Marathi govt jobs   »   Result   »   MPSC ASO Mains 2019 Result

MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) 2019 मुख्य परीक्षा अंतिम निकालाची घोषणा | MPSC ASO Mains 2019 Final Result Out

MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) 2019 मुख्य परीक्षा अंतिम निकालाची घोषणा | MPSC ASO Mains 2019 Exam Final Result Out: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 28 जुलै, 2019 व दिनांक 25 ऑगस्ट, 2019 रोजी घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) (मुख्य) परीक्षा 2019 चा निकाल दिनांक 27 ऑगस्ट, 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर मुख्य परीक्षेत अंतिम निवडलेले उमेदवारांची यादी व बैठक क्रमांकाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. निकाल तपासा: MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) 2019 मुख्य परीक्षा अंतिम निकालाची घोषणा | MPSC ASO Mains 2019 Exam Final Result Out.

MPSC ASO Mains 2019 Exam Final Result Out

MPSC ASO Mains 2019 Exam Final Result Out: MPSC ने सहायक कक्ष अधिकारी (ASO) मुख्य परीक्षा अंतिम निकाल 2019  घोषित केला आहे. MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) मुख्य परीक्षा अंतिम निकाल तपासण्यासाठी MPSC ने जाहीर केलेली बैठक क्रमांकाची यादी पाहता येईल. MPSC (Assistant Section Officer) (ASO) निकाल 2021 Result पाहण्यासाठी, लेखातील खाली दिलेली लिंक तपासा. सदर मुख्य परीक्षेत अंतिम निवडलेले उमेदवारांची यादी व बैठक क्रमांकाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. मुख्य परीक्षेत अंतिम निवडलेले उमेदवारांची यादी व गुणांची सीमारेषा तुम्ही या पोस्ट मध्ये पाहू शकता.

MPSC ASO Mains 2019 निकालाचे प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC ASO Mains 2019 Exam Result: List of Final Selected Candidates

MPSC ASO Mains 2019 Exam: List of Final Selected Candidates: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 28 जुलै, 2019 व दिनांक 25 ऑगस्ट, 2019 रोजी घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) (मुख्य) परीक्षा 2019 चा निकाल दिनांक 27 ऑगस्ट, 2021 रोजी जाहीर करण्यात आला असून अंतिम निवडलेले उमेदवारांची यादी व बैठक क्रमांकाची यादी खालील PDF मध्ये पाहू शकता.

MPSC ASO Mains 2019: List of Final Selected Candidates | अंतिम निवडलेले उमेदवारांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने दाखल सिव्हिल अपील क्रमांक 3123/2020 या न्यायिक प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाकडून दिनांक 5 मे, 2021 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार शासन सेवेतील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण रद्दबातल ठरविण्यात आले आहे. सदर न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.बीसीसी-२०२०/प्र.क्र.३२०/१६-ब, दिनांक 5 जुलै, 2021 व क्र. बीसीसी २०२१/प्र.क्र.३६०/१६-ब, दिनांक 15 जुलै, 2021 अन्वये भरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाकडून कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे.

सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षित पदे अराखीव पदांमध्ये रुपांतरीत करून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब (मुख्य) परीक्षा 2019 चा सहायक कक्ष अधिकारी पदाचा सुधारित अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मुळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहुन दिनांक 27 ऑगस्ट, 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. सुधारित अंतिम निकालानुसार सदर मुख्य परीक्षेत शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमाकांसह याद्या व प्रस्तुत परीक्षेची गुणांची सीमारेषा उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात आली आहे.

