Table of Contents
महाराष्ट्र पोलीस भरती 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: दि. 12 मार्च 2024 रोजी गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाने शुद्धिपत्रक जारी करून पोलीस शिपाई पदाच्या जागा 742 वरून 912 इतक्या वाढवल्या आहेत. महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. आत्तापर्यंत विविध जिल्ह्यांतील एकूण 17641 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी दिनांक 05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन
महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | महाराष्ट्र शासन, गृह विभाग |
भरतीचे नाव |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 |
पदाचे नावे |
|
रिक्त पदे | 17641 |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.mahapolice.gov.in/ |
गडचिरोली पोलीस शुद्धिपत्रक
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 व त्यानतंर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 23.06.2022 च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणानुसार पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या आस्थापनेवर सन 2022-2023 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी 742 पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्याबाबत दिनांक 01.03.2024 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती.
सदरहुन प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरातीमध्ये अंशतः फेरबदल करून शुध्दीपत्रानुसार नव्याने 912 पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महत्वाच्या तारखा | |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसूचना | 01 मार्च 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात | 05 मार्च 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
31 मार्च 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 05 मार्च 2024 रोजी सक्रीय होईल.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम भरती सूचना | |
RRB तंत्रज्ञ भरती 2024 | महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 |
सिडको भरती 2024 | पुणे महानगरपालिका भरती 2024 |