Daily Current Affairs In Marathi-22 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जून 2021

 

दैनिक चालू घडामोडी:  22 जून 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 22 जून 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ‘एमयोगा’ अ‍ॅपचे लोकार्पण
  • 21 जून 2021 रोजी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमयोगा मोबाइल अ‍ॅपचे अनावरण केले. या अ‍ॅपची निर्मिती जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि आयुष मंत्रालयाने केली आहे.
  • सध्या, हे अ‍ॅप इंग्रजी, हिंदी आणि फ्रेंच भाषेत उपलब्ध आहे, परंतु येत्या काही महिन्यांत संयुक्त राष्ट्रांच्या इतर भाषांमध्ये उपलब्ध होईल. या उपक्रमाद्वारे ‘एक जग, एक आरोग्य’ साध्य करणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे

 

2. 2016 च्या विमुद्रिकरणादरम्यान गृहिणींनी जमा केलेल्या रकमेवर कोणताही कर नाही 

  • आयकर अपीलीय न्यायाधिकरण (आयटीएटी), आग्रा खंडपीठाचे न्यायिक सदस्य ललित कुमार आणि लेखापाल सदस्य डॉ. मीठालाल मीना यांनी असा निर्णय दिला की 2016 च्या विमुद्रिकरणादरम्यान जर गृहिणींनी बँकेत रु.2,50,000 पेक्षा कमी रक्कम जमा केली असेल तर ती रक्कम निर्धारकाचे उत्पन्न मानले जाणार नाही आणि त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही.

 

राज्य बातम्या

3. बिहार सरकारने ‘मुख्यमंत्री उद्यमी योजना’ सुरु केली

  • बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘मुख्यमंत्री युवा उद्यमी योजना’ आणि ‘मुख्‍यमंत्री महिला उद्यमी योजना’ या नावाने दोन महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. या दोन योजना ‘मुख्यमंत्री उद्यमी योजनेच्या भाग आहेत आणि याचा उद्देश महिला आणि तरुणांमध्ये उद्योजकता वाढविणे हा आहे.
  • स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असणाऱ्या सर्व गटातील युवा आणि महिलांना, रु.10 लाखांचे कर्ज देण्यात येईल ज्यातील रु.5 लाख राज्याकडून अनुदानाच्या स्वरुपात असतील आणि रु.5 लाख कर्जाच्या स्वरुपात जे 84 हफ्त्यांमध्ये फेडायचे आहे. या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी एका पोर्टलची देखील सुरुवात करण्यात आली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • बिहारचे मुख्यमंत्री: नितीशकुमार
  • राज्यपाल: फागु चौहान

नियुक्ती बातम्या

4. ताडंग मिनू बनल्या एआयबीएमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या अरुणाचल प्रदेशच्या महिला

  • आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या (एआयबीए) प्रशिक्षक समितीच्या सदस्य म्हणून नियुक्त होणाऱ्या डॉ. तडंग मिनु या अरुणाचल प्रदेशमधील पहिल्या आणि देशातील दुसऱ्या महिला ठरल्या आहेत.
  • डॉ. तडंग सध्या राजीव गांधी विद्यापीठात (आरजीयू) शारीरिक शिक्षणा विभागाच्या प्रमुख आहेत आणि मागील दोन वर्षांपासून बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • एआयबीए स्थापना: 1946
  • एआयबीए मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड
  • एआयबीए अध्यक्ष: डॉ. मोहम्मद मौस्ताहसने

 

5. ब्रिटिश वकील करीम खान यांनी आयसीसीचे मुख्य अधिवक्ता म्हणून शपथ ग्रहण केली

  • आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे नवे मुख्य वकील म्हणून शपथ घेतली करीम खान यांनी शपथ घेतली. आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांनी यापूर्वी लायबेरियाचे माजी अध्यक्ष चार्ल्स टेलर आणि केनियाचे उपराष्ट्रपती विल्यम रुटो यांसारख्या लोकांचे फिर्यादी म्हणून काम पाहिले आहे.
  • त्यांनी आपला 9 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या गॅम्बियाच्या फातू बेनसौदाकडून पदभार स्वीकारला.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना: 1 जुलै 2002
  • आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे मुख्यालय: हेग, नेदरलँड्स
  • आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची सदस्यसंख्या: 123
  • आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या कार्यालयीन भाषा: इंग्रजी आणि फ्रेंच

 

6. उपासना कामिनी यांची डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया येथे ‘अ‍ॅम्बेसेडर ऑफ फॉरेस्ट फ्रंटलाइन हिरो’ म्हणून निवड

  • डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाने रुग्णालयांमध्ये आणि वन्यजीव संरक्षणाच्या जागांमधील अग्रगामी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याच्या उद्देशाने अपोलो हॉस्पिटलच्या संचालिका, उपासना कामिनी यांना “फॉरेस्ट फ्रंटलाइन हिरोंचे राजदूत” म्हणून नियुक्त केले आहे.
  • अग्रगामी वन कर्मचारी बहुदा स्थानिक समुदायाचे सदस्य असतात जे समुदाय आणि संवर्धन दरम्यान दुवा तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया मुख्यालय: नवी दिल्ली
  • डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया स्थापना: 1969

 

पुरस्कार बातम्या

7. सुमिता मित्रा यांचा प्रतिष्ठित युरोपियन संशोधक पुरस्काराने सन्मान

  • भारतीय-अमेरिकी रसायनशास्त्रज्ञ सुमिता मित्रा यांना ‘नॉन-युरोपियन पेटंट ऑफिस देश’ प्रकारात युरोपियन संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी पहिल्यांदा दंतक शास्त्रातील पदार्थांमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक मजबूत आणि सुशोभित फिलिंग्स तयार केले आहेत.
  • हा पुरस्कार युरोपियन पेटंट कार्यालयामार्फत दरवर्षी अभूतपूर्व संशोधनाला देण्यात येतो.

 

रँक आणि अहवाल बातम्या

8. 2020 मध्ये परकीय थेट गुंतवणूक मिळविण्याच्या बाबतीत भारत जगात 5 वा: युएन अहवाल

  • युएन व्यापार आणि विकास परिषद (यूएनसीटीएडी) ने प्रकाशित केलेल्या जागतिक गुंतवणूक अहवाल 2021 नुसार 2020 मधील परकीय थेट गुंतवणूकीच्या प्रवाहामध्ये भारत जगात 5 वा सर्वात मोठा प्राप्तकर्ता ठरला आहे.
  • 2020 मध्ये देशात 64 अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) झाली जी 2019 च्या 51 अब्ज डॉलर पेक्षा 27% अधिक आहेत. 2020 मध्ये जागतिक एफडीआय 35% ने घसरून 2019 च्या 1.5 ट्रिलियन डॉलर वरून 1 ट्रिलियन डॉलर झाला आहे.
  1. अमेरिका – 156 अब्ज डॉलर्स (2019 च्या तुलनेत 40% घट)
  2. चीन – 149 अब्ज डॉलर्स

 

करार बातम्या

9. 5 जी नेटवर्क सोल्यूशन्ससाठी टीसीएस आणि एअरटेल ची भागीदारी

  • भारती एअरटेल आणि टाटा समूहाने भारतासाठी 5 जी नेटवर्क सोल्युशनची अंमलबजावणी करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे, जी जानेवारी 2022 पासून व्यावसायिक वापरासाठी  उपलब्ध होईल.
  • टाटा समूहाने ओ-आरएएन (ओपन रेडिओ ऍक्सेस नेटवर्क) आधारित रेडिओ आणि नॉन-स्टँडअलोन आर्किटेक्चर / स्टँड-अलोन आर्किटेक्चर (एनएसए / एसए) कोर विकसित केले आहे आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीचे टेलिकॉम स्टॅक विकसित केले आहे ज्यामुळे समूहाला आणि त्याच्या भागीदारांना फायदा मिळणार आहे.
  • एनएसए / एसए हे रेडिओ तंत्रज्ञान 5-जी रेडिओचे सिग्नलिंग नियंत्रित करते. एनएसए 5 जी ते 4 जी कोर पर्यंत सिग्नलिंग नियंत्रित करू शकतो मात्र एसए 5 जी रेडिओशी थेट जोडू  शकतो. एअरटेल या तंत्रज्ञानाचा वापर करून जानेवारी 2022 पासून 5 जी नेटवर्क ची सुरुवात करेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी: गोपाल विट्ठल
  • भारती एअरटेलचे संस्थापक: सुनील भारती मित्तल
  • भारती एअरटेलची स्थापना: 7 जुलै 1995
  • टाटा समूहाचे अध्यक्ष: नटराजन चंद्रशेखरन
  • टाटा ग्रुपचे मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र

 

पुस्तके आणि लेखक

10. ताहिरा कश्यप खुराना यांनी ‘द सिन्स ऑफ बियिंग मदर’ या नवीन पुस्तकाची घोषणा केली

  • फिल्ममेकर-लेखिका ताहिरा कश्यप खुराना यांनी मातृत्वाबद्दलच्या त्यांच्या आगामी पुस्तकाची घोषणा केली आहे ज्याचे नाव आहे ‘द सिन्स ऑफ बियिंग मदर’.
  • हे त्यांचे पाचवे पुस्तक आहे. त्यांची इतर पुस्तके – ’12 कमांडमेंटस ऑफ बियिंग वूमन’ , ‘  क्रॅकींग द कोड: माय जर्नी इन बॉलिवूड’ , ‘सोल्ड आऊट’ इत्यादी

 

 

क्रीडा बातम्या

11. भारोत्तलनपटू लॉरेल हबबर्ड ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा पहिला ट्रान्स खेळाडू 

  • न्यूझीलंडचा भारोत्तलनपटू लॉरेल हबबर्ड हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा पहिला ट्रान्स अ‍ॅथलीट असेल. 43 वर्षीय लॉरेल हबबर्ड ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा चौथा सर्वात वयोवृद्ध  भारोत्तलनपटू असणार आहे. त्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 87 किलोपेक्षा अधिक वजनाच्या हेविवेट गटातील विजयाच्या प्रमुख दावेदार मानल्या जातात.

