Categories: Latest Post

Happy Holi from Adda247 Marathi Family | Adda247 मराठी परिवारातर्फे आपणास होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी (Holi) वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते. Adda247 परिवारातर्फे आपणास व आपल्या कुटुंबास होळीच्या (Happy Holi) हार्दिक शुभेच्छा !!!

Regional Names of Holi | होळीची प्रादेशिक नावे

Regional Names of Holi: होळी (Holi) भारतभर विविध नावांनी ओळखली जाते. लठ्ठमार होळी (बरसाना), दुलंडी होळी (हरियाणा, रंगपंचमी (महाराष्ट्र), बसंत उत्सव किंवा वसंतोत्सव (पश्चिम बंगाल), डोल पौर्णिमा (पश्चिम बंगाल), होला मोहल्ला (पंजाब), शिमगो (गोवा), कमन पंडीगाई (पश्चिम बंगाल). तामिळनाडू), फागवा (बिहार) प्रत्येक प्रदेशानुसार होळीचे वेगळे नाव आहेत. पण सर्व ठिकाणी उत्साह हा सारखाच असतो.

Why we celebrate Holi in Maharashtra | होळी हा सण महाराष्ट्रात का साजरा केला जातो

Why we celebrate Holi in Maharashtra: जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी (Holi) साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे.

Adda247 Marathi App

ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लाद ला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अश्या प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी (Holi) दहन म्हणून ओळखू लागले. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.

होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो,
गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि,
रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा
जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,
शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

__________________________________________________________________

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

FAQs

When has holi celebrated in 2023?

In Maharashtra Holi has celebrated on 08 March 2023.

chaitanya

Recent Posts

4 May MPSC 2024 Study Kit | 4 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

11 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

13 hours ago

Maharashtra Police Bharti GK Weekly Quiz Compilation | Download Free PDF

Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…

14 hours ago

English Language Weekly Quiz Compilation | Download Free PDF

Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…

15 hours ago

Question of the Day (Reasoning) | आजचा प्रश्न (तर्कशक्ती)

Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…

16 hours ago

यकृत | Liver : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

16 hours ago