Daily Current Affairs In Marathi-15 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-15 जुलै 2021

दैनिक चालू घडामोडी: 15   जुलै 2021

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 15 जुलै 2021चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या

 1. एनटीपीसी कच्छ मध्ये भारतातील सर्वात मोठे सौर उर्जा पार्क उभारणार

  • एनटीपीसी मर्या. गुजरातच्या कच्छ प्रांतातील खवडा येथे देशातील सर्वात मोठा सौर फोटोव्होल्टिक प्रकल्प उभारणार आहे.
  • सौर उर्जा पार्कची क्षमता 4.75 गिगावाट (जीडब्ल्यू) / 4750 मेगावॅट असून हा प्रकल्प एनटीपीसीची नूतनीकरणयोग्य उर्जा कंपनी, एनटीपीसी नूतनीकरण ऊर्जा (एनटीपीसी-आरईएल) च्या माध्यमातून उभारला जाणार आहे.
  • हा प्रकल्प एनटीपीसीचा स्वत:ला हरित उर्जा निर्मिती क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठी असून हा प्रकल्प 2032 पर्यंत 60 जीडब्ल्यू उर्जा निर्माण करणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • एनटीपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: श्री गुरदीपसिंग
  • एनटीपीसीची स्थापना: 1975
  • एनटीपीसी मुख्यालय: नवी दिल्ली, भारत

 

 2. राष्ट्रीय आयुष मिशन योजना सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली

  • पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र पुरस्कृत ‘राष्ट्रीय आयुष मिशन (एनएएम)’ योजना पुढील पाच वर्षे सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. ही योजना आता 01 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
  • आयुष मंत्रालयद्वारा राबविले जाणारे राष्ट्रीय आयुष मिशन 15 सप्टेंबर 2014 रोजी सुरू करण्यात आले.
  • या मिशन चा उद्देश आयुर्वेद, सिद्ध, सोवा रिग्पा, युनानी आणि होमिओपॅथी (एएसयू आणि एच) या प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक पद्धतींचा विकास करणे आणि त्यांबद्दल जनजागृती करणे हा या मिशन चा उद्देश आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आयुष मंत्री: सर्वानंद सोनोवाल

 

 3. गुरुग्राममध्ये भारताचे पहिले ‘धान्य एटीएम’ उघडण्यात आले

  • बँकेच्या एटीएमप्रमाणेच कार्य करणारे एक स्वयंचलित उपकरण ‘धान्य एटीएम’ म्हणून वापरण्यास प्रायोगिक तत्त्वावर हरियाणाच्या गुरुग्राममध्ये सुरुवात करण्यात आली आहे.
  • हे उपकरण संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन)’जागतिक अन्न कार्यक्रमांतर्गत’ स्थापित केले असून त्याला ‘स्वयंचलित, बहु-सामग्री, धान्य वितरण उपकरण’ म्हणतात.
  • हे स्वयंचलिJत उपकरण टच स्क्रीन व बायोमेट्रिक प्रणालीसह सुसज्ज असून  लाभार्थीला आधार किंवा रेशन कार्ड क्रमांक प्रदिष्ट करावा लागेल.
  • बायोमेट्रिक प्रमाणीकरणानंतर , सरकारने लाभार्थ्यांना नेमून दिलेला अन्नधान्यवाटा मशीन अंतर्गत बसविलेल्या पिशव्यांमध्ये आपोआप भरला जाईल.
  • गहू, तांदूळ आणि बाजरी असे तीन प्रकारचे धान्य या यंत्राद्वारे वाटले जाऊ शकते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • हरियाणा राजधानी: चंदीगड
  • हरियाणाचे राज्यपाल: बंडारू दत्तात्रेय
  • हरियाणाचे मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर

 

राज्य बातम्या 

 4. 2025 पर्यंत केंद्रशासित प्रदेश सेंद्रिय बनण्यासाठी लडाख ने सिक्कीम सह सामंजस्य करार केला

  • केंद्रशासित प्रदेश सेंद्रिय बनण्यासाठी लडाख ऑरगॅनिक, लडाख प्रशासन आणि सिक्कीम राज्य सेंद्रिय प्रमाणपत्र संस्था (एसओसीसीए) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  • या सामंजस्य कराराचा 2025 पर्यंत परंपरागत कृषी सिंचाई योजना आणि मिशन ऑरगॅनिक डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (एमओडीआय) या योजनांच्या साहय्याने लडाखला संपूर्ण सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा उद्देश आहे.
  • सिक्कीम हे पूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • लडाखचे राज्यपाल आणि प्रशासक: राधा कृष्ण माथूर

 

नियुक्ती बातम्या 

 5. पियुष गोयल यांची राज्यसभेच्या सभागृहनेते पदी नियुक्ती

  • केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची राज्यसभेतील सभागृहनेतेपदी नियुक्ती 06 जुलै 2021 पासून करण्यात आली आहे.
  • कर्नाटकचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या थावरचंद गहलोत यांची ते जागा घेतील. सभागृहनेते सरकारच्या सभा आणि कामकाजाचे आयोजन करण्यासाठी जबाबदार असतात.

