Marathi govt jobs   »   Job Notification   »   सैनिक कल्याण विभाग भरती 2024

सैनिक कल्याण विभाग भरती 2024, 62 पदांसाठी अधिसुचना जाहीर

सैनिक कल्याण विभाग भरती 2024

सैनिक कल्याण विभाग भरती 2024: सैनिक कल्याण विभागने दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 62 रिक्त पदे भरण्यासाठी सैनिक कल्याण विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 12 फेब्रुवारी ते 03 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण सैनिक कल्याण विभाग भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सैनिक कल्याण विभाग भरती 2024: विहंगावलोकन 

सैनिक कल्याण विभाग भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग सैनिक कल्याण विभाग
भरतीचे नाव

सैनिक कल्याण विभाग भरती 2024

पदांची नावे
 • कल्याण संघटक
 • वसतिगृह अधीक्षक
 • वसतिगृह अधीक्षिका
 • कवायत प्रशिक्षक
 • शारीरिक प्रशिक्षण निदेशक
रिक्त पदे 62
अधिकृत संकेतस्थळ https://mahasainik.maharashtra.gov.in

सैनिक कल्याण विभाग भरती 2024: अधिसुचना 

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 अधिसुचना PDF

सैनिक कल्याण विभाग भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग पदसंख्या
1 कल्याण संघटक 40
2 वसतिगृह अधीक्षक 17
3 वसतिगृह अधीक्षिका 01
4 कवायत प्रशिक्षक 01
5 शारीरिक प्रशिक्षण निदेशक 03
एकूण 62

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सैनिक कल्याण विभाग भरती 2024: महत्वाच्या तारखा
सैनिक कल्याण विभाग भरती 2024 अधिसूचना 02 फेब्रुवारी 2024
सैनिक कल्याण विभाग भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 12 फेब्रुवारी 2024
सैनिक कल्याण विभाग भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

03 मार्च 2024

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 12 फेब्रुवारी 2024 रोजी सक्रीय झाली आहे.

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

सैनिक कल्याण विभाग भरती 2024: पात्रता निकष

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 साठी पात्रता निकष खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

पदाचे नाव पात्रता निकष
कल्याण संघटक
 • ज्याची सशस्त्र दलात 15 वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात सुभेदार दर्जापेक्षा कमी नसेल अशा पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-
  • वयोमर्यादा- दि. 01.04.2024 रोजी ज्याचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नाही.
  • शैक्षणिक अर्हता- ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.
वसतिगृह अधीक्षक

वसतिगृह अधीक्षिका
 • भारताच्या सशस्त्र दलात सेवेत असताना मृत झालेल्या सैनिकाच्या पत्नी ची नियुक्ती खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य महिला उमेदवारांमधून नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-
  • वयोमर्यादा- दि. 01.04.2024 रोजी ज्याचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नाही.
  • शैक्षणिक अर्हता- ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.

परंतु असे की, सशस्त्र दलात सेवेत असताना मृत झालेल्या सैनिकाच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर या नियमाच्या पोटनियम (एक) आणि (दोन) मधील अटींची पुर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नींमधून नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यात येईल.

कवायत प्रशिक्षक
 • ज्याची सशस्त्र दलात 15 वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात सुभेदार दर्जापेक्षा कमी नसेल अशा पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे.
 • ज्यांनी संरक्षण दलातील शारिरिक प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले आहे. अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-
  • वयोमर्यादा- दि. 01.04.2024 रोजी ज्याचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नाही.
  • शैक्षणिक अर्हता- ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.
शारीरिक प्रशिक्षण निदेशक

सैनिक कल्याण विभाग भरती 2024: अर्ज शुल्क

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.

प्रवर्ग अर्ज शुल्क
अराखीव रु.1000/-
राखीव रु.900/-

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 कधी जाहीर झाली?

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 02 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 62 पदांसाठी जाहीर झाली.

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

सैनिक कल्याण विभाग भरती 2024 विविध पदांसाठी जाहीर झाली.