एकत्र आले. मुधोळच्या कारभाऱ्याने तेथील पोलिटिकल एजंटला बातमी कळवली आणि विजापूरहून सैन्य बोलावून घेतले. इंग्रज सैन्य आणि बेरड यांच्यात चकमकी झाल्या. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सैन्य परत गेले; परंतु हे सैन्य रात्री दोन वाजता हुगळीत शिरले आणि त्यांनी सुमारे दोनशे बेसावध बेरडांची कत्तल केली.

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

Study Material for All MPSC Exams | MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम खूप जास्त आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देत रहा. यामुळे तुम्हाला MPSC च्या आगामी सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

Latest Posts:

RBI Assistant Notification 2022 Out for 950 Posts

MPSC PSI Departmental Exam 2022 Notification Out

SPMCIL Mumbai Recruitment 2022

SSC CHSL Apply Online 2022

FAQs: Revolt of 1857 in India and Maharashtra

Q.1 1857 च्या उठाव या टॉपिक वर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेवर प्रश्न येतात का ?

Ans. हो, 1857 च्या उठाव या टॉपिक वर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेवर प्रश्न येतात.

Q.2 इतिहास या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. इतिहास या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 1857 चा उठाव महाराष्ट्रात झाला होता का?

Ans. हो, 1857चा उठाव महाराष्ट्रात झाला होता.

Q.4 महाराष्ट्रातील 1857 चा उठाव याची माहिती कुठे मिळेल?

Ans.1857 चा उठाव याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!

FAQs

Do questions asked on the Mpsc pre-service examination on the topic of the Revolt of 1857?

Yes,e MPSC State Service Pre-Examination questions asked on the topic of Revolt of 1857.

Where can I find information on the topic of history?

Information on the topic of history can be found on Adda247 Marathi app and website.

Was the revolt of 1857 in Maharashtra?

Yes, the revolt of 1857 took place in Maharashtra.

Where can be found the information about the uprising of 1857 in Maharashtra?

Information about the revoltof 1857 can be found on Adda247 Marathi app and website.