Marathi govt jobs   »   Krushi Vibhag Bharti 2023   »   कृषी विभाग वेतन 2023

कृषी विभाग वेतन 2023, पदानुसार वेतनश्रेणी आणि जॉब प्रोफाइल बद्दल माहिती

कृषी विभाग वेतन 2023

कृषी विभाग वेतन 2023: कृषी विभाग भरती 2023 अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ लिपीक व सहाय्यक अधिक्षक या संवर्गातील रिक्त पदाची भरती होणार आहे. जे उमेदवार कृषी विभाग भरती 2023 ची परीक्षा देत असेल त्याला कृषी विभाग त्यांच्या कर्मचार्‍यांना ऑफर करत असलेले कृषी विभाग वेतन 2023 याबद्दल जाणून घ्यायची उत्सुखता असेल. आज, या लेखात आपण कृषी विभाग वेतन 2023 अंतर्गत भरती होणाऱ्या सर्व पदांचे वेतन, भत्ते, मानधन, जॉब प्रोफाईल (कामाचे स्वरूप) इत्यादींबद्दल चर्चा करणार आहोत.

कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

कृषी विभाग वेतन 2023: विहंगावलोकन

या लेखात पदानुसार कृषी विभाग वेतन 2023 देण्यात आले आहे. त्यासोबतच पदानुसार कोणती कर्तव्य उमेदवारास पार पडावी लागतात याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

कृषी विभाग वेतन 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभागाचे नाव कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव कृषी विभाग भरती 2023
पदांची नावे
  • लघुटंकलेखक
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • वरिष्ठ लिपीक
  • सहाय्यक अधिक्षक
लेखाचे नाव कृषी विभाग वेतन 2023
कृषी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in

कृषी विभाग वेतन 2023: पदानुसार वेतनश्रेणी आणि जॉब प्रोफाइल

लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ लिपीक व सहाय्यक अधिक्षक या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी कृषी विभाग भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. या लेखात वरील सर्व पदास किती वेतन मिळते, त्याची वेतनश्रेणी, महाराष्ट्र शासनातर्फे मिळणारे इतर भत्ते व जॉब प्रोफाइल (कामाचे स्वरूप) याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

कृषी विभाग वेतन 2023: पदानुसार वेतन संरचना

कृषी विभाग भरती 2023 मधील सर्व पदांची वेतन संरचना खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे. 

पदाचे नाव वेतन श्रेणी
लघुटंकलेखक S8: रु. 25,500 ते रु. 81,800
लघुलेखक (निम्नश्रेणी) S15: रु. 41,800 ते रु. 1,32,300
लघुलेखक (उच्च श्रेणी) S16: रु. 44,900 ते रु. 1,42,400
सहायक अधीक्षक S13: रु. 35,400 ते रु. 1,12,400
वरिष्ठ लिपीक S8: रु. 25,500 ते रु. 81,800
Krushi Vibhag Bharti 2023
कृषी विभाग लघुटंकलेखक व लघुलेखक टेस्ट सिरीज

कृषी विभाग वेतन 2023 सोबत मिळणारे इतर भत्ते

कृषी विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणेआहेत.

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात. जसे वरिष्ठ लिपिक पदासाठी बेसिक पे 25,500 आहे तर वरिष्ठ लिपिकाची इन हॅन्ड सॅलरी (एकूण वेतन) खालीलप्रमाणे असेल. 

वेतन संरचना रु. मध्ये रक्कम
मुळ वेतन 25500
महागाई भत्ता (DA) 10710
घरभाडे भत्ता (HRA) 4590
वाहतूक भत्ता (TA) 2556
एकूण वेतन 43356

टीप: हे वेतन फक्त उदाहरण म्हणून दार्शाविण्यात आले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे, नोकरीच्या ठिकाणांनुसार यात बदल असू शकतो.

कृषी विभाग भरती 2023 अंतर्गत येणाऱ्या सर्व पदांचे जॉब प्रोफाईल

कृषी विभाग भरती 2023 मधील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ लिपीक व सहाय्यक अधिक्षक या सर्व पदांचे जॉब प्रोफाईल खालील तक्त्यात दिले आहे.

पदाचे नाव जॉब प्रोफाईल
लघुटंकलेखक
  • अधिकारी वर्गाची महत्वपूर्ण कार्याचे नियोजन करणे
  • लाघुलेखनाद्वारे मिळालेली माहिती संगणकावर टाईप करणे
  • अधिकाऱ्याने दिलेली इतर पत्रव्यवहार सांभाळणे
लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कार्यालयीन कामकाजाचे प्रतीलेखन करणे
  • लघुलेखन करणे
  • वरिष्ठ अधिकार्‍यांच्या भाषणांची नोंद करणे
  • मीटिंगच्या नोट्स तयार करणे
  • सर्व शासकीय कार्यवाही सुरळीतपणे पार पडतील याची खात्री करणे
  • आवश्यकतेनुसार इतर प्रशासकीय कामे करणे
लघुलेखक (उच्च श्रेणी)
वरिष्ठ लिपीक
  • व्यवसाय युनिटचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी वरिष्ठ क्षमतेनुसार कारकुनी कर्तव्ये पार पाडणे.
  • दैनंदिन आधारावर प्रशासकीय कार्ये अंमलात आणणे आणि पर्यवेक्षण करणे.
  • कार्यालयीन मालमत्ता आणि मालमत्तेची देखरेख आणि व्यवस्थापित करा.
  • व्यवस्थापनासाठी आर्थिक स्टेटमेन्ट आणि रेकॉर्ड तयार करा.
  • एकाधिक प्रकल्पांवर कर्मचारी व्यवस्थापित करणे
  • इतर कार्यालयीन कामकाज करणे
सहाय्यक अधिक्षक
  • प्रकल्प वेळापत्रक विकसित आणि अंमलबजावणी करणे
  • निश्चित केलेल्या वेळेनुसार आणि बजेटनुसार प्रकल्प पूर्ण झाला आहे याची खात्री करणे
  • प्रभावी प्रकल्प व्यवस्थापन करणे
  • अधीक्षकांना सहाय्य करणे
  • कार्यालयीन कामकाजावर देखरेख करणे व आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करणे
जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

कृषी विभाग भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
कृषी विभाग वेतन 2023 कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
कृषी विभाग भरती 2023 कृषी विभाग रिक्त पदे 2023
कृषी विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Krushi Vibhag Bharti
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

कृषी विभाग वेतन 2023 बद्दल माहिती मला कोठून मिळू शकते?

कृषी विभाग वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

कृषी विभागात वरिष्ठ लिपिक पदाची वेतनश्रेणी काय आहे?

कृषी विभागात वरिष्ठ लिपिक पदाची वेतनश्रेणी S8: रु. 25,500 ते रु. 81,800 ही आहे.

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला कोणते भत्ते दिले जातात?

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता इत्यादी भत्ते दिले जातील.