Daily Current Affairs In Marathi-6 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-6 जुलै 2021

 

दैनिक चालू घडामोडी: 6 जुलै 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 6 जुलै 2021चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

राष्ट्रीय बातम्या

  1. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘निपुण भारत’ कार्यक्रम सुरु करण्यात आला

  • केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी 2026-27 पर्यंत इयत्ता तिसरीपर्यंत भारतातील सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान (एफएलएन) अवगत व्हावे या उद्देशाने “निपुण भारत” हा उपक्रम सुरु केला आहे.
  • निपुण म्हणजे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफीशिअंन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी (आकलानासाहित वाचनकौशल्य आणि अंकज्ञान विकासाकारिता राष्ट्रीय उपक्रम).
  • समग्र शिक्षा अभियानाचा भाग असलेला हा उपक्रम शालेय पायाभूत वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणे आणि त्यांना शाळेत राखणे, शिक्षक क्षमता वृद्धी, उच्च दर्जाचे आणि वैविध्यपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक यांना उपयुक्त संसाधने आणि शिक्षण सामग्रीचा विकास आणि प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती तपासणे या उद्देशाने सुरु करण्यात आला आहे.
  • शालेय शिक्षणाच्या विविध टप्प्यांमधील सेवेत असणाऱ्या शिक्षकांच्या प्रशिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने एनसीईआरटीने निष्ठा (नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कुल हेड्स अँड टीचर्स हॉलिस्टिक ऍडव्हान्समेंट अर्थात शाळा मुख्याधापक आणि शिक्षकांच्या परिपूर्ण विकासाकरिता राष्ट्रीय उपक्रम)  नावाचा एक नाविन्यपूर्ण आणि एकात्मिक कार्यक्रम सुरु केला आहे.

 

2. आदिवासींच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी केव्हीआयसी ने ‘बोल्ड’ प्रकल्प सुरु केला

  • केव्हीआयसी (खादी व ग्रामोद्योग आयोग) ने “बीओएलडी: बांबू ओएसिस ऑन लँड्स इन ड्रॉट” नावाचा अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम सुरु केला आहे.
  • या उपक्रमाद्वारे शुष्क आणि अर्ध-शुष्क जमिनीवर बांबूची लागवड करून वनीकरण केले जाणार आहे. भारतात प्रथमच होणाऱ्या या प्रयोगाची सुरुवात राजस्थानातील उदयपुर जिल्ह्यातील निचला मांडवा या आदिवासी खेड्यातून होणार आहे.
  • या प्रकल्पांतर्गत बांबूसा तुळदा आणि बांबूसा पॉलिमॉर्फा या बांबू प्रजातींच्या 5000 रोपट्यांची लागवड ग्राम पंचायतीच्या सुमारे 16 एकर जागेवर करण्यात आली आहे.
  • बांबू ही बारमाही सदाहरित वनस्पती असून तिची वर्गवारी वनस्पतींमध्ये न होता गवत या प्रकारात केली जाते. देशातील एकूण उत्पादनापैकी 70% उत्पादन ईशान्य भारतातील राज्यांमध्ये केले जाते.

बांबूचीच निवड का करण्यात आली? 

  • बांबूची वाढ वेगाने होते आणि 3 वर्षांत त्याची कापणी करता येते.
  • ते जलसंवर्धन वाढविण्यासाठी आणि बाष्पीभवन करण्यासाठी प्रसिद्ध असून शुष्क प्रदेशांकरिता वरदान ठरू शकतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • केव्हीआयसीची स्थापना: 1956
  • केव्हीआयसी मुख्यालय: मुंबई
  • केव्हीआयसी अध्यक्ष: विनय कुमार सक्सेना

 

नियुक्ती बातम्या

3. राष्ट्रपती कोविंद यांनी आठ राज्यांसाठी नवीन राज्यपालांची नेमणूक केली

  • भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, त्रिपुरा, झारखंड, मिझोरम आणि हिमाचल प्रदेश या आठ या राज्यांकरिता नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. तसेच काही राज्यपालांची बदलीदेखील केली आहे.

