दिनदर्शिका (Calendar): संकल्पना, ट्रिक आणि उदाहरणे: तलाठी भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

दिनदर्शिका (Calendar)

दिनदर्शिका: कोणत्याही सरळसेवा परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी या विषयाला विशेष महत्व आहे. बुद्धिमत्ता चाचणी मधील दिनदर्शिका (Calendar) हा एक महत्वाचा घटक आहे ज्यावर कोणत्याही परीक्षेत सामान्यतः 1-2 प्रश्न विचारल्या जातात. दिनदर्शिका (Calendar) या घटकाचा सराव केल्यावर आपल्याला कमी वेळेत गुण मिळवता येतात. आगामी काळातील तलाठी, कृषी, वन, जिल्हा परिषद आणि राज्य उत्पादन शुल्क या सरळसेवा परीक्षेच्या दृष्टीने दिनदर्शिका हा एक महत्वाचा घटक आहे. या लेखात दिनदर्शिकेची संकल्पना, ट्रिक्स व संबंधित उदाहरणे दिली आहे.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

दिनदर्शिका: विहंगावलोकन

बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील दिनदर्शिका हा एक महत्वाचा टॉपिक आहे. या लेखात आगामी काळातील सरळसेवा परीक्षांच्या दृष्टीने दिनदर्शिकेच्या संकल्पना समजावून सांगण्यात आल्या आहेत.

दिनदर्शिका: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता तलाठी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय बुद्धिमत्ता चाचणी
टॉपिकचे नाव दिनदर्शिका (Calendar)
लेखातील प्रमुख मुद्दे
  • दिवस आणि आठवडा
  • विषम दिवस
  • सामान्य वर्ष व लीप वर्ष
  • दिशादर्शिका या घटकावरील प्रश्नांचे काही प्रकार व त्याची उदाहरणे

दिनदर्शिका: दिवस आणि आठवडा

आपल्याला माहिती आहे कि, एका आठवड्यात खालील 7 दिवसांचा समावेश होतो: सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे दिवस आठवडा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पुन्हा येतात.

दिनदर्शिका: विषम दिवस (ऑड डे)

पूर्ण आठवड्याची गणना केल्यानंतर उर्वरित दिवस हे विषम दिवस आहेत. 7 ने दिवसांची संख्या भागीताल्यावर जे बाकी उरते त्याला विषम दिवस असे म्हणतात. आठवड्याचे दिवस सोमवारपासून सुरू होतात. (1 जानेवारी 0001 सोमवार होता), म्हणून, 1 विषम दिवस म्हणजे सोमवार.

विषम दिवस 1 2 3 4 5 6 7 / 0
दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार

दिनदर्शिका: आठवड्यातील विषम दिवस

कोणत्याही दिवसातून 7 जोडा किंवा वजा करा, तुम्हाला तोच दिवस सापडेल. जसे 1 जुलै 2020 प्रमाणे बुध, 8 जुलै 2020 आहे?

1+7 = 8, म्हणून, 8 जुलै 2020 बुधवार आहे

दिनदर्शिका: महिन्यांतील विषम दिवस

खालील तक्त्यात वर्षातील सर्व महिन्यांचे विषम दिवस देण्यात आले आहे.

महिने दिवस विषम दिवस
जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर 31 3
फेब्रुवारी सामान्य वर्ष 28 0
फेब्रुवारी लीप वर्ष 29 1
एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर 30 2

दिनदर्शिका: सामान्य वर्ष

  • ज्या वर्षाला 4 ने भाग जात नाही ते सामान्य वर्ष आहे, तथापि, 100, 200, 1900, 2000 सारख्या शतकाच्या वर्षास 4 ने भागू नये ते लीप वर्ष आहे कि नाही हे तपासण्यासाठी 400 ने भागावे
  • म्हणजे 1900 ला 4 ने भाग जातो आणि आपल्याला ते लीप वर्ष वाटू शकते, परंतु ते शतक वर्ष आहे (शेवटचे दोन अंक 00), आपल्याला ते 400 ने भागावे लागेल. म्हणून, ते सामान्य वर्ष आहे.
  • सामान्य वर्ष = 365 दिवस = 52 आठवडे + 1 दिवस (1 विषम दिवस) फेब्रुवारी – 28 दिवस

दिनदर्शिका: लीप वर्ष

ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्यास लीप वर्ष म्हणतात.

