Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC Age Limit for all Exams

MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी वयोमर्यादा | MPSC Age Limit for all Exams

Table of Contents

MPSC Age Limit for all Exams: देशांतील कोणत्याही राज्याची राज्यव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी महत्वाचा घटक असतो तो ‘सक्षम प्रशासन’. त्या करिता आपल्या देशांत केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी ‘केंद्रीय लोकसेवा आयोगाची’ स्थापना केली आहे. याच धर्तीवर  महाराष्ट्रामध्ये ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ 1 मे 1960 रोजी स्थापन करण्यात आला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा (MPSC Age Limit) निश्चित केल्या गेली आहे. आज या लेखात आपण MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेनुसार वयोमर्यादा (MPSC Age Limit) काय आहे यासंबधी माहिती पाहणार आहे.

MPSC Age Limit for all Exams | MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी वयोमर्यादा

MPSC Age Limit for all Exams: केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये होतात. MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा खालील प्रमाणे आहे. या लेखात प्रत्येक परीक्षेनुसार वयोमर्यादा (MPSC Age Limit) दिली आहे.

MPSC Age Limit for all Exams | MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी वयोमर्यादा
MPSC
  • MPSC State Services Examination – MPSC राज्यसेवा परीक्षा
  • MPSC Group B Combine Examination – MPSC गट ब संयुक्त परीक्षा
  • MPSC Group C Combine Examination – MPSC गट क संयुक्त परीक्षा
  • MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam – MPSC  दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
  • MPSC Asstt. Motor Vehicle Inspector Exam – MPSC  सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
  • MPSC Gazetted Technical Services Main Competitive Examination – MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षा

MPSC Age Limit for MPSC State Services Examination | MPSC राज्य सेवा परीक्षेची वयोमर्यादा

MPSC Age Limit for MPSC State Services Examination: MPSC राज्यसेवा परीक्षेची वयोमर्यादा (MPSC Age Limit) प्रवर्गा (Category) नुसार खाली देण्यात आली आहे

अ. क्र. प्रवर्ग वयोमर्यादा
किमान कमाल
1 सर्वसाधारण (General) 19 38
2 मागासवर्गीय (Backward Class) 19 43
3 खेळाडू (Sportsman) 19 43
4 माजी सैनिक (Ex. Serviceman) 19 43
5 दिव्यांग उमेदवार (Physically Handicapped) 19 45
  • टीप: खेळाडू व माजी सैनिक प्रवर्गात जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर त्याची कमाल वयोमर्यादा (MPSC Age Limit) 48 वर्षे आहे.

MPSC Age Limit for MPSC Group B Combine Examination | MPSC गट क संयुक्त परीक्षेची वयोमर्यादा

MPSC Age Limit for MPSC Group B Combine Examination: MPSC गट ब संयुक्त परीक्षेची वयोमर्यादा (MPSC Age Limit) प्रवर्गा (Category) नुसार खाली देण्यात आली आहे

अ. क्र. प्रवर्ग वयोमर्यादा
किमान कमाल
1 सर्वसाधारण (General) 19 38
2 मागासवर्गीय (Backward Class) 19 43
3 खेळाडू (Sportsman) 19 43
4 माजी सैनिक (Ex. Serviceman) 19 43
5 दिव्यांग उमेदवार (Physically Handicapped) 19 45
  • टीप: खेळाडू व माजी सैनिक प्रवर्गात जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर त्याची कमाल वायोमर्यादा (MPSC Age Limit) 48 वर्षे आहे.

MPSC Age Limit चा शासन निर्णय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC Age Limit for MPSC Group C Combine Examination | MPSC गट क संयुक्त परीक्षेची वयोमर्यादा

MPSC Age Limit for MPSC Group C Combine Examination: MPSC गट क संयुक्त परीक्षेची वयोमर्यादा प्रवर्गा (Category) नुसार खाली देण्यात आली आहे

अ. क्र. प्रवर्ग वयोमर्यादा
किमान कमाल
1 सर्वसाधारण (General) 19 38
2 मागासवर्गीय (Backward Class) 19 43
3 खेळाडू (Sportsman) 19 43
4 माजी सैनिक (Ex. Serviceman) 19 43
5 दिव्यांग उमेदवार (Physically Handicapped) 19 45
  • टीप: खेळाडू व माजी सैनिक प्रवर्गात जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर त्याची कमाल मर्यादा 48 वर्षे आहे.

MPSC Age Limit for MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam | MPSC  दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षेची वयोमर्यादा

MPSC Age Limit for MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam:  MPSC  दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षेची वयोमर्यादा वयोमर्यादा (MPSC Age Limit) प्रवर्गा (Category) नुसार खाली देण्यात आली आहे

अ. क्र. प्रवर्ग वयोमर्यादा
किमान कमाल
1 सर्वसाधारण (General) 19 35
2 मागासवर्गीय (Backward Class) 19 43
3 खेळाडू (Sportsman) 19 43
4 माजी सैनिक (Ex. Serviceman) 19 43
5 दिव्यांग उमेदवार (Physically Handicapped) 19 45
  • टीप: खेळाडू व माजी सैनिक प्रवर्गात जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर त्याची कमाल वयोमर्यादा (MPSC Age Limit) 48 वर्षे आहे.