 

अर्थव्यवस्था बातम्या

 6. आरबीआयने ‘रिटेल डायरेक्ट’ योजना सुरु केली

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ‘आरबीआय रिटेल डायरेक्ट’ योजना सुरू केली असून त्याद्वारे ते प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही सरकारी कर्जरोख्यांची (जी-सेक) थेट खरेदी-विक्री करू शकतात.
  • बँक-म्युच्युअल फंड सारख्या संचालित संसाधनांच्या व्यवस्थापकांच्या पलीकडे जी-सेक्समधील किरकोळ सहभाग वाढविण्यासाठी आणि जी-सेकच्या मालकीचे लोकशाहीकरण करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
  • ही योजना वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक वाढावी या करता असून त्यात किरकोळ गुंतवणूकदारांना (व्यक्तींना) आरबीआयकडे ‘रिटेल डायरेक्ट गिल्ट अकाउंट’ (आरडीजी खाते) ऑनलाईन पोर्टलद्वारे उघडण्याची आणि देखभाल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आरबीआय 25 वे गव्हर्नर: शक्तीकांत दास
  • मुख्यालय: मुंबई
  • स्थापना: 1 एप्रिल 1935, कोलकाता

 

 7. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17% वरून 28% पर्यंत वाढविला

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना आणि निवृत्तीवेतनाधारकांचा महागाई भत्ता 28% पर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे.
  • महागाई भत्ता सध्याच्या 17%  च्या तुलनेत एकूण 11% ने वाढला आहे. वाढलेले डीए आणि डीआर दर 1 जुलै 2021 पासून लागू होतील.

 

 8. जून मध्ये घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई 12.07% वर आली

  • कच्च्या तेलाच्या आणि खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात घट झाल्याने घाऊक किंमत-आधारित महागाई मध्ये जूनमध्ये किरकोळ घसरण होऊन 12.07% आली आहे.
  • मागील वर्षी जून मध्ये महागाईच्या वाढीचा दर हा -1.81% होता.
  • डब्ल्यूपीआय चलनवाढीचा दर जूनमध्ये सलग तिसर्‍या महिन्यात दोन अंकी राहिला असून ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई जून मध्ये 6.26% होती.

 

 9. आरबीआयने नवीन ग्राहक जोडण्याला मास्टरकार्ड एशियावर निर्बंध घातले आहेत

  • पेमेंट सिस्टम डेटाच्या स्टोरेजवरील निर्देशांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 22 जुलै 2021 पासून नवीन भारतीय  ग्राहकांना जोडण्यासाठी मास्टरकार्ड एशिया / पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेडवर निर्बंध घातले आहेत.
  • आरबीआयने एप्रिल 2018 मध्ये एक परिपत्रक जारी केले होते, त्याद्वारे सर्व यंत्रणा प्रदात्यांना त्यांच्याद्वारे संचालित पेमेंट यंत्रणेशी संबंधित सर्व माहिती भारतात संग्रहित केली जावी हे निर्देश देण्यात आले होते.

 

 10. आरबीआयने डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) लातूर येथील डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना पुरेसे भांडवल नसल्याने आणि उत्पन्न मिळण्याची शक्यताही नसल्याने रद्द केला आहे.
  • ही महाराष्ट्रातील बँक आपल्या ठेवीदारांना पूर्ण देय देण्यास असमर्थ आहे असे आरबीआयने म्हटले आहे.

 

महत्त्वाचे दिवस 

 11. 15 जुलै: जागतिक युवा कौशल्य दिन

  • संयुक्त राष्ट्र संघातर्फे दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. हा दिवस जगाच्या विकासासाठी कौशल्यांच्या असलेल्या महत्त्वाला अधोरेखित करतो.
  • 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने तरुणांना रोजगार, सुयोग्य कार्य आणि उद्योजकता या कौशल्यांनी सुसज्ज करण्याचे सामरिक महत्त्व साजरे करण्यासाठी 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केले.

जागतिक युवा कौशल्य दिन 2020 संकल्पना: महामारीनंतर युवा कौशल्यांचा पुनर्विचार (रीइमॅजिनिंग युथ स्किल्स पोस्ट पॅन्डेमिक)

 

निर्देशांक आणि अहवाल 

 12. जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण स्थिती अहवाल 2021

  • संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (युएन-एफएओ) प्रदर्शित केलेल्या “जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण स्थिती अहवाल 2021″ नुसार 2020 मध्ये 720 ते 811 दशलक्ष लोकांना उपासमारीचा सामना करावा लागला. 2019 मध्ये हे प्रमाण 161 दशलक्षने कमी होते.
  • हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ), आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफएडी), यूएन बाल निधी (युनिसेफ), जागतिक अन्न कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी संयुक्तपणे तयार केला आहे.

