Table of Contents
NHM Dhule Recruitment 2021: जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद धुळे अंतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, उपजिल्हा रुग्णालयस्तर, ग्रामीण रुग्णालयस्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एकुण 60 रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात NHM धुळे पदभरती 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, NHM धुळे पदभरती 2021 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.
NHM Dhule Recruitment 2021 | NHM धुळे पदभरती 2021
NHM Dhule Recruitment 2021: Optometrist, Early Interventionist cum Special Educator, Social Worker, Pharmacist, Psychologist, Accountant, Dental Assistant, Physiotherapist, Lab Technician, Staff Nurse, Technician, Audiologist या सर्व पदांकरिता जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद धुळे अंतर्गत कंत्राटी स्वरुपाची पदभरती जाहीर झाली. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिनांक 08 नोव्हेंबर 2021 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज पाठवू शकतात. या लेखात, NHM Dhule Recruitment 2021 चा सर्व तपशील नमूद आहेत.
NHM Dhule Recruitment 2021 Notification | NHM धुळे पदभरती 2021 अधिसूचना
NHM Dhule Recruitment 2021 Notification: NHM धुळे पदभरती 2021 अंतर्गत विविध 12 संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण 60 रिक्त पदांची अधिसूचना 28 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर झाली. ही पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM धुळे पदभरती 2021 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM धुळे पदभरती 2021 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
NHM धुळे पदभरती 2021 pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
NHM Dhule Recruitment 2021- Important Dates | NHM धुळे पदभरती 2021- महत्वाच्या तारखा
NHM Dhule Recruitment 2021- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये NHM धुळे पदभरती 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.
NHM Dhule Recruitment 2021- Important Dates | |
Events | Dates |
NHM धुळे पदभरती 2021- अधिसूचना | 28 ऑक्टोबर 2021 |
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख | 28 ऑक्टोबर 2021 |
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख | 08 नोव्हेंबर 2021 |
मुलाखतीची/ लेखी परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर येईल |
नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021
NHM Dhule Recruitment 2021- Vacancies | NHM धुळे पदभरती 2021- रिक्त जागांचा तपशील
NHM Dhule Recruitment 2021- Vacancies: जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद धुळे अंतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, उपजिल्हा रुग्णालयस्तर, ग्रामीण रुग्णालयस्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेतील 12 संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण 60 रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे.
Sr. No | Post / पदाचे नाव | No of Vacancies / रिक्त पदांची संख्या |
1 | Optometrist | 1 |
2 | Early Interventionist cum Special Educator | 1 |
3 | Social Worker | 1 |
4 | Pharmacist | 1 |
5 | Psychologist | 1 |
6 | Accountant | 2 |
7 | Dental Assistant | 1 |
8 | Physiotherapist | 1 |
9 | Lab Technician | 1 |
10 | Staff Nurse | 44 |
11 | Technician | 4 |
12 | Audiologist | 2 |
एकूण | 60 |
NHM सोलापूर पदभरती 2021 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
NHM Dhule Recruitment 2021- Eligibility Criteria | NHM धुळे पदभरती 2021- पात्रता निकष
NHM Dhule Recruitment 2021- Eligibility Criteria: NHM धुळे पदभरती 2021 अंतर्गत विविध 12 संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.
Sr. No | Post / पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | Optometrist | Bachelor in Optometry from recognized university With 1 Year Experience |
2 | Early Interventionist cum Special Educator | Special Educator in Hearing impairment/Visually Impaired/& Mentally retarded. (Degree Approved by rehabilitative Council Of India) With 2 Year Experience |
3 | Social Worker | MSW With 2 Year Experience |
4 | Pharmacist | B Pharm or D Pharm With 1 Year Experience |
5 | Psychologist | M.Phill in Clinical Psychology |
6 | Accountant | Bcom with tally Certification |
7 | Dental Assistant | 12th Pass With Dental Clinical 1 Year Experience |
8 | Physiotherapist | Graduate Degree in physiotherapy |
9 | Lab Technician | DMLT With 1 Year Experience |
10 | Staff Nurse | GNM/Bsc Nursing |
11 | Technician | 12th Science & Diploma in Dental Technician Course (Registration with State Dental Council) |
12 | Audiologist | Degree in Audiology with 2 years Experience |
वयोमर्यादा: खुला प्रवर्ग 38 वर्ष व मागास प्रवर्ग 43 वर्ष
NHM Dhule Recruitment 2021- Monthly Salary | NHM धुळे पदभरती 2021- महिन्याचे मानधन
NHM Dhule Recruitment 2021- Monthly Salary: NHM धुळे पदभरती 2021 सर्व 12 संवर्गातील पदांसाठी मिळणारे एकूण मानधन खालील तक्त्यात दिले आहे.