 

संरक्षण बातम्या

12. भारत आणि जपान यांच्यात हिंद महासागरात द्विपक्षीय नौदल सराव 

  • मुक्त आणि खुला इंडो-पॅसिफिक (एफओआयपी) संकल्पना साकार करण्याच्या उद्देशातून भारतीय नौदल आणि जपानी मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स (जेएमएसडीएफ) यांच्यात हिंद महासागरात “जीमेक्स-2020” हा संयुक्त नौदल सराव पार पडला. ती या सरावाची चौथी आवृत्ती होती.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • जपानची राजधानी: टोकियो
  • जपानचे चलन: जपानी येन
  • जपानचे पंतप्रधान: योशीहिडे सुगा

 

महत्वाचे दिवस

13. 21 जून: जागतिक मानवतावादी दिन

  • जागतिक मानवतावाद दिन दरवर्षी वसंत अयन दिनाच्या आसपास साजरा केला जातो जो दरवर्षी साधारण 21 जूनला येतो. आंतरराष्ट्रीय मानवतावादी आणि नैतिकतावादी  संघटना (आयएचईयू) 1980 पासून हा दिवस आयोजित करीत आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आंतरराष्ट्रीय मानवतावादी आणि नैतिकतावादी संघटनेचे अध्यक्ष: अँड्र्यू कॉप्सन
  • आंतरराष्ट्रीय मानवतावादी आणि नैतिकतावादी संघटनेची स्थापना: 1952
  • आंतरराष्ट्रीय मानवतावादी आणि नैतिकतावादी संघटनेचे मुख्यालय: लंडन, युनायटेड किंगडम

 

14. 21 जून: जागतिक जलविज्ञान दिवस

  • जलविज्ञानाचे मानवाच्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी जागतिक जलविज्ञान दिवस (वर्ल्ड हायड्रोग्राफी दिवस) पाळला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून 2005 रोजी जागतिक जलविज्ञान दिन साजरा करण्याचा ठराव मान्य केला.
  • 2006 पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संघटना (आयएचओ) द्वारे जलवैज्ञानिकांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी व जलविज्ञानाचे महत्त्व प्रसिद्ध करण्यासाठी तसेच आयएचओ चे कार्य जगभर पोहोचविण्यासाठी आयोजित केला जातो.
  • 2021 ची संकल्पना: ” जलविज्ञानातील आंतरराष्ट्रीय सहकार्याची 100 वर्षे ”

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संस्था स्थापना: 21 जून 1921
  • आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संस्था मुख्यालय: माँटे कार्लो, मोनाको
  • आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संस्थेचे सरचिटणीस: डॉ. मॅथिस जोनास

 

विविध बातम्या

15. सेबीने चार सदस्यीय अधिग्रहण गटाची पुनर्स्थापना केली

  • भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) ने चार सदस्यीय अधिग्रहण गटाची पुनर्स्थापना केली आहे. हे अधिग्रहण पॅनेल अशा अर्जांची छाननी करेल जे अधिग्रात्याला अल्पसंख्यांक भागधारकांना सक्तीची खुली ऑफर देण्यापासून सूट मिळण्यासाठी अर्ज करत आहेत.यापूर्वी असा गट सेबी ने 2007 साली माजी बँक ऑफ बडोदाचे अध्यक्ष के.कानन यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केला होता.
  • अध्यक्ष: न्यायमूर्ती एन. के. सोधी (कर्नाटक आणि केरळमधील उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायाधीश आणि प्रतिभूती अपीलीय न्यायाधिकरणाचे माजी पीठासीन अधिकारी) सदस्य: डेरियस खंबाटा, थॉमस मॅथ्यू टी, एन वेंकट्राम

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) स्थापना: 12 एप्रिल 1992
  • भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) मुख्यालय : मुंबई, महाराष्ट्र
  • भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) अध्यक्ष: अजय त्यागी

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मराठी मध्ये मासिक चालू घडामोडी, Download करा 

Tejaswini

Recent Posts

4 May MPSC 2024 Study Kit | 4 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

9 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

11 hours ago

Maharashtra Police Bharti GK Weekly Quiz Compilation | Download Free PDF

Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…

12 hours ago

English Language Weekly Quiz Compilation | Download Free PDF

Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…

13 hours ago

Question of the Day (Reasoning) | आजचा प्रश्न (तर्कशक्ती)

Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…

14 hours ago

यकृत | Liver : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

14 hours ago