लीप वर्ष = 366 दिवस = 52 आठवडे + 2 दिवस (2 विषम दिवस)
फेब्रुवारी – 29 दिवस

उदाहरण: खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे?
(a) 2021

(b) 2022

(c) 2023

(d) 2024

उत्तर (d)

दिनदर्शिका: वर्षाचा पहिला आणि शेवटचा दिवसाची क्लुप्ती

सामान्य वर्षात
वर्षाचा 1 ला दिवस = वर्षाचे शेवटचे दिवस
1 जानेवारी आणि 31 डिसेंबर हे एकाच दिवशी असतील
उदाहरण: 1 जानेवारी 2022 शनिवार आहे आणि 31 डिसेंबर 2022 देखील शनिवार आहे

1 जानेवारी 2023 किती असेल ?
सामान्य वर्ष शनि +1 = रविवार

लीप वर्षात
31 डिसेंबर हा 1+ 1ला जानेवारी दिवस आहे
उदाहरण 1 जानेवारी 2024 सोमवार, 31 डिसेंबर 2024 = सोमवार+1 =मंगळवार

दिनदर्शिका: समान दिवसांसह महिने

जेव्हा वर्षातील कोणत्याही दोन महिन्यांतील विषम दिवसांची संख्या ‘0’ असेल, तेव्हा त्यांच्या तारखांचा दिवस समान असेल. सामान्य वर्षात आणि लीप वर्षात समान दिवशी समान तारखा असणारा तक्ता खाली देण्यात आला आहे.

सामान्य वर्ष जानेवारी-ऑक्टोबर फेब्रुवारी-मार्च फेब्रुवारी-नोव्हेंबर मार्च-नोव्हेंबर एप्रिल-जुलै सप्टेंबर-डिसेंबर
लीप वर्ष जानेवारी-एप्रिल जानेवारी-जुलै फेब्रुवारी-ऑगस्ट मार्च-नोव्हेंबर एप्रिल-जुलै सप्टेंबर-डिसेंबर

दिनदर्शिका: 100 आणि 400 वर्षांतील विषम दिवस

दिनदर्शिकेचा अभ्यास करतांना आपल्याला हे माहिती असावे कि दर 400 वर्षानंतर दिनदर्शिकेची पुनरावृत्ती होते. उदाहरणास्तव खालील तक्त्यात तपासा. या तक्त्यात OD म्हणजे विषम दिवस आहे.

वर्षे सामान्य वर्षे लीप वर्षे विषम दिवस
2001-2100 76 (OD-76) 24 (OD-48) 76+ 48 = 124/7
(5 OD)
2101-2200 76 (OD-76) 24 (OD-48) 76+ 48 = 124/7
(5 OD)
2201-2300 76 (OD-76) 24 (OD-48) 76+ 48 = 124/7
(5 OD)
2301-2400 75 (OD-75) 25 (OD-50)
2400 शतक वर्ष एक लीप वर्ष
76+ 48 = 124/7
(5 OD)
2101- 2400
(400 वर्षे)
76+ 48 = 124/7
(5 OD)

यावरून आपण असे सांगू शकतो कि, 400 वर्षांनंतर कॅलेंडरची पुनरावृत्ती होते

1 जानेवारी 2001 – सोमवार
1 जाने 2401 सोमवार
1 जानेवारी 1601 सोमवार होता

दिशादर्शिका या घटकावरील प्रश्नांचे काही प्रकार व त्याची उदाहरणे

प्रकार 1: जेव्हा दिवस आणि महिना समान वर्ष भिन्न असतो

उदाहरण: जर 12 मार्च 2018 रविवार आहे. 12 मार्च 2022 ला कोणता दिवस असेल?

उत्तर

येथे आपण पहिले विषम दिवसांची गणना करूया

2018 नवीन वर्ष -1
2019 नवीन वर्ष -1
2020 नवीन लीप वर्ष 2
2021 नवीन वर्ष-1

विषम दिवस -5 , रविवार +5 = शुक्रवार

युक्ती: 2022- 2018 = 4 सामान्य वर्षे + 1 लीप वर्ष = 5

उदाहरण: 23 मार्च 1835 रविवार आहे. 23 मार्च 1882 ला कोणता वर असेल?

उत्तर

1882-1835 = 47 सामान्य वर्षे + 12 लीप वर्षे = 59/7 = 3 (विषम दिवस)
रविवार + 3 = बुधवार

प्रकार 2: जेव्हा तारीख आणि वर्ष एकाच महिन्यात भिन्न असतो.