Sr. No | Post / पदाचे नाव | एकूण मानधन (रु) |
1 | Optometrist | 20000 |
2 | Early Interventionist cum Special Educator | 28000 |
3 | Social Worker | 28000 |
4 | Pharmacist | 17000 |
5 | Psychologist | 30000 |
6 | Accountant | 18000 |
7 | Dental Assistant | 15800 |
8 | Physiotherapist | 20000 |
9 | Lab Technician | 17000 |
10 | Staff Nurse | 20000 |
11 | Technician | 17000 |
12 | Audiologist | 25000 |
NHM Dhule Recruitment 2021- Application Fee | NHM धुळे पदभरती 2021- अर्ज शुल्क
NHM Dhule Recruitment 2021- Application Fee: NHM धुळे पदभरती 2021 साठी आमागास प्रवर्गासाठी फी 150 रु. तर मागास प्रवर्गासाठी 100 रु आहे.
अर्ज शुल्क हे डिमांड ड्राफट (Demand Draft) स्वरुपात स्विकारण्यात येईल. सदरील शुल्क हे नापरतावा (Non Refundable) असुन, उमेदवारांनी डिमांड ड्राफट हे District Integrated Health & Family Welfare Society Dhule या संपूर्ण नावे असावा आणि अर्जावर एकदम वरच्या बाजुस जोडण्यात यावा. डिमांड ड्राफटच्या मागील बाजुस उमेदवाराने त्यांचे संपूर्ण नाव, अर्ज सादर केलेल्या पदाचे नाव, पद क्रमांक टाकावा.
NHM Dhule Recruitment 2021- Application Address | NHM धुळे पदभरती 2021- अर्ज पाठवायचा पत्ता
NHM धुळे पदभरती 2021- अर्ज पाठवायचा पत्ता: NHM धुळे अंतर्गत पदभरती मध्ये इच्छुक उमेदवारास प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज करावा लागे. अर्ज पाठवायचा पत्ता खालीलप्रमाणे आहे.
आज पाठवायचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय परिसर साक्री रोड, धुळे
अर्जासोबत एक कोरा 5 रु तिकीट लावलेला लिफाफा जोडावा व त्या लिफाफ्यात उमेदवाराने स्वतःचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर टाकावा.
NHM Dhule Recruitment 2021-
Terms and Condition | NHM धुळे पदभरती 2021- अटी व शर्ती
NHM Dhule Recruitment 2021-Terms and Condition: NHM धुळे पदभरती 2021 ऑफलाईन अर्ज सादर करावयाच्या काही अटी व शर्ती आहेत. ज्याचे पालन प्रत्येक आवेदन करण्याऱ्या उमेदवारास करायचे आहे. त्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.
- उमेदवारांकडून दिनांक 26/10/2021 ते दिनांक 08/11/2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत, (सुट्टीचे दिवस वगळून) अर्ज स्विकृती करण्यात येईल. अर्ज पाधावण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय परिसर साक्री रोड, धुळे या ठिकाणी पाठवावा. उमेदवारांस एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज सादर करायचा असल्यास, प्रत्येक पदाकरीता स्वंतत्रपणे सादर करावा. पंरतु वेळप्रसंगी एकाच वेळी मुलाखत/परिक्षा घेतली गेल्यास कोणत्यातरी एका पदाकरीता उपस्थित रहावे लागेल. ज्यास उपस्थित राहील त्या पदाकरीता संबंधित उमेदवार ग्राहय धरला जाईल.
