Categories: Latest Post

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-14th July

 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. आपण एमपीएससी आणि इतर परीक्षाची तयारी करत असाल तर आपल्याला क्विझ देण्याचे महत्त्व माहित असलेच पाहिजे. बर्‍याच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पुरेसे तास दिले जात असतानाही त्यांना या परीक्षांची पूर्तताही करता आली नाही कारण ते त्यांचे परीक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत आणि संशोधन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या संबंधित विषयाची किंवा विषयाची क्विझ देणे कारण आपण या मार्गाने कव्हर करू शकता कमी वेळात जास्तीत जास्त विषय.  दैनिक क्विझ देऊन तुम्ही तुमच्या तयारीची पातळी तपासू शकता. महाराष्ट्र राज्य संदर्भात आपला एकूण किती अभ्यास झालेला आहे ह्याची पूर्तता करण्यासाठी घेऊन येत आहोत Maharashtra State GK Quiz प्रश्न व संपूर्ण मराठीत स्पष्टीकरणासह.

 

Q1. महाराष्ट्रातील भूदृश्यांच्या विकासात खालीलपैकी ——– या हवामान घटकांची भूमिका महत्त्वाची आहे.
(a) आभ्राच्छादन
(b) आर्द्रता
(c) पर्जन्य
(d) तापमान

Q2. महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता ——आहे.
(a) 60 ते 75 टक्केच्या दरम्यान
(b) 65 ते 75 टक्केच्या दरम्यान
(c) 70 ते 80 टक्केच्या दरम्यान
(d) 80 टक्के पेक्षा जास्त

Q3. अजिंठा रेंज पूर्वेच्या टोकाला दोन शिंगात विभागली गेली आहे.
(1) परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाणारी दक्षिणेकडील सातमाळ रेंज
(2) यवतमाळ जिल्ह्यातून जाणारी उत्तरेकडील निर्मल रेंज. वरील कोणते विधान बरोबर आहे?
(a) केवळ (1) बरोबर आहे.
(b) केवळ (2) बरोबर आहे.
(c) न (1) बरोबर न (2)
(d) दोन्ही (1) व (2) बरोबर

Q4. कोणत्या विभागात सारखे (आकड्यांत) जिल्हे आहेत?
(a) नाशिक, पुणे, अमरावती
(b) नाशिक, पुणे, नागपूर
(c) नाशिक, कोंकण, अमरावती
(d) नागपूर, कोंकण, पुणे

Q5. खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्थवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे?
(a) देहू
(b) आळंदी
(c) पंढरपूर
(d) नाशिक

Q6. खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा-तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?
(a) जळगाव
(b) कोल्हापूर
(c) धुळे
(d) सांगली

Q7. चुकीचा पर्याय शोधा.
(1) भीमा नदीचे खोरे हरिशचंद्रबालाघाट आणि शंभूमहादेव या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे.
(2) गोदावरी नदीचे खोरे सातमाळा-अजिठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांच्या दरमयान आहे.
(3) तापी नदीचे खोरे सातमाळा-अजिंठा आणि सातपुडा डोंगर रांगांच्या दरम्यान आहे.
(4) कृष्णा नदीचे खोरे शंभू-महादेवाचे डोंगर आणि सातमाळ-अजिठा डोंगर रांगांच्या दरम्यान आहे.
(a) फक्त (1)
(b) फक्त (4)
(c) (1) आणि (2)
(d) (2) आणि (3)

Q8. भारतीय नदी-जोड प्रकल्पामध्ये देशातील किती नद्या जोडण्यासाठी प्रस्तावित केल्या आहेत?
(a) 10
(b) 25
(c) 37
(d) 47

Q9. आम्रसरी म्हणजे काय?
(a) कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य
(b) जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य
(c) हिवाळ्यात पडणारा पाऊस
(d) पश्चिमी अडथळ्यांमुळे पडणारा पाऊस

Q10. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि ——हे घटक वापरले जातात.
(a) पर्जन्य
(b) तापमान
(c) मृदा
(d) उताराची दिशा

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

 

SOLUTIONS
S1. Ans.(c)
Sol. महाराष्ट्रातील पर्जन्य :

सामान्यतः वातावरणात तापमान या घटकाचा परिणाम जास्त पहावयास मिळतो. परंतु, महाराष्ट्रातील भौगोलिक रचनेमुळे पर्जन्यात मोठ्या प्रमाणात विविधता आढळून येते. त्यामुळे भूदृश्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी असमान स्थिती निर्माण होते.

