Categories: Latest Post

Pola 2022, Bail Pola Information in Marathi, बैल पोळा सणाविषयी माहिती

Pola 2022: Bail Pola is a Hindu festival celebrated in Maharashtra and Karnataka for bull worship. Generally, the farmers celebrate this festival with great enthusiasm on the day of Shravani Amavasya. In this article, we will see information about why Pola 2022 is celebrated, ancient legends, and how Pola 2022 is celebrated in Maharashtra.

Bail Pola 2022
Category Latest Posts
Festival Name Bail Pola 2022
Celebrate in Mainly in Maharashtra and Karnataka

Pola 2022

Pola 2022: भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, शेतीमध्ये बैलांचे योगदान हे बहुमूल्य आहे. त्यामुळे या बैलांची भारत देशात पूजा केली जाते. पोळा हा सण त्यापैकीच एक आहे, या दिवशी शेतकरी गायी आणि बैलांची पूजा करतात. पोळा (Pola 2022) सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात राज्यात साजरा केला जातो. बैलाबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. महाराष्ट्रात 26 ऑगस्ट 2022 रोजी उत्साहात Pola 2022 साजरा केला जात आहे.आज या लेखात आपण Pola 2022 का साजरा करतो, प्राचीन आख्यायिका व महाराष्ट्रात Pola 2022 कसा साजरा केला जातो याबद्दल माहिती पाहणार आहे.

Bail Pola Information in Marathi | बैल पोळा सणाविषयी माहिती

Bail Pola Information in Marathi: महाराष्ट्रात व कर्नाटकात बैलपूजेनिमित्त साजरा केला जाणारा एक हिंन्दू सण म्हणजे पोळा (Pola 2022). सर्वसामान्यतः श्रावणी अमावास्येच्या दिवशी शेतकरीवर्ग हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा करतात. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे.या दिवशी बैलांना सजवून-रंगवून त्यांची पूजा करतात. त्यांना आरती ओवाळतात व पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवितात. गावातील सर्व बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढतात.काही ठिकाणी बैलांच्या शर्यतीही लावतात.घराल बैल नसतील, तर मातीच्या बैलांची पूजा करतात. या दिवशी शेतकरी बैलाकडून कोणतेही काम करून घेत नाही.बैलांना दैवत मानून त्यांची वर्षातून एक दिवस पूजा करून शेतकरी बैलांविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांच्याबद्दल पूज्यभाव व्यक्त करतो.

या सणास दक्षिण महाराष्ट्रात ‘बेंदूर’ असेही म्हणतात. या सणामुळे धनधान्याची व गोधनाची समृद्धी होते, अशी समजूत आहे. पशुपूजेच्या ह्या प्रकाराचे मूळ मानवाने ज्या काळात पशुपालनास आरंभ केला, त्या प्राचीन अवस्थेत असणे शक्य आहे.

Adda247 Marathi App

How to Celebrate Pola Festival in Maharashtra | महाराष्ट्रात पोळा सण कसा साजरा करतात

How to Celebrate Pola Festival in Maharashtra: महाराष्ट्रात पोळा सण उत्साहात साजरा करतात. त्यादिवशी बैलास सजवतात व त्यांची पूजा करतात.

  • बैलास हळद, बेसन पेस्ट लावून, तेलाने मालिश केली जाते.
  • यानंतर त्यांना गरम पाण्याने चांगले आंघोळ घातली जाते.
  • यानंतर बैलांना चांगले सजवले जाते
  • त्यांना रंगीबेरंगी कपडे परिधान करतात, विविध प्रकारचे दागिने, हार घालतात. शाल चढवली जाते.
  • गावातील सर्व लोक एका ठिकाणी जमतात, आणि सजवलेले बैल आणतात. या दिवशी प्रत्येकाला आपले बैल पाहण्याची संधी मिळते.
  • त्यानंतर सर्वांचे पूजन करून संपूर्ण गावात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते.

Bail Pola Akhyayika | बैल पोळा अख्यायिका

Bail Pola Akhyayika: कैलासमध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाटाचा खेळ खेळीत होते. या खेळामध्ये माता पार्वती विजयी झाली परंतु भगवान शंकर मात्र स्वतः जिंकल्याचे म्हणाले. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नंदीला माता पार्वतीने विचारले कि या खेळामध्ये कोण जिंकले. तेव्हा नंदीने भगवान शंकराचे नाव घेतले. त्यावर मा पार्वती क्रोधीत झाल्या आणि नंदीला शाप दिला की, पृथ्वीवर तुझ्या मानेवर सदैव नांगर राहील. तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल. ऐकून नंदी घाबरला आणि त्याने आपली चूक मान्य केली. त्यावर पार्वतीने त्याला सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव मानून तुझी पूजा करेल.तेव्हापासून Bail Pola सण साजरा होतो.

Adda247 Marathi Telegram

आपणास बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

FAQS: Pola 2022

1. महाराष्ट्रात बैलपोळा 2022 कधी साजरा होत आहे?
Ans. महाराष्ट्रात बैलपोळा 2022 26 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जात आहे.

2. बैलपोळा हा सन का साजरा केल्या जातो?
Ans. बैलाबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केल्या जातो.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exam

FAQs

When is Pola 2022 being celebrated in Maharashtra?

Pola 2022 is being celebrated on 26 August 2022 in Maharashtra.

Why is Bail Pola celebrated?

Bail Pola is celebrated to express gratitude for the bull.

chaitanya

Recent Posts

तुम्हाला “कर्तव्यपराङ्मुख” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

27 mins ago

Do you know the meaning of Cozen? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

57 mins ago

Current Affairs in Short (02-05-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

राष्ट्रीय बातम्या चिनी आयातीवर भारताचे अवलंबित्व: ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने चिनी आयातीवरील भारताच्या अवलंबनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे,…

1 hour ago

1 May MPSC 2024 Study Kit | 1 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

16 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 01 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

17 hours ago

मराठी व्याकरण भाग 5 – शब्दसमूहाबद्दल एक शब्द : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी विषयात अनन्यसाधारण महत्व आहे. आगामी काळातील भरती जसे कि,…

17 hours ago