अहवालाबाबत महत्त्वाची तथ्ये: 

  • जगात 2020 मध्ये उपासमार शन केलेल्या लोकांची संख्या: 720 ते 811 दशलक्ष दरम्यान
  • आशियाः 418 दशलक्ष (जगाच्या 50% पेक्षा जास्त )
  • आफ्रिका: 282 दशलक्ष
  • सन 2020  मध्ये जवळपास 2.37 अब्ज लोकांना पुरेशा अन्नाची सोय नव्हती,2019 च्या तुलनेत ही वाढ 320 दशलक्ष आहे.
  • 5 वर्षाखालील मुलं स्टंटिंगमुळे (वयासाठी कमी उंची) बाधित: 22.0 टक्के
  • 5 वर्षाखालील मुलांना (उंचीसाठी कमी वजन) परिणामः 6.7 टक्के
  • 5 वर्षांपेक्षा कमी वयाची अतिवाजनाची मुले (जास्त उंचीसाठी वजन): 5.7 टक्के
  • अशक्तपणामुळे पुनरुत्पादक वयातील महिलांमध्ये अनेमिया ची टक्केवारी:29.9%
  • केवळ स्तनपान देणार्‍या 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे प्रमाण: 44%

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान

 13. इस्रोने गगनयान कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या विकास इंजिनची तिसरी यशस्वी चाचणी केली

  • भारतीय अवकाश संशोधन संस्नेथे (इस्रो) गगनयानसाठी इंजिन पात्रता आवश्यकतेचा भाग म्हणून मानव-उपयुक्त जीएसएलव्ही एमके III वाहनाच्या कोर एल 110 द्रव अवस्थेसाठी द्रव प्रणोदक विकास इंजिनची तिसरी दीर्घ-कालावधीची उष्ण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली.
  • इंजिन चाचणी सुविधा, इसरो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स (आयपीआरसी), महेंद्रगिरी, तामिळनाडू येथे ही चाचणी घेण्यात आली.

 

क्रीडा बातम्या 

 14. ए.आर. रहमान यांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी स्फूर्तीगान “हिंदुस्थानी वे” रचले

  • गायिका अनन्या बिर्ला यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासाथीने एक “हिंदुस्थानी वे” नावाचे स्फुर्तीगीत तयार केले आहे. या गाण्याच्या उद्घाटन समारंभाला माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हेदेखील उपस्थित होते.
  • या गाण्याच्या व्हिडिओ मध्ये माजी भारतीय ऑलिम्पिक पदक विजेत्यांनी विशेष उपस्थिती लावली आहे तसेच मागील स्पर्धांमधील विजयाचे क्षण देखील या व्हिडीओमध्ये दिसणार आहेत.

 

पुस्तके आणि लेखक

 15. एम. वेंकयाह नायडू यांना ‘उर्दू कवी आणि लेखक – दख्खनची रत्ने’ हे पुस्तक सादर करण्यात आले

  • उपराष्ट्रपती एम. वेंकयाह नायडू यांना ज्येष्ठ पत्रकार, जे.एस. इफ्तेखार लिखित ‘उर्दू कवी आणि लेखक – दख्खनची रत्ने [उर्दू पोएट्स अँड रायटर्स- जेम्स ऑफ डेक्कन] ’ हे पुस्तक सादर करण्यात आले.
  • हैदराबादचा संस्थापक मुहम्मद कुली कुतुब शहा यांच्या काळापासून आजच्या काळापर्यंत डेक्कनच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा या पुस्तकात आल्या आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Tejaswini

Recent Posts

साप्ताहिक चालू घडामोडी, 22 – 27 एप्रिल 2024, महाराष्ट्र राज्य विशिष्ट आणि देश व विदेश विशिष्ट PDFs डाउनलोड करा

साप्ताहिक चालू घडामोडी: या लेखात महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध श्रेणींवर आधारित नवीनतम चालू घडामोडी मिळवा. हे साप्ताहिक चालू घडामोडी MPSC,…

1 hour ago

तुम्हाला “अनघ” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

2 hours ago

Do you know the meaning of Burnish? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

3 hours ago

साप्ताहिक चालू घडामोडी थोडक्यात (22 ते 28 एप्रिल 2024)

राष्ट्रीय बातम्या • 2550 वा भगवान महावीर निर्वाण महोत्सव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 वे तीर्थंकर, भगवान महावीर यांच्या शिकवणीचा…

3 hours ago

Saltwater Lakes in India | खाऱ्या पाण्याचे सरोवर | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…

24 hours ago

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…

1 day ago