MPSC Age Limit for MPSC Asstt. Motor Vehicle Inspector Exam | MPSC  सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षेची वयोमर्यादा

MPSC Age Limit for MPSC Asstt. Motor Vehicle Inspector Exam: MPSC  सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षेची वयोमर्यादा (MPSC Age Limit) प्रवर्गा (Category) नुसार खाली देण्यात आली आहे

अ. क्र. प्रवर्ग वयोमर्यादा

किमान कमाल
1 सर्वसाधारण (General) 19 38
2 मागासवर्गीय (Backward Class) 19 43
3 खेळाडू (Sportsman) 19 43
4 माजी सैनिक (Ex. Serviceman) 19 43
5 दिव्यांग उमेदवार (Physically Handicapped) 19 45
  • टीप: खेळाडू व माजी सैनिक प्रवर्गात जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर त्याची कमाल वयोमर्यादा (MPSC Age Limit) 48 वर्षे आहे.

MPSC Exam Time Table 2022, MPSC Exam Schedule 2022

MPSC Age Limit for Gazetted Technical Services Competitive Examination | MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षेची वयोमर्यादा

MPSC Age Limit for Gazetted Technical Services Competitive Examination: MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षेची वयोमर्यादा (MPSC Age Limit) प्रवर्गा (Category) नुसार खाली देण्यात आली आहे

अ. क्र. प्रवर्ग वयोमर्यादा

किमान कमाल
1 सर्वसाधारण (General) 19 38
2 मागासवर्गीय (Backward Class) 19 43
3 खेळाडू (Sportsman) 19 43
4 माजी सैनिक (Ex. Serviceman) 19 43
5 दिव्यांग उमेदवार (Physically Handicapped) 19 45
  • टीप: खेळाडू व माजी सैनिक प्रवर्गात जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर त्याची कमाल वयोमर्यादा (MPSC Age Limit) 48 वर्षे आहे.

MPSC Important Notice Regarding Maximum Attempts | MPSC Maximum Attempts बाबत महत्वाची सूचना 

MPSC Important Notice regarding maximum attempts: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारशी संदर्भात राबविण्यात येणा-या निवडप्रक्रियामध्ये वेळोवेळी करावयाच्या विविध सुधारणात्मक उपाययोजनांपैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधीची संख्या मर्यादित करणे. दिनांक 30 डिसेंबर, 2020 रोजी उमेदवारांच्या माहितीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर हा निर्णय प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यासंबधी सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC Maximum Attempts बाबत महत्वाची सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Age limit of Competitive Exam Extended by 1 year due to covid 19 | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने भरतीमध्ये मध्ये वयोमर्यादा 1 वर्षांनी वाढविली

Age limit of Competitive Exam Extended by 1 year due to covid 19: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात दि.1 मार्च 2020 पासून जाहिराती प्रसिध्द न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. 25.04.2016 च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा (MPSC Age Limit), दि. 01 मार्च, 2020 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिध्द होतील, त्या जाहिरांतीसाठी “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.

MPSC Age Limit for all Exams | MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी वयोमर्यादा_4.1
Age limit of Competitive Exam Extended by 1 year due to covid 19

FAQs: MPSC Age Limit for all Exams

Q1. MPSC घेत असलेल्या सर्व स्पर्धा परीक्षेची वयोमर्यादा निश्चित आहे का?

Ans होय, MPSC घेत असलेल्या सर्व स्पर्धा परीक्षेची वयोमर्यादा निश्चित आहे.

Q2. MPSC मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा काय आहे?

Ans. MPSC मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा 19 वर्षे ते 38 वर्षे ही आहे

Q3. MPSC ने max. attempts बद्दल सूचना जाहीर केली आहे का?

Ans. होय, MPSC ने max. attempts बद्दल सूचना जाहीर केली आहे.

Q4. MPSC बद्दल महत्वपूर्ण अपडेट मला कुठे पाहायला मिळेल?

Ans. Adda247 मराठी च्या वेबसाईटवर तुम्हाला MPSC बद्दल महत्वपूर्ण अपडेट बघायला मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

FAQs

Is there an age limit for all competitive exams conducted by MPSC?

Yes, the age limit for all competitive exams conducted by MPSC is fixed.

What is the age limit for general category in MPSC?

The age limit for the general category in MPSC is 19 years to 38 years

MPSC has notice been issued about max. attempts?

Yes, MPSC Notice of max. attempts have been issued.

Where can I find important updates about MPSC?

You can find important updates about MPSC on Adda247 Marathi website