Categories: Latest Post

Regional Divisions of Maharashtra | महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग

महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग

महाराष्ट्रातील भौगोलिक समानता, भाषा, नैसर्गिक संपदा, मृदा यांच्या आधारावर एकूण 5 प्रादेशिक विभागात विभागणी होते.

1.कोकण :

क्षेत्रफळ : 30,728 चौ.कि.मी

जिल्हे : 7 (ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग)

संस्कृत शब्द कोकण यांचा अर्थ बाह्य बाजूचा तुकडा असा होतो.

महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते.

कोकण या प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ 30,728 चौ.कि.मी. असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 9.98% एवढे आहे.

2.पश्चिम महाराष्ट्र :

क्षेत्रफळ: 89,855 चौ.कि.मी

जिल्हे : 7 (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व नाशिक, अहमदनगर)

सह्याद्री पर्वताच्या पुर्वेला पश्चिम महाराष्ट्राचा भाग येतो. हा भाग देश म्हणून देखील ओळखला जातो.

पश्चिम महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 89,855 चौ. कि.मी.असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 29.20% एवढे आहे.

3.मराठवाडा

क्षेत्रफळ : 64,813 चौ.कि.मी

जिल्हे: 8 (औरंगाबाद, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, उस्मनाबाद, नांदेड व जालना)

गोदावरी नदीच्या खोऱ्यात हा प्रादेशिक विभाग वसलेला आहे.मराठवाडा या प्रादेशिक विभागाचे एकूण क्षेत्रफळ 64,813 चौ.कि.मी.असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.08% एवढे आहे.

4.विदर्भ

क्षेत्रफळ : 97,406 चौ.कि.मी.

जिल्हे : 11 (यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोदिया, भंडारा)

नैसर्गिक संपदा, खनिज संपदा, डोंगररांगा इत्यादी या प्रादेशिक विभागाचे वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्राच्या पूर्वेला वर्धा, वैनगंगा, पैनगंगा इत्यादी प्रमुख नद्यांच्या खोऱ्यात विदर्भ प्रादेशिक विभाग वसलेला आहे.

विदर्भाचे एकूण क्षेत्रफळ 97,406 चौ.कि.मी.असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 31.65% एवढे आहे.

5.खान्देश 

क्षेत्रफळ : 24,911 चौ.कि.मी

जिल्हे : 3 (धुळे, नंदुरबार, जळगाव)

खान्देश हा प्रदेश तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. अकबराच्या राजवटीत या प्रदेशाला ‘दानदेश’ असे म्हटले जात असे.

खान्देशाचे एकूण क्षेत्रफळ 24,911 चौ.कि.मी. असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 8.09% एवढे आहे.

महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य

 महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागाची क्षेत्रफळानुसार क्रमवारी:- 

1.विदर्भ 97,406

2.पश्चिम महाराष्ट्र 89,885

3.मराठवाडा 64,813

4.कोकण 30,728

5.खान्देश 24,911

bablu

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 02 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

4 mins ago

Question of the Day (Geography) | आजचा प्रश्न (भूगोल)

Question of the Day (Geography) Q. Pagladia Dam Project is located in which state?  (a) Arunachal Pradesh  (b) Sikkim  (c)…

2 hours ago

भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार | Coin Market and Capital Market in India : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: कोणत्याही देशाचे वित्त हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा…

2 hours ago

पक्षांतर विरोधी कायदा | Anti-Defection Act : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…

2 hours ago

MPSC Shorts | Group B and C | Geography | भारतातील खनिज संपत्ती

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

2 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Who topped the Hurun rich list in China for the fourth consecutive year…

2 hours ago