- अनुभवाच्या बाबतीत फक्त शासकिय, निम शासकिय स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेद्वारांनी जाहिरातीत नमुद पदासाठी स्वतंत्रपणे पदनिहाय मुलाखतीकरिता सकाळी वाजता सर्व आवश्यक दस्तावेजांसह उपस्थित राहावे. सदरील पदे हि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरुपाची राहतील. त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही. पदांसाठीचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
- वरील सर्व पदे ही कंत्राटी पध्दतीने भरण्यात येत असल्याने त्यास नागरी सेवा नियम लागू होणार नाही.
- एकूण पदांच्या संख्येत अथवा आरक्षणामध्ये बदल होवू शकतो.
- सदरील पदे ही निव्वळ कंत्राटी पध्दतीने केवळ प्रकल्प कालावधी पूरते भरावयाचे असून प्रकल्प बंद होताच सदर पदे आपोआप संपुष्टात येतील.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेद्वारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीस पात्र उमेद्वाराने मुलाखतीकरीता खालील आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत (Original) व साक्षांकीत (xerox) प्रतींचा एक संच या सह उपस्थित राहावे. (नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटो -1 व स्वतःचा ई-मेल व दुरध्वनी क्रमांक, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, जन्म तारखेचे प्रमाणपत्र (शाळा/ महाविद्यालय सोडण्याचे प्रमाणपत्र / जन्माचे प्रमाणपत्र), ओळखपत्र आधार कार्ड/ मतदान कार्ड / ड्रायव्हींग लायसंस, पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेची अंतिम वर्षाची गुणपत्रीका व पदानुसार शासनातर्फे प्राप्त रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतशिवाय प्राप्त पदव्युत्तर पदवी (PG Degree) आणि पदव्युत्तर पदवीका (PG Diploma) प्रमाणपत्र.)
- मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अर्जाच्या छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल,
- निवड झालेल्या उमेदवाराने रुजू होतांना विहीत नमुन्यात रुपये १००/- च्या बॉन्डपेपरवर करारनामा करून दयावा लागेल. (सेवेदरम्यान करारनाम्याच्या अटी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील)
- पदाकरीता बिंदू नामावलीनुसार राखीव प्रवर्गास अनुसरुन पदभरती जाहिरात दिल्यानंतर पुढील प्रक्रियेव्दारे अपेक्षित राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कालमर्यादेत राबविण्याचे अभियान आहे ही बाब लक्षात घेऊन 31 मार्च 2022 पर्यंत यादीतील निवड केलेल्या खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल.
IBPS PO 2021 अधिसूचना जाहीर | IBPS PO 2021 Notification Out
- सदरहु भरती प्रक्रियेकरीता अर्ज दि. 08/11/2021 अखेर राहणार असुन तदनंतर छाननी, लेखी परिक्षा/मुलाखत प्रक्रिया, निवड यादी प्रसिध्द करणे, हरकती/आक्षेप प्राप्त करुन घेणे व त्या निकाली काढणे आदी रितसर शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानकडील प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार भरतीप्रक्रिया पार पाडुन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे इ. बाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी www.mahaarogya.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करणेत येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. सदर विषयी कार्यालयात विचारणा करण्यांसाठी येऊ नये.
FAQs NHM Dhule Recruitment 2021
Q1. NHM धुळे पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?
Ans. NHM धुळे पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे
Q2. NHM धुळे पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
Ans. NHM धुळे पदभरती 2021 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2021 आहे
Q3. NHM धुळे पदभरती 2021 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?
Ans. NHM धुळे पदभरती 2021 अधिसूचनेनुसार 60 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Q4. NHM धुळे पदभरती 2021 अर्ज करण्याची फी किती आहे?
Ans. NHM धुळे पदभरती 2021 अर्ज करण्यासाठी आमागास प्रवर्गासाठी फी 150 रु. तर मागास प्रवर्गासाठी 100 रु आहे.