नवीन राज्यपालांची पूर्ण यादीः

क्र. राज्य नवीन राज्यपाल
1 कर्नाटक थावरचंद गेहलोत
2. मध्यप्रदेश मंगूभाई छगनभाई पटेल
3. मिझोरम डॉ. हरी बाबू कंभपती
4. हिमाचल प्रदेश राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
5. गोवा पी.एस. श्रीधरन पिल्लई
6. त्रिपुरा सत्यदेव नारायण आर्य
7. झारखंड रमेश बैस
8. हरयाणा बंडारू दत्तात्रय

 

पुरस्कार बातम्या

4. 52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तव (आयएफएफआय) नोव्हेंबर 2021 मध्ये गोव्यात  पार पडणार

  • भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तवाची (आयएफएफआय) 52 वी आवृत्ती 20 ते 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान गोवा येथे आयोजित केली जाणार आहे.
  • माननीय माहिती व प्रसारण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी 52 व्या आयएफएफआयचे नियमावली व भित्तीपत्राचे अनावरण केले.
  • भारतीय चित्रपटातील महान दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त “सत्यजित रे लाइफटाइम अचिव्हमेंट अवार्ड फॉर एक्सलन्स इन सिनेमा” हा पुरस्कार या वर्षापासून सुरु करण्यात आला असून दरवर्षी आयएफएफआयमध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

बँकिंग बातम्या

5. आरबीआयने सरकारी कर्जरोख्यांच्या लिलाव पद्धतीमध्ये केला बदल

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी कर्जरोख्यांच्या लिलाव पद्धतीमध्ये बदल जाहीर केला आहे.
  • यापुढे एकसमान किंमत लिलाव पद्धतीचा वापर करून 2-वर्ष, 3-वर्ष, 5-वर्ष, 10-वर्ष, 14-वर्षे  कालावधीचे आणि अस्थायी दर रोखे [फ्लोटिंग रेट बाँड (एफआरबी)] कर्जरोख्यांची विक्री करण्यात येईल.
  • इतर स्थिरमुदत कर्जरोखे जसे 30 वर्ष आणि 40 वर्ष मुदतीच्या कर्जरोख्यांचा  यापुर्वीप्रमाणेच बहुविध किमतींवर आधारित पद्धतीने लिलाव केला जाईल.
  • एकसमान किंमत लिलाव पद्धत: यामध्ये सर्व यशस्वी निविदाधारकांनी नियत कर्जरोखे एकस्मान्र दराने म्हणजेच लिलावाच्या कट-ऑफ दराने विकत घेणे आवश्यक आहे, त्यांनी कोणत्या दराची बोली लावली होती हे विचारात घेतले जाट नाही.
  • बहुविध किमत लिलाव पद्धत: या मध्ये यशस्वी निविदाधारकांनी नियत कर्जरोखे ज्या दराला बोली लावली होती त्या दराला विकत घेणे आवश्यक आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • आरबीआयचे 25 वे गव्हर्नर: शक्तीकांत दास
  • मुख्यालय: मुंबई
  • स्थापना: 1 एप्रिल 1935, कोलकाता

 

करार बातम्या

6. कॅश-ऑन-डिलिव्हरी देयके डिजीटल करण्यासाठी फ्लिपकार्ट आणि फोन-पे यांच्यात करार

  • फ्लिपकार्टच्या वितरणानंतरच्या ऑर्डर्सच्या नगद स्वरूपातील देयकांसाठी (पे-ऑन डिलीव्हरी) संपर्कहीन देयकांचे ‘स्कॅन अँड पे’ सुविधा सुरु करण्याच्या उद्देशाने फ्लिपकार्ट ने फोन-पे समवेत भागीदारी करार केला आहे.
  • फोन-पे च्या क्यूआर कोड सुविधेचा वापर करून फ्लिपकार्ट ग्राहक ज्यांनी यापूर्वी रोख स्वरुपात देयके देण्याचा पर्याय निवडला होता त्यांना आता वितरणानंतर कोणत्याही यूपीआय अ‍ॅपद्वारे डिजीटल पद्धतीने बिल भरू शकतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • फ्लिपकार्ट मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक
  • फ्लिपकार्ट सीईओ: कल्याण कृष्णमूर्ती
  • फोनपे चे सीईओ: समीर निगम
  • फोनपेचे मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक

