Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC Important Notice Regarding Maximum Attempts

MPSC Maximum Attempts बाबत महत्वाची सूचना | MPSC Important Notice Regarding Maximum Attempts

Maharashtra Public Service Commission has released notification to Cancel MPSC Maximum Attempt Limit on its official website i.e. https://mpsc.gov.in/. So now there will be no maximum attempt limit for any candidates. MPSC Important Notice Regarding Maximum Attempts is released on 15th June 2022. Get detailed information about MPSC Important Notice Regarding Maximum Attempts.

MPSC Important Notice Regarding Maximum Attempts
Category Latest Updates
Organization Name MPSC
Name MPSC Important Notice Regarding Maximum Attempts
Max. No. of Attempts No Restrictions

MPSC Notice Regarding Cancelation of Maximum Attempts Limit

MPSC Important Notice Regarding Maximum Attempts: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांना MPSC ने संधी / प्रयत्नांची मर्यादा आखून दिली होती. पण दिनांक 15 जून 2022 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधीची संख्या मर्यादित (MPSC Important Notice Regarding Maximum Attempts) करण्याबाबतचा आयोगाचा निर्णय या घोषणेव्दारे रद्द केला आहे. आज या लेखात आपण आयोगाने जाहीर केलेल्या नवीन प्रसिद्धीपत्रकाबद्दल (MPSC Important Notice Regarding Maximum Attempts) माहिती पाहणार आहोत.

MPSC Notice Regarding Cancelation of Maximum Attempts Limit | MPSC Maximum Attempts बाबत महत्वाची सूचना 

MPSC Important Notice regarding maximum attempts: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारशी संदर्भात राबविण्यात येणा-या निवडप्रक्रियामध्ये वेळोवेळी करावयाच्या विविध सुधारणात्मक उपाययोजनांपैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधीची संख्या (maximum attempts) मर्यादित करण्य्ताबाबतची सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 30 डिसेंबर, 2020 रोजी प्रसिद्ध केली होती. सोबतच 28 ऑक्टोबर 2021 रोजी दिव्यांग व अनाथ प्रवर्गाकरीताही परीक्षेच्या संधीची संख्या याबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर निर्णय प्रसिध्द करण्यात आला होता. पण दिनांक 15 जून 2022 प्रसिद्धीपत्रक जाहीर करून हे दोन्ही निर्णय रद्द केले आहे. त्यामुळे उमेदवार आपल्या प्रवर्गानुसार कमाल वयोमर्यादा असेपर्यंत परीक्षा देऊ शकतात. प्रवर्गानुसार संधीमध्ये झालेले बदल खालील तक्त्यात दिले आहे.

उमेदवार संधी 
खुला (अराखीव) उमेदवार  6 कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.
अनुसुचित जमाती व अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवार कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.
उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवार 9 कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.

महत्वाचे मुद्दे

  • सर्वसाधारण प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आहे. नवीन अधिसूचनेनुसार सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार वय वर्ष 38 पर्यंत MPSC मार्फत घेण्यात येणारे सर्व परीक्षा देऊ शकतात.
  • मागास प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे. नवीन अधिसूचनेनुसार मागास प्रवर्गातील उमेदवार वय वर्ष 43 पर्यंत MPSC मार्फत घेण्यात येणारे सर्व परीक्षा देऊ शकतात.
  • माजी सैनिक आणि खेळाडू प्रवर्गातील उमेदवार आता वयाच्या 43 वर्षापर्यंत MPSC मार्फत घेण्यात येणारे सर्व परीक्षा देऊ शकतात.

MPSC Important Notice Regarding Maximum Attempts of Handicapped and Orphans | MPSC Maximum Attempts दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी महत्वाची सूचना 

MPSC Important Notice Regarding Maximum Attempts of Handicapped and Orphans:  28 ऑक्टोबर 2021 रोजी दिव्यांग व अनाथ प्रवर्गाकरीताही परीक्षेच्या संधीची संख्या याबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर निर्णय प्रसिध्द करण्यात आला होता. पण दिनांक 15 जून 2022 प्रसिद्धीपत्रक जाहीर दिव्यांग व अनाथ उमेदवारांचे प्रयत्न / संधीची मर्यादा रद्द करण्यात आली आहे.

उमेदवार संधी 
दिव्यांग उमेदवार  9 कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.
अनाथ उमेदवार  9 कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.

Note

  • दिव्यांग उमेदवार व अनाथ उमेदवार आता वयाच्या 43 वर्षापर्यंत MPSC मार्फत घेण्यात येणारे सर्व परीक्षा देऊ शकतात.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण MPSC ने 15 जून 2022 रोजी जाहीर केलेले प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करू शकता.

Click here to Download MPSC New Notice of Cancelation of Max No. Of Attempts

MPSC Important Notice Regarding Maximum Attempts
Adda247 Marath App

FAQ MPSC Important Notice Regarding Maximum Attempts

Q.1 OBC उमेदवारांकरिता कमाल किती संधी प्राप्त आहेत?

Ans: OBC उमेदवारांकरिता आता संधीची कोणतीही मर्यादा नाही.

Q.2 Open उमेदवारांकरिता कमाल किती संधी प्राप्त आहेत?

Ans: Open उमेदवारांकरिता आता संधीची कोणतीही मर्यादा नाही.

Q.3 EWS उमेदवारांकरिता कमाल किती संधी प्राप्त आहेत?

Ans: EWS उमेदवारांकरिता आता संधीची कोणतीही मर्यादा नाही.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MPSC https://www.mpsc.gov.in/

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

adda247 prime
Maharashtra Exam Prime Test Pack

Sharing is caring!