[Download] MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र निघाले

प्रस्तुत सुधारित अंतिम निकालानुसार नियुक्तीस शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरुन तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासतांना वा अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे वैद्यकिय मंडळाकडून तपासून घेण्याच्या अधीन राहून त्यांची शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. तसेच सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्र.अपंग-१००३/प्र.क्र.१२७/ २००३/१६-अ, दिनांक 6 मे, 2004 मधील बाब क्र. (६) नुसार त्यांच्या नेमणुकीपूर्वी उमेदवार संबंधित पदावर नियुक्तीसाठी सक्षम आहे किंवा नाही याची देखील वैद्यकिय मंडळाकडून तपासणी केल्यानंतर ते नेमणुकीस पात्र ठरतील. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांनी सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. अप्रकि- २०१२/प्र.क्र.२९७/ आरोग्य-६, दिनांक 6 ऑक्टोबर, 2012 मधील आदेशानुसार SADM या नवीन संगणक प्रणालीव्दारे वितरीत करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या आधारे सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६-अ. दिनांक 29 मे, 2019 तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार आरक्षणासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल.

MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI ) पूर्व परीक्षा 2020-21 निकाल | MPSC AMVI Result

प्रस्तुत परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात तसेच अन्य मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा.न्यायधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास प्रवर्गाच्या ज्या उमेदवारांनी अराखीव प्रवर्गासाठी विहित करण्यात आलेली वयोमर्यादा ओलांडली असेल त्यांनी वयोमर्यादेतील सवलतीकरीता तद्अनुषंगिक प्रमाणपत्र नियुक्तीच्यावेळी सादर करणे अनिवार्य राहील.

सदर पदाच्या निकालात, गुणवत्ता यादीत तसेच शिफारस यादीत उमेदवारांचा सयुंक्त प्रश्नपत्रिका क्र. १ शी निगडित बैठक क्रमांक व प्रश्नपत्रिका क्र. २ शी निगडित बैठक क्रमांक हे दोन्ही बैठक क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. विषयांकित परीक्षेच्या गुणवत्तायादीमधील उमेदवारांची गुणवत्ता व पात्रता उमेदवारांनी अर्जात केलेले दावे विचारात घेऊन निश्चित करण्यात आली आहे. शिफारसपात्र उमेदवार वगळता अन्य उमेदवारांची गुणवत्ता व पात्रता ही अर्जातील त्यांच्या दाव्यांच्या आधारे तपासण्याच्या अधीन राहून सदर गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC ASO Mains 2019 Exam Result: Toppers List

  • श्री. काळे रोहीत मधुकर, बैठक क्रमांक MB001205 हे राज्यातून प्रथम आले आहेत.
  • तसेच मागासवर्गवारीतून श्री. मदने शुभम राजेश, बैठक क्रमांक MB001210 हे प्रथम आले आहेत व
  • महिला वर्गवारीतून श्रीमती अनुसे शमा गणपत, बैठक क्रमांक MB002196 ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत.

MPSC ASO Mains 2019 Exam Cut Off

MPSC ASO Mains 2019 Exam Cut Off: महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) मुख्य परीक्षा 2019 चे Cut Off (गुणांची सीमारेषा) तुम्ही खाली दिलेल्या Image मध्ये पाहू शकता.

सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) मुख्य परीक्षा 2019 चे Cut Off (गुणांची सीमारेषा)
सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) मुख्य परीक्षा 2019 चे Cut Off (गुणांची सीमारेषा)

FAQs: MPSC ASO Mains Exam 2019 Final Result 

Q1. MPSC ASO Mains Exam 2019 चा निकाल लागला आहे का?

उत्तर होय, MPSC ASO Mains Exam 2019 निकाल 27 ऑगस्ट 2021 रोजी लागला आहे.

Q2. MPSC ASO Mains Exam 2019 चा निकाल कसा तपासता येईल?

उत्तर उमेदवार वरील दिलेल्या लिंकवरून ASO Mains Exam 2019 चा निकाल तपासू शकतात.

Q3. MPSC ASO Mains Exam 2019 चा निकाल किती वाजता जाहीर होईल?

उत्तर MPSC ASO Mains Exam 2019 चा निकाल 27 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी जाहीर केला जाईल.

Q4. MPSC ASO Mains Exam 2019 निकाल 2021 कधी जाहीर करेल?

उत्तर MPSC ने 27 ऑगस्ट 2021 रोजी ASO Mains Exam 2019 निकाल 2021 जाहीर केला आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!