 

समित आणि कॉन्फरन्स बातम्या

7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक को-विन बैठकीचे उद्घाटन केले

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक को-विन बैठकीचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. या बैठकीला 142 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
  • को-विन डिजिटल व्यासपीठाला संपूर्ण जगासाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू), परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (एमईए) आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) संयुक्तपणे पणे केले होते.
  • भारताने आपले स्वदेशी विकसित क्लाउड-आधारित कोविन  व्यासपीठ मुक्त-स्त्रोत बनविण्याचा प्रस्ताव दिला आहे जेणेकरून तो कोणत्याही देशाला वापरता येईल.

 

संरक्षण बातम्या

8. डीआरडीओने विकसित केलेली 10 मीटर पूल बांधणी यंत्रणा लष्करात दाखल

  • संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ने लार्सन अँड टुब्रो लिमिटेड या उत्पादन कंपनीच्या सहकार्याने विकसित केलेल्या 12 शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम (एसएसबीएस) -10 मीटर ची पहिली तुकडी लष्करात दाखल झाली आहे.
  • या यंत्रणेमुळे लष्कराला अतिकठीण व दुर्गम भागातून सैन्याची वेगवान हालचाल सुनिश्चित करता येणार आहे.
  • ही ब्रिजिंग सिस्टम (जोडणी यंत्रणा) सर्वत्र ब्रिजिंग सिस्टम (75 मी) सह सुसंगत आहे, जिथे शेवटच्या कालावधीत 9.5 मीटर पेक्षा कमी अंतराच्या जागा भरणे आवश्यक असते. यापूर्वी देखील डीआरडीओ ने विविध प्रकारच्या ब्रिजिंग सिस्टम (जोडणी यंत्रणा) लष्कराला दिल्या आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • डीआरडीओ चे अध्यक्ष: जी. सतीश रेड्डी
  • डीआरडीओ मुख्यालय: नवी दिल्ली
  • डीआरडीओ स्थापना: 1958

 

क्रीडा बातम्या

9. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून मेरी कोम आणि मनप्रीत सिंग यांची निवड

  • टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात सहा वेळा जागतिक मुष्टियोद्धा अजिंक्यपद विजेती एमसी मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे दोघे भारताचे ध्वजवाहक होणार असल्याची घोषणा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) केली.
  • 2018 च्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता बजरंग पुनिया 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असेल.
  • “लिंग समानता” दर्शविण्यासाठी भारताने पहिल्यांदाच दोन खेळाडूंना (एक पुरुष आणि एक स्त्री) ध्वजवाहक म्हणून नेमले आहे.

 

10. जेम्स अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 वा बळी घेतला

  • इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 बळी पूर्ण केल्यामुळे त्याच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे.
  • अँडरसनने मॅनचेस्टरमध्ये केंट विरुद्ध लँकशायरच्या काउंटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सामन्यात ही दुर्मिळ कामगिरी केली. अँडरसन या शतकात 1000 प्रथम श्रेणी बळी मिळविणारा 14 वा आणि 5 वा वेगवान गोलंदाज आहे.
  • सध्या कसोटीतील जगातील सर्वाधिक (617) बळी त्याच्या नावावर आहेत. अँडरसनच्या अगोदर अँडी कॅडिक, मार्टिन बिक्नल, डेव्हन मॅल्कम आणि वसीम अक्रम या चार वेगवान गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.