S2. Ans.(d)
Sol. आर्द्रता म्हणजे हवेतील बाष्पाचे प्रमाण.
आर्द्रता मोजण्यासाठीचे उपकरण – (hygrometer, psychrometer)
किनाऱ्याकडून पठाराकडे आर्द्रता कमी होत जाते
आर्द्रता ही तापमान वाढल्यास वाढते.
महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान हवामान उष्ण असते. तंसेच उपलब्ध
बाष्पामुळे ते दमट बनते.
जून ते ऑक्टोबर या पावसाळी काळात आर्द्रता 80 टक्के पेक्षा जास्त असते.

S3. Ans.(c)
Sol. सातमाळा पवर्तताची रांग पश्चिमेकडून पूर्वकडे जात असताना दोन रांगेत रुपांतर होते
1.उत्तरेस असणारी रांग यवतमाळ जिल्ह्यातून जाते तिला अजिंठा रांग असे म्हणतात.
2.परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या रांगेस निर्मल रांग
म्हणतात.

S4. Ans.(a)
Sol. औरंगाबाद:- 8 जिल्हे
सर्वात मोठा विभाग
औरंगाबाद, जालना, सर्वाधिक बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद
कोकण : 7 जिल्हे
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,
सिंधुदुर्ग
नागपूर:- 6 जिल्हे
वर्धा, भडारा, गोंदिया,चंद्रपूर, नागपूर,गडचिरोली
पुणे:- 5 जिल्हे
पुणे, सातारा, सोलापुर, सांगली, कोल्हापूर
नाशिक:- 5 जिल्हे
नाशिक, नगर, धुळे,नंदूरबार, जळगाव
अमरावती:- 5 जिल्हे
अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

S5. Ans.(c)
Sol. भीमा नदी:- उगम : भीमाशंकर (पुणे)
उगमाकडे भीमा नदी खोल दरीतून वाहते. पुढे तिचे पात्र रूंद होते. पंढरपूरजवळ भीमा नदीचे पात्र
चंद्रकोरीसारखे दिसते. म्हणून तिला पंढरपूरमध्ये चंद्रभागा म्हणतात. महाराष्ट्रातील दुसरे मोठे खोरे आहे.
भीमा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी – 451 किमी आहे.
भीमाशंकर पासून कर्नाटकमधील कुरगुडी पर्यंतची भिमेची एकूण लांबी 860 किमी आहे. (त्यातील 60 टके क्षेत्र महाराष्ट्रात आहे)
कर्नाटकमधील राजचूरजवळ कुरगुडी येथे भीमानदी कृष्णेला मिळते.

S6. Ans.(c)
Sol. धुळे-उत्तर महाराष्ट्रात खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला नाशिक या प्रशासकीय विभागातील जिल्हा
धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुग्ध उत्पादन होते. म्हणून धुळ्याला दुधा-तुपाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते.
धुळे शहराचा आराखडा -. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांनी निश्चित केला होता.
धुळे जिल्ह्यात चार, तालुक्यांचा समावेश -धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेड
तापी- पांझरा संगमावरील मुडावद येथील कपिलेश्वर मंदीर प्रसिद्ध.
महाराष्ट्रातील मिरचीचा मोठा बाजार धुळ्यातच भरतो.
धुळे हे दिल्ली – मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमधील शहर आहे.

S7. Ans.(b)
Sol. कृष्णा नदीचे खोरे शंभू-महादेवाचे डोंगर आणि सातमाळा-अजिंठा डोंगररांगाच्या दरम्यान नसून ते शंभूमहादेवाचा डोंगर आणि सह्याद्री पर्वताच्या दरम्यान आहे.
महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचा उतरता क्रम :
1.गोदावरी (153179चौ. किमी)
2.भिमा (46184 चौ. किमी.)
3.वर्धा (46182 चौ. किमी.)
4.वैनगंगा (38000 चौ. किमी.)
5.तापी (31200 चौ. किमी.)
6.कृष्णा (28700 चौ. किमी.)

S8. Ans.(c)
Sol. सध्या भारतात पुढील प्रकल्प सुरू आहेत.
1. दमणगंगा-पिंजाल नदीजोड प्रकल्प (महाराष्ट्र)
2. पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प (महाराष्ट्र)

3. केन-बेटवा नदी जोडप्रकल्प (मध्यप्रदेश)
4. महानदी – गोदावरी
5. मानस-सकोस-तिस्ता-गंगा नदीजोड प्रकल्प
भारतीय नदी जोड प्रकल्प :
सर्वप्रथम संकल्पना – सर ऑर्थर कॉटन.
त्यानंतर कॅप्टन दिनशा दस्तून या भारतीय व्यक्तिने ही संकल्पना मांडली.
2012 नुसार भारतातील नदीजोड प्रकल्पामध्ये 37 नद्या जोडण्यासाठी प्रस्तावित केल्या होत्या. मात्र, सध्या भारतातील 30 नद्या नदीजोड प्रकल्पासाठी प्रस्तावित आहेत.
याअंतर्गत हिमालयीन भागातील 14 नद्या व द्रिपकल्पातील पठारावरील 16 नद्यांच्या जोडणीविषयी सर्वेक्षण करण्यात आले आहे.

S9. Ans.(a)
Sol. आम्रसरी म्हणजे कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सूनपूर्व पर्जन्य होय.
कालावधी – मे महिन्यात
भारतात या काळात (मे) स्थानिक परिस्थितीनुसार कमी-जास्त दाबाचे पट्टे निर्माण होऊन मान्सूनपूर्व वारे वाहतात व त्यापासून विविध भागात पर्जन्य पडतो.
महाराष्ट्रातील कोकणात या पावसामुळे आंबे पिकविण्यास मदत होते, म्हणून स्थानिक स्तरावर या पावसाला आप्रसरी म्हणतात.
मे महिन्यात प्रचंड तापमानामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, ज्या पूर्व-मोसमी (मान्सूनपूर्व) पावसाच्या सरी पडतात. त्यालाच आम्रसरी किंवा चेरी ब्लॉसम किंवा कॉफी बहार सरी किंवा वळीवाचा
पाऊस म्हणतात.

S10. Ans.(d)
Sol. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना
महाराष्ट्राचा मोठा भाग हा पठारी प्रदेशाने व्यापला आहे.
महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने प्रा. विभागाचे उंची, प्रा. विभागाची उठाव,
प्राकृतिक विभागाची उताराची दिशा इत्यादी घटकांचा वापर केला जातो.
प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने महाराष्ट्राचे तीन विभाग केले जातात.
1. कोकण किनारपट्टी किंवा किनारपट्टीचा प्रदेश
2. सह्याद्री /उंचवट्याचा प्रदेश
3. महाराष्ट्र पठार किंवा पठारी प्रदेश

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

 

Tejaswini

Recent Posts

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…

6 hours ago

Classical Languages of India | भारतातील अभिजात भाषा | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…

7 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…

8 hours ago

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May | PDF डाउनलोड करा

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…

9 hours ago

FACT अप्रेंटीस भरती 2024, 98 पदांसाठी अधिसुचना जाहीर

FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…

9 hours ago

MPSC Shorts | Group B and C | General Knowledge | मे 2024मधील महत्त्वाचे दिवस

MPSC Shorts | Group B and C  MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

9 hours ago