उदाहरण: जर 04 मार्च 2011 रविवार आहे. 04 ऑगस्ट 2011 ला कोणता वार असेल?

उत्तर

पहिल्यांदा विषम दिवसांची गणना करा

मार्च-3, एप्रिल-2, मे-3, जून-2, जुलै-3 = 13/7 = 6 विषम दिवस
रविवार +3 = शनिवार

टीप: ऑगस्टचा विषम दिवस मोजला जाणार नाही.

प्रकार 3: जेव्हा महिना आणि वर्ष समान तारीख भिन्न असेल

उदाहरण: जर 04 मार्च 2022 शुक्रवार आहे. 30 मार्च 2022 कोणता दिवस असेल?

उत्तर

पहिल्यांदा विषम दिवसांची गणना करा

दिवसांची संख्या = 30-4 = 26 /7 = 5 विषम दिवस
शुक्रवार +5 = बुधवार

टीप : शुक्रवार (5) +5 = 10/7 = 3 (बुध)

प्रकार 4: जर तारीख, महिना, वर्ष सर्व भिन्न असेल

उदाहरण: जर 11 जुलै 2020 शनिवार आहे, 22 ऑक्टोबर 2028 ला कोणता दिवस असेल?

उत्तर

पहिल्यांदा विषम दिवसांची गणना करा

वर्षे : 2028 -2020 = वर्ष- 8 + लीप वर्ष – 2 = 10 , विषम दिवस -3
महिना : जुलै – 3, ऑगस्ट – 3, सप्टें – 2 = 8, विषम दिवस -1 ( ऑक्टोबर मोजला जाणार नाही)
तारीख : 22-11 = 11, विषम दिवस = 4
एकूण OD = 3+1+4 =8 , विषम दिवस =1

म्हणून, शनिवर +1 = रविवार

अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरतीसाठी बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित
बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित
अंकमालिका
आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा अपूर्णांक व दशांश
अक्षरमालिका शेकडेवारी
वेन आकृती वेळ आणि काम
घनाकृती ठोकळे नफा व तोटा
सांकेतिक भाषा भागीदारी
दिशा व अंतर सरासरी
रक्त संबंध (Blood Relation) मसावी व लसावी
क्रम व स्थान (Order and Ranking) वर्ग / घन व त्याचे मुळ
घड्याळ (Clock) विभाज्यतेच्या कसोट्या
गणितीय क्रिया सरळव्याज सूत्र
घातांक
चक्रवाढ व्याज

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप.

महाराष्ट्राचा महापॅक

FAQs

विषम दिवस म्हणजे काय?

पूर्ण आठवड्याची गणना केल्यानंतर उर्वरित दिवस हे विषम दिवस आहेत. 7 ने दिवसांची संख्या भागीताल्यावर जे बाकी उरते त्याला विषम दिवस असे म्हणतात.

जानेवारी महिन्यात किती विषम दिवस येतात?

जानेवारी महिन्यात 03 विषम दिवस येतात.

लीप वर्ष म्हणजे काय?

ज्या वर्षास 04 ने भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. तथापि, 100, 200, 1900, 2000 सारख्या शतकाच्या वर्षास 4 ने भागू नये ते लीप वर्ष आहे कि नाही हे तपासण्यासाठी 400 ने भागावे.

chaitanya

Recent Posts

DRDO अप्रेंटीस भरती 2024, 127 पदांसाठी अधिसुचना जाहीर

DRDO अप्रेंटीस भरती 2024 DRDO अप्रेंटीस भरती 2024: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणेने DRDO अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली…

35 mins ago

छोडो भारत चळवळ | Quit India Movement : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

38 mins ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which city overtook Beijing as Asia’s billionaire capital in 2024? (a) Mumbai (b)…

1 hour ago

महाराष्ट्र दिन 2024 | Maharashtra Day 2024 : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

महाराष्ट्र दिन 2024 Maharashtra Din 2024 : 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या दिवसाचे  महत्व अधोरेखित करत दरवर्षी…

2 hours ago

क्रम व स्थान | Order and location : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

क्रम व स्थान बुद्धिमत्ता चाचणी विभागात क्रम व स्थान (ऑर्डर आणि रँकिंग) विषय हा सर्वात महत्त्वाचा आणि गुण मिळवणारा विषय…

2 hours ago

Police Bharti 2024 Shorts | दशमान परिमाणे | Decimal dimensions

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

3 hours ago