 

11. वॅको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनला भारत सरकारची मान्यता

  • केंद्रीय युवा कामकाज आणि क्रीडा मंत्रालयाने भारतात किकबॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विकास करण्यासाठी वॅको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनला राष्ट्रीय क्रीडा महासंघ (एनएसएफ) म्हणून मान्यता दिली आहे.
  • वॅकोला 30 नोव्हेंबर 2018 पासून आयओसीची तात्पुरते मान्यता प्राप्त असून टोकियो मधील 2021 च्या आयओसीच्या अधिवेशनात वॅकोला पूर्ण आणि अधिकृत मान्यता मिळणे अपेक्षित आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • केंद्रीय युवा कामकाज आणि क्रीडा मंत्री: किरेन रिजिजू

 

पुस्तके आणि लेखक

12. ‘द फोर्थ लायन: एसेज फॉर गोपाळकृष्ण गांधी’ हे पुस्तक प्रसिद्ध

  • वेणू माधव गोविंदू आणि श्रीनाथ राघवन यांनी संपादित केलेले ‘द फोर्थ लायन: एसेज फॉर गोपाळकृष्ण गांधी’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले.
  • या पुस्तकात विविध क्षेत्रातील आणि जगभरातील व्यक्तींनी गोपाळकृष्ण गांधी यांच्यासाठी लिहिलेल्या 26 निबंधांचा समावेश आहे.
  • गोपालकृष्ण गांधी चार दशकांहून अधिक काळ प्रशासकीय अधिकारी, मुत्सद्दी, लेखक आणि सार्वजनिक विचारवंत म्हणून काम करत आहेत.

 

महत्वाचे दिवस

13. 6 जुलै: जागतिक पशुजन्य रोग दिवस

  • पशुजन्य रोगांच्या जोखमीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 6 जुलै रोजी जागतिक पशुजन्य रोग दिवस पाळला जातो.
  • झुनोसेस हे संसर्गजन्य रोग (विषाणू, जीवाणू आणि परजीवी) आहेत जे प्राण्यांपासून मानवापर्यंत पसरतात किंवा मानवाकडून प्राण्यांकडे संक्रमित होतात.
  • याच दिवशी 6 जुलै 1885 रोजी प्रथमच लुई पाश्चरने रेबीज विषाणू विरूद्ध लस यशस्वीरित्या दिली जो एक पशुजन्य रोग आहे. या दिवसाची आठवण म्हणून 6 जुलै हा दिवस जागतिक पशुजन्य रोग दिवस म्हणून पाळला जातो.

 

विविध बातम्या

14. डीआरडीओ ने लॉरस लॅबला 2-डीजी बनविण्याचा आणि वितरणाचा परवाना दिला

  • हैदराबादमधील औषधनिर्माण कंपनी लॉरस लॅबसने कोव्हीड-19 विरोधी औषध 2-डीओक्सी-डी-ग्लूकोज 2-डीजी बनविण्याचा आणि वितरणाचा परवाना संरक्षण संशोधन व विकास संघटनेकडून (डीआरडीओ) प्राप्त केला आहे.
  • डीआरडीओने अलीकडेच इतर औषध कंपन्यांकडून हे औषध तयार करण्यासाठी अर्ज मागवून घेतले होते आणि ते 15 कंपन्यांना असा परवाना देणार आहेत.
  • दरम्यान, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (सीएसआयआर-आयआयसीटी) ली फार्मा, सुवेन फार्मा, अँथम बायोसायन्स आणि नॉश लॅबसमवेत इतर कंपन्यांना 2-डीजी संश्लेषणाचा परवाना देणार आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Tejaswini

Recent Posts

भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024, अधिसुचना डाउनलोड करा

भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024 भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024: भारतीय नौदलाने भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024…

13 mins ago

तुम्हाला “संगर” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

53 mins ago

Do you know the meaning of Expunge? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

2 hours ago

Current Affairs in Short (07-05-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

राष्ट्रीय बातम्या: • नीरज चोप्रा यांच्या ऍथलेटिक प्रवासावरील त्यांच्या स्पष्टीकरण पृष्ठासाठी 6व्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र डिझाइन स्पर्धेत द हिंदूने तीन पुरस्कार…

2 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

18 hours ago

6 May MPSC 2024 Study Kit | 6